चाळीसगाव तालुक्यात तिरपोळेत गळफास घेऊन प्रौढाने केली आत्महत्या

आत्महत्या क्राईम चाळीसगाव

चाळीसगाव प्रतिनिधी राज देवरे >> चाळीसगाव तालुक्यातील तिरपोळे शिवारात वरखेडे रस्त्यावर आंब्याच्या झाडाला ४० वर्षीय प्रौढाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुदाम हिरामण तिरमली असे मृताचे नाव आहे.

गुरुवारी (दि.१९) सकाळी ७ वाजेपूर्वी ही घटना घडली. तिरपोळे नवेगाव येथील सुदाम तिरमली हे सकाळी ७ वाजेपूर्वी तिरपोळे शिवारातील वरखेडे रस्त्यावरील मनोहर खंडे अहिरे यांच्या शेतात आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.

पाेलिस पाटील चंद्रशेखर जाधव यांच्या खबरीनुसार मेहुणबारे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. एपीआय पवन देसले यांनी घटनास्थळी पाहणी केली.