चाळीसगांव शहराला स्मार्ट सिटीची ओळख देणारे चौकांच्या सुशोभिकरणाला सुरुवात करा : खा.उन्मेश पाटील

Social कट्टा कट्टा चाळीसगाव सिटी न्यूज

चाळीसगांव शहरातील सहा चौकाच्या सुशोभीकरण कामासाठी अधिकाऱ्यांसोबत खा. उन्मेश पाटील यांनी केली पाहणी

चाळीसगाव प्रतिनिधी राज देवरे ::> सुमारे तीन कोटी रुपयांचा निधीतून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक सिग्नल चौक, धुळे मालेगाव कॉलेज वाय पॉईंट, खरजई नाका, पोलीस स्टेशन समोरील सावरकर चौक, स्टेशन रोड चौकी परिसर, अंधशाळा चौक, अभ्यासिका व अत्याधुनिक व्यायामशाळा अशा विविध कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

या तीन कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील चौकाचौकांचे सुशोभीकरण करून शहराच्या सौंदर्यात भर घातली जाणार आहे. तातडीने शहराला “स्मार्ट सिटीची” ओळख देणाऱ्या चौकांचे सुशोभिकरणाच्या कामांना सुरुवात करा असे आदेशवजा सूचना खासदार उन्मेश पाटील यांनी कॉलेज चौकातील वाय पॉईंट पाहणी प्रसंगी दिल्यात.


चाळीसगाव शहरातून मालेगाव धुळे कडे जाणाऱ्या कॉलेज वाय पॉईंट या चौकाच्या सुशोभीकरण कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात यावी. यासाठी खासदार उन्मेश पाटील यांनी प्रत्यक्ष वाय पॉइंट येथे पाहणी केली.

अधिकाऱ्यांना दिल्यात सूचना

यावेळी खासदार उन्मेश पाटील यांनी सुशोभिकरण कामासाठी प्रत्यक्ष वाय पॉइंट येथे पाहणी करीत प्रशासनाला तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्यात. याप्रसंगी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, महामार्ग प्रकल्प संचालक अे.आर. काळे व पालिका मुख्याधिकारी शंकरराव गोरे, पालिका गटनेते नगरसेवक संजूआबा पाटील भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील,नगरसेविका विजया प्रकाश पवार, नगरसेवक नितीन पाटील, पंचायत समिती उपसभापती सुनील पाटील, रा. वी. संचालक विश्वास चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र काका जैन, नगरसेवक भास्कर पाटील, गणेश महाले, माजी सरपंच रवींद्र पाटील, वास्तू विशारद आशुतोष खैरनार, पवन कदम, साहेबराव राठोड, बंडू पगार, कैलास गावडे, पी एम फॉर मोदी संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश पाटील, चेतन बागड, प्रतीक पाटील आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

चाळीसगाव शहराला मिळणार स्मार्ट सिटीचा “लुक”

शहराचे सौंदर्य म्हणजे त्या त्या शहरात असणारे मुख्य चौक मात्र चाळीसगाव तालुक्यातील चौकांचे सुशोभीकरण न झाल्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. तत्कालीन आमदार तथा खासदार उन्मेश पाटील यांच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराज चौक सिग्नल पॉइंट सुशोभीकरण करणे (५0 लक्ष), धुळे व मालेगाव कडे जाणारा महाराणा प्रताप चौंक Y पॉइंट सुशोभिकरण करणे (५० लक्ष), शहरातील तहसील व पंचायत समिती जवळील वीर सावरकर चौक सुशोभिकरण करणे (४० लक्ष), अंधशाळा चौक सुशोभिकरण करणे (३० लक्ष), भडगाव रोड टाकळी प्रचा जवळील खरजई नाका चौक सुशोभिकरण करणे (३० लक्ष), स्टेशन रोड पोलीस चौकी समोरील चौक सुशोभिकरण करणे (२० लक्ष) आदी ६ चौकांसाठी २ कोटी २० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

यामुळे शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे आणि शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मदत होणार मदत असल्याने खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज या चौकाची पाहणी करून तातडीने सुशोभिकरण कामाला सुरुवात करण्यात यावी असे आदेश वजा सूचना प्रशासनाला दिल्यात..

शहराला स्मार्ट सिटीची मिळणार ओळख

खासदार उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाची पालिकेत सत्ता स्थापन झाली आहे. चाळीसगाव नगरपालिकेच्या विकासासाठी कोट्यवधींच्या योजना व निधींची तरतूदींसाठी तत्कालीन आमदार उन्मेश दादा पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कडे भक्कम पाठपुरावा करीत शहर विकासासाठी भरीव निधी मिळविला. प्रत्यक्षात ही कामे सुरू आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी चबुतरा बांधला गेला असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. १५० कोटींची भुयारी गटार योजना तसेच ७२ कोटींची अंतर्गत पाणीपुरवठा योजना त्याचप्रमाणे शहराच्या स्वच्छतेसाठी ८ कोटींच्या घंटागाडी, जेसीबी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असो कि शहरभरात आधुनिक एल ई डी दिव्यांचा प्रकाश व तितूर नदी किनारा सुशोभिकरण , नॅनो पुलाची निर्मिती आदी सर्व विकासकामांमुळे शहरवासीयांच्या सोयीसुविधा मध्ये अधिक आमुलाग्र बदल होत असून शहरातील विकास कामे ठळकपणे दिसत असून खासदार उन्मेश पाटील यांच्या मार्गदर्शनातून शहराला स्मार्ट सिटीची ओळख मिळणार असल्याचा विश्वास शहरवासियांना कडून व्यक्त केला जात आहे.