चाळीसगावात मागील भांडणावरून तलवार हल्ला, तिघांवर गुन्हा दाखल

क्राईम चाळीसगाव

चाळीसगाव ::> मागील भांडणाच्या कारणावरून एकावर तलवारीने हल्ला करून ठार मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी माजी नगरसेविकेचे पती जगदीश महाजन यांच्यासह तिघांविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या हल्ल्यात सूरज ज्ञानेश्वर चौधरी हा जखमी झाला अाहे. त्याच्यावर धुळे येथे उपचार सुरू आहेत. ही घटना ३ ऑक्टोबरला सायंकाळी खरजई रस्त्यावर घडली होती. मात्र, जखमी रुग्णालयात असल्याने ८ ऑक्टोबरला सायंकाळी जगदीश महाजन, आवडप्पा गवळी व महाजन यांचा भाचा या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. तपास उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *