आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांना कोरोना विषाणुच्या उपचारकामी शहर विकास आघाडीने निवेदन देत घातले साकडे

Politicalकट्टा Social कट्टा कट्टा चाळीसगाव

चाळीसगांव राज देवरे ::> चाळीसगाव शहरासह तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या वाढती संख्या लक्षात घेता शहरातील ट्रामा केअर सेंटर येथे व्हेंटिलेटर आणि उपचारासाठी अत्यावश्यक अशा फेबिफ्ल्यू गोळ्या, रॅमिडिसिर इंजेक्शनचा जास्तीचा पुरवठा करावा. ज्यामुळे सर्वसामान्य जनतेचा गरज भागेल व उपचार सुरळीत होईल अशी मागणीचे निवेदन आज मुंबई येथील मंत्रालयात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीच्या वतीने साकडे घालत निवेदन देण्यात आले.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही दखल घेत राज्य सचिव अर्चना पाटील यांच्याशी सवांद साधून त्यांना सदरबाबतीत माहिती देत तात्काळ मदतकरण्याच्या सुचनाही दिल्या.

यावेळी शहराध्यक्ष शाम देशमुख, माजी उपनगराध्यक्ष भगवान पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव, दीपक पाटील, जगदीश चौधरी, जिल्हा नियोजन समिती सदस्य बंटीभाऊ ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते दिपक कच्छवा उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *