एलसीबी, मेहुणबारे पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा : आमदार मंगेश चव्हाण

Politicalकट्टा आंदोलन कट्टा चाळीसगाव निषेध पाेलिस

चाळीसगाव प्रतिनिधी ::> जळगावात झालेल्या गुटख्याच्या कारवाई प्रकरणी पोलिसांकडून कायद्याचा गैरवापर करण्यात आला. पोलिसांनी यात आर्थिक देवाणघेवाण करून सेंटलमेंट केली असून कुठतरी पाणी मुरत आहे. या प्रकणात सहभागी जळगाव एलसीबी व मेहुणबारे पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी रविवारी चाळीसगाव येथे त्यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

तसेच याप्रकरणी आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असून डीजी व आयजींना भेटून तक्रार करणार आहोत. तसेच जळगावचे पोलिस निरिक्षक अकबर पटेल यांनी आपली तक्रार न घेता आपल्याशी अरेरावी केली. त्यांच्या विरोधात आपण विधानसभेत हक्कभंग आणणार असल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.