चाळीसगावात दोघांनी घेतला गळफास

आत्महत्या चाळीसगाव

चाळीसगाव >> तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ७५ वर्षीय वृद्धेसह ३० वर्षाच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. बोरखेडा खुर्द येथील नीलाबाई नामदेव पाटील व रोकडे येथील अरविंद दत्तात्रय पाटील अशी मृतांची नावे आहेत.

बोरखेडा खुर्द येथील नीलाबाई नामदेव पाटील या वृद्धेने राहत्या घरात खिडकीच्या लोखंडी गजाला रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २५ रोजी पहाटे २.१५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने बोरखेडे गावात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण समजून आले नाही. या प्रकरणी बाबुलाल नामदेव पाटील यांच्या माहितीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार राजेंद्र साळुंखे करत आहेत.

रोकडे गावात ३० वर्षांच्या तरुणाची आत्महत्या
तालुक्यातील रोकडे येथील अरविंद दत्तात्रय पाटील या ३० वर्षाच्या तरुणाने स्वत:च्या शेतातील राहत्या घरात लोखंडी पाइपाला साडी बांधून गळफास घेतला. ही घटना २५ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समोर आले नाही. याप्रकरणी दत्तात्रय सर्जेराव पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. तपास पाेलिस नाईक गणपत महिरे करत आहेत.