चिंचोली येथे तरुणाने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा

आत्महत्या किनगाव यावल

प्रतिनिधी ::> यावल तालुक्यातील चिंचोली येथे एका ३० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला. दीपक गोविंदा कोळी असे मृत तरुणाचे नाव आहे.

चिंचोली येथील रहिवासी दीपक हा बसस्टॅँडजवळ उंटावद रोड वेल्डिंगच्या दुकानात काम करून उदरनिर्वाह करायचा. त्यास नेहमी दारु पिण्याची सवय होती.

बुधवारी बसस्टँडच्या मागे काशिनाथ दामोदर मोरे यांच्या शेताच्या बांधावरील भोकरच्या झाडाला प्लास्टिकच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हा प्रकार दुपारी ३ वाजता उघडकीस आला. या बाबत येथील पोलिसांना माहिती देण्यात आली. त्याचा मृतदेह तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.

तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी. बारेला यांनी शवविच्छेदन केले. या बाबत येथील पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली.