चोपड्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर बुधवारी राहणार कडकडीत बंद

चोपडा सिटी न्यूज

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील >> कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व व्यापारी बांधवांच्या हितासाठी २ डिसेंबरपासून बुधवार या दिवशी कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. चोपडा तालुका व्यापारी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

शेकडो व्यापारी बांधवांच्या उपस्थितीत २३ रोजी रात्री साडेआठ वाजता झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, कोरोना आजराची पहिली लाट आली होती. त्या वेळी संघटनेने असाच निर्णय घेतला होता, त्यावेळी बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला होता.

दरम्यान, व्यापाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाला नागरिकांनी पाठिंबा देऊन सहकार्य करावे, जेणे करुन कोरोनाला आळा बसणे शक्य होईल. तसेच व्यापाऱ्यांनी ग्राहकांना मास्कचा आग्रह धरावा, असे ठरले.