चाळीसगावात संचारबंदीचे उल्लंघन ; सात जणांवर गुन्हा दाखल

क्राईम चाळीसगाव

चाळीसगाव >> शहरात संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी मोरया बॅंड जप्त करत सात जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले.

चाळीसगाव शहरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. शहरात १३ व १४ मार्च रोजी संचारबंदीचे आदेश लागू केली आहे.

या दरम्यान, शहरातील भडगाव रोड परिसरातील स्वयंवर मंगल कार्यालयासमोर रात्री ११ वाजेच्या सुमारास चक्क मोरया बॅंड (गडखांब ता. अमळनेर) सुरू होता.

पोलिसांच्या पेट्रोलिंग दरम्यान ही बाब लक्षात येताच मोरया बॅंड ताब्यात घेत सात जणांवर शहर पोलिस ठाण्यात उशिराने गुन्हा दाखल करण्यात आले.

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हि कारवाई करण्यात आली. सरकारी नियमानुसार संदीप ईश्वर पाटील यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास शैलेंद्र पाटील हे करीत आहेत.