कुणी आले, कुणी गेले काही फरक पडत नाही : गिरीश महाजन यांचा खडसेंचे नाव न घेता टोमणा

Politicalकट्टा कट्टा चोपडा

भारतीय जनता पार्टी चोपडा तालुका/शहर संघटनात्मक बैठक संपन्न..


चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील ::> आज शुक्रवार दि. ३० ऑक्टोंबर रोजी भारतीय जनता पार्टीचे चोपडा तालुका बैठक घेण्यात आली. भारतीय जनता पार्टी चोपडा तालुका आयोजित हॉटेल श्रीनाथ प्राईड हॉलमधील संघटनात्मक बैठकी प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

काय म्हणाले बैठकीत भाजपा जिल्ह्याध्यक्ष राजू मामा::>
यावेळी जिल्हाध्यक्ष आ. राजुमामा भोळे यांनी भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे,आम्ही देश प्रथम मानतो दुसर्‍या स्थानी पक्षाला मानतो व तिसर्‍या स्थानी स्वत: मानतो..कार्यकर्त्यांनी संघटन शक्ति वाढवण्यावर भर द्यावा असे आवाहन केले.

काय म्हणाले प्रदेश संघटन मंत्री ::>
या दरम्यान, विजयराव पुराणिक यांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यांच्या भावना ऐकून घेतल्यात तर खासदार रक्षा खडसे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की माझा पहिला पक्ष भारतीय जनता पार्टी आहे, मी पक्षाच्या, कार्यकर्त्याच्या बळावर जि.प.सदस्य, दोनदा लोकसभा निवडणूकीत बहुमताने विजयी झाली आहे..’मला भविष्यात लोकसभेची उमेदवारी मिळो अथवा न मिळो मी भारतीय जनता पक्षातच माझे कार्य करेन..’

काय म्हणाले गिरीश महाजन
माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी पक्षाची वाटचाल ही कार्यकर्त्याच्या मेहनतीमुळेच सुरु आहे, भारतीय जनता पार्टीत वशंवादाला स्थान नाही, भाजपा मध्ये सर्व सामान्य कार्यकर्त्यालाही मोठे पद ,जबाबदारी मिळते, म्हणून कार्यकर्त्यांनी संघठीतपणे पक्षाची ध्येय धोरणे, विकास योजना जनतेपर्यंत पोहचवा..उद्याचा काळ आपला आहे. असेही महाजन यांनी बैठकीत सांगितले.

तसेच जि.प. पं.स. नगरपालिका आदि निवडणूकांसाठी कार्यकर्त्यांनी सर्व सामान्य जनतेशी संपर्कात रहावे, कामाला लागावे, भाजपा हा एका व्यक्ती ला महत्व देणारा पक्ष नाही आहे तर विचारधारेला महत्व देणारा पक्ष, कुणी आले,कुणी गेले काही फरक पडत नाही,देशातील अनेक राज्यातील भाजपाच्या मातब्बर नेत्यांनी,मा.मुख्यमंत्र्यांनी पक्ष त्याग केला परतूं त्यांना यश मिळू शकले नाही,ते पुन्हा भाजपात सामिल झाले म्हणून कार्यकर्त्यांनी नैराश्य त्यागून सकारात्मकपणे पक्षाच्या प्रसारासाठी प्रयत्न करावा,मी आपणास पूर्णत:सह कार्य करेल.

भारतीय जनता पार्टी चोपडा तालुका/शहर संघटनात्मक बैठक संपन्न..

यांची होती उपस्थिती ::>
यावेळी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, प्रदेश संघठन मंत्री विजयजी पुराणिक, प्रदेश भाजपा चिटणीस खासदार रक्षा खडसे, महाराष्ट्र प्रदेश जनजाती क्षेत्र संपर्क प्रमुख किशोरजी काळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे, विभाग संघटन मंत्री श्री रविंद्र अनासपूरे, रावेर लोकसभा विस्तारक डॉ.विजय धांडे, जळगाव लोकसभा विस्तारक सचिन पानपाटील, जेष्ठ नेते तिलक शहा, जी.टी.पाटील सर, चंद्रशेखर पाटील, जेष्ठ नेते शांताराम पाटील, मा.पं.स.सभापती तथा आत्माराम म्हाळके, उ.महा.ओबीसी सेल अध्यक्ष प्रदिप पाटील, तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल, मा.शहराध्यक्ष राजुभाऊ शर्मा, जि.प.महिला व बालकल्याण सभापती ज्योती पाटील, जि.प.कृषी व पशुसंवर्धन सभापती उज्वलाताई म्हाळके, जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे, चोपडा पं.स.उपसभापती भूषण भिल, सोनवणे इ. मान्यवरांच्या हस्ते पं.दीनदयाळ उपाध्याय, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली..