चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगावचा जवान अतिरेकी हल्ल्यात शहीद

Jalgaon Social कट्टा कट्टा चाळीसगाव जळगाव पाेलिस माझं खान्देश रिड जळगाव टीम

चाळीसगाव प्रतिनिधी >> श्रीनगरमध्ये सेनेच्या गस्ती पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पिंपळगावच्या (ता. चाळीसगाव) २२ वर्षीय जवानाला गुरुवारी दुपारी वीरमरण आले. यश दिगंबर देशमख असे या शहीद झालेल्या सुपुत्राचे नाव आहे. घटनेनंतर पिंपळगाव येथे त्यांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून माहिती मिळताच त्यांच्या आईला धक्का बसून त्या बेशुद्ध झाल्या. घटनेमुळे तालुक्यात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. यश देशमख हे ११ महिन्यांपूर्वी पुणे येथे सैन्यदलात पॅरा कमांडो म्हणून भरती झाले. नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ते दोन महिन्यांपूर्वीच श्रीनगर येथे रुजू झाले होते.

यश देशमुख यांच्या पश्चात आई, वडील, एक लहान भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. वडील शेतकरी असून लहान भावाचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. तोही वडिलांना शेतीकामात मदत करतो. घराची जबाबदारी असल्याने सवड झाली की सतत आईवडिलांना फोन करून खुशाली विचारायचे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी घरी फोन करून तब्बेतीची विचारपूस केली होती. २८ नोव्हेंबरला त्यांचे पार्थिव पिंपळगाव येथे आणले जाणार आहे.

रिड जळगाव न्यूज पोर्टल तर्फे शहीद जवान यश देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली…