चोपडा तालुक्यात आज आणखी 9 कोरोनाबाधित रुग्ण आढळले रुग्णसंख्या 240 वर !

चोपडा

चोपडा प्रतिनिधी >>चोपडा येथील आज प्राप्त 18 अहवालात 9 निगेटिव्ह 9 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे. त्यात चोपडा शहरातील चार कोरोना बाधित आढळले. संजीवनी नगर येथील 3, बारी वाडा येथील 1, ग्रामीण भागातील पाच कोरोना बाधित रुग्णांमध्ये अडावद येथील 3, चुंचाळे 1, गणपुर येथील 1 रुग्ण धुळे येथे उपचार घेत आहे. चोपडा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 240 झाली आहे त्यापैकी 154 रुग्ण बरे झाले. 16 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *