चाळीसगावात सातवीच्या विद्यार्थ्याला गळफास लागल्याने मृत्यू

आत्महत्या क्राईम चाळीसगाव

चाळीसगाव प्रतिनिधी ::> गळफास लागल्याने १४ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील हिरापूर रोड भागात १७ रोजी दुपारी ४.३० वाजेपूर्वी घडली. पुरूषोत्तम राजेश औषीकर (गवळी) असे मृत बालकाचे नाव आहे.

पुरूषोत्तम हा राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याची आई व बहिण हे दुपारी घट स्थापनेसाठी साहित्य घेण्याकरता बाजारात गेल्या होत्या, तेव्हा ही घटना घडली. तपास सपोनि मयूर भामरे करत आहेत. पुरूषोत्तम हा येथील राष्ट्रीय विद्यालयात सातवीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या पश्चात आई, वडील व बहिण असा परिवार आहे. एकुलत्या एक मुलाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.