चाळीसगाव ग्रामीणच्या पोलिस निरीक्षकपदी संजय ठेंगे रूजू

Social कट्टा कट्टा चाळीसगाव पाेलिस

चाळीसगाव >> ग्रामीणच्या पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी संजय राजाभाऊ ठेंगे हे रुजू झाले आहेत. ठेंगे यांनी रविवारी मावळते पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्याकडून पदभार स्विकारला. अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी या अगोदर पुणे शहर व ग्रामीण येथे सात वर्ष तसेच चोपडा शहर व ग्रामीण यासह गडचिरोली येथे नक्षली भागात व नागपूर येथे कामठी पोलिस ठाणे येथे सेवा बजावली आहे. सायबर क्राइमसह तांत्रिक व अंमली पदार्थांविषयी महत्त्वपूर्ण गुन्ह्यांचा उलगडा त्यांनी केला आहे.