महाराष्ट्र विधानसभा २०१९ च्या ऐतिहासिक निवडणूकीची पडद्याआड घडलेली कहाणी..!

कट्टा पारोळा ब्लॉगर्स कट्टा

Checkmate: How the BJP Won and Lost Maharashtra

पारोळा शरद पाटील प्रतिनिधी : > शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ही घटना भारतीय राजकारणातील हाय होल्टेज राजकीय नाट्याचा कळस होता आणि संपूर्ण देशाने आपल्या टीव्हीवर तो पाहिला. निकालानंतर उद्भवलेल्या स्थितीमुळे कोणताच पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करु शकला नाही म्हणून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

महाराष्ट्रातील या राजकीय घडामोडींचे साक्षिदार असलेले पत्रकार सुधीर सुर्यवंशी हे या काळात ‘कट्टा न्यूज’ या ट्विटर हँडलवरुन राज्यात दररोज बदलत असलेल्या राजकीय घडामोडींच्या ब्रेकिंग न्यूज देत होते. झटपट बदलणाऱ्या राजकीय समिकरणांच्या ताज्या घडामोडींसह राजकीय वृत्तांत आणि राजकीय संकेतही ते अत्यंत बारकाईने देत होते.

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पाडणार ही ब्रेकिंग सुधीर सुर्यवंशी यांनी घटना घडण्याआधीच दोन दिवस दिली होती. तसेच अजित पवार यांना जलसंपदा घोटाळाप्रकरणी क्लीन चिट मिळणार असल्याची ब्रेकिंगही दिली होती. योगेंद्र यादव यांनी सुर्यवंशी यांनी कट्टा न्यूजवर दिलेल्या बातम्यांची प्रशंसाही केली होती. सत्तेच्या वर्तुळात पडद्याआड होत असलेल्या अशा घटनांचा वेध घेणे हिच तर खरी पत्रकारीता आहे.

 सुधीर सुर्यंवंशी हे रत्नापिंप्री येथिल प्रगतशिल शेतकरी व माजी सरपंच शिवदास डिगा पाटील यांचे सुपुत्र आहेत  मुंबईतील एक वरिष्ठ व अनुभवी पत्रकार असून सध्या सहायक संपादक व शरयू इंडियन एक्स्प्रेस, मुंबई येथे कार्यरत आहेत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे अचूक व तंतोतंत वार्तांकन करण्याचे काम मागील १५ वर्षांपासून करत आहेत.

डीएनए, मुंबई मिरर आणि फ्रि प्रेस जर्नल या प्रतिथयश दैनिकांमध्ये त्यांनी पत्रकार म्हणून काम केले असून सध्या ते द न्यू इंडियन एक्सप्रेस या दैनिकासाठी सहाय्यक संपादक म्हणून काम करत आहेत.सुर्यवंशी यांनी २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील ज्वलंत घडामोडींचा परामर्श करणारे एक महत्वाचे पुस्तक लिहिलेले आहे. महाराष्ट्रातील राजकीय समिकरणांचा अत्यंत सूक्ष्म वेध त्यांनी या पुस्तकात शब्दबद्ध केलेला आहे.

  Checkmate:How the BJP Won and Lost Maharashtra..या त्यांच्या पुस्तकात विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यातील राजकारण कसे बदलत गेले आणि महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळण्यासाठी इतका वेळ वाट का पहावी लागली या सर्वसामान्य लोकांना माहित नसलेल्या घटनांचा या पुस्तकात समावेश आहे. राज्यातील महत्वाच्या व्यक्तींबरोबर असलेले त्यांचे संबंध आणि सर्व पक्षातील राजकीय नेत्यांबरोबर असलेली त्यांची उठबस यामुळे त्यांना या राजकीय नाट्यांची माहिती मिळण्यास मदत झाली.

महाराष्ट्राच्या मागील दशकातील राजकीय घडामोडींचा गोषवाराही या पुस्तकात घेतलेला आहे. “माझ्या अजित पवार हे राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपा बरोबर जातील या बातमी वर सुरुवातीला अनेकांनी विश्वासच ठेवला नव्हता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनीही मला फोन करुन तुमची बातमी चुकीची आहे असे सांगितले पण मी बातमीवर ठाम होतो, कारण मला माझ्या सोर्सवर पूर्ण विश्वास होता आणि दोन दिवसात माझी अजित पवारांची बातमी खरी ठरली,” असे सुधीर सुर्यवंशी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *