अवैध दारू विक्रेत्याला चाळीसगाव पोलिसांनी केली अटक ; हप्त्यातील ही दुसरी कारवाई

क्राईम चाळीसगाव

चाळीसगाव राज देवरे ::> शहर पोलीस स्टेशन हद्दीतील काडी कारखान्याजवळील अवैध दारू विक्रीचा अड्डयावर चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने अवैध दारू विक्रेता संतोष चौधरीला अटक करण्यात आली ही हफ्ते भरातील दुसरीच कारवाई म्हटले जात आहे.

चाळीसगांव पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांचा मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे, पोलीस नाईक भटू पाटील, पोलीस शिपाई रवी पाटील, अशोक मोरे, भूषण पाटील, मुकेश पाटील या पथकाच्या वतीने कारवाई करण्यात आली असून आरोपी संतोष उर्फ बापू जयराम चौधरी वय- 50 वर्षे राहणार चौधरी वाडा चाळीसगाव हा त्याचे ताब्यात देशी टंगो संत्रा दारूच्या बाटल्या चोरट्या विक्रीसाठी बाळगून असल्याचे मिळून आल्याने रक्कम रुपये 2548/- ची देशी दारूच्या 49 टंगो पंच ब्रँडच्या बाटल्यांसह आरोपीला ताब्यात घेऊन चाळीसगाव शहर पो स्टे ला आणून आरोपिविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील कारवाई शहर पोलीस स्टेशन पोलीस नाईक भटू पाटील हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *