चाळीसगावात अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे “उमंग” च्या संस्थापिका अध्यक्षा संपदा पाटील यांच्या हस्ते वाटप

चाळीसगाव सिटी न्यूज

चाळीसगाव प्रतिनिधी >> नगरपालिकेच्या वार्ड क्रमांक आठ मध्ये खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या संकल्पनेतून पालिकेतील नगरपरिषदेचे गटनेते नगरसेवक संजय आबा पाटील, नगरसेवक बाळासाहेब मोरे यांनी आपल्या वार्डातील सर्व भागात मोफत अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटपाचे आयोजन केले होते.

उमंग महिला समाजशिल्पी परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा संपदाताई पाटील यांच्या शुभहस्ते या अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

गोरगरीब गरजू कष्टकरी नागरिकांचा अधिक रहिवास असलेल्या माता भगिनी ,वयोवृध्द नागरिकांसह घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले.

या होमिओपॅथी औषधींमुळे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढणार असून आपण गरज असेल तरच बाहेर पडा. घरीच रहा सुरक्षित रहा असा सल्ला यावेळी संपदा पाटील यांनी दिला.

यावेळी सामाजिक अंतर ठेवून गोळ्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संदीप राजपूत,अनिल चव्हाण,रमेश जगताप,नाना नवले,नयन पाटील,अक्षय राजपूत,कृष्णा पाटील,गिरीश आहिरे आदी नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *