यावल फैजपूर रस्त्यावर दोन दुचाकींची धडक ; दोन गंभीर जखमी

क्राईम फैजपूर यावल सिटी न्यूज

यावल ::> यावल-फैजपूर रस्त्यावरील चितोडा गावाजवळ दुचाकींच्या अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. जखमींवर यावल येथे प्रथमोपचार करून जळगावला हलवण्यात आले आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

पिंपरूळ येथील रहिवासी टेकचंद रोहिदास कोल्हे (वय २४) हा तरुण रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दुचाकीद्वारे यावलकडे येत होता. तर यावलकडून मेहमूद तडवी, रा. कळमोदा ता. रावेर हा दुचाकीवरून फैजपूरकडे जात होता. चितोडा गावाजवळ या दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली.

यामध्ये दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. अपघात इतका भीषण होता की दोन्ही दुचाकींचा चुराडा झाला आहे. या मार्गावरून जात असलेल्या काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकला इंगळे यांनी घटनास्थळी थांबून जखमींना मदत केली. जखमींवर येथे प्रथमाेपचार करून तत्काळ जळगावला नेण्यात अाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *