भटके-विमुक्त समाजावर हल्ले करणाऱ्यां गुन्हेगारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

Social कट्टा कट्टा चाळीसगाव

धनगर समाज सेवा संस्थाची मागणीचं तहसीलदारांना निवेदन

चाळीसगांव (राज देवरे ) – भटक्या विमुक्त समाजावर हल्ले करणाऱ्या गुन्हेगारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा सदर केस फास्ट ट्रॅक वर चालून तसेच सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना नियुक्त करून गुन्हेगारांना फाशी देण्यात यावी व भटक्या विमुक्तांना ॲट्रॉसिटी सारख्या कायद्याचं संरक्षण देण्यात यावे असे विविध मागण्यांचे निवेदन धनगर समाज सेवा संस्थेच्यावतीने आज धनगर समाज सेवा संस्था महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नवनाथ ढगे यांच्या उपस्थित चाळीसगावचे तहसीलदार अमोल मोरे यांच्याकडे देण्यात आले.

निवेदनात म्हटल्याप्रमाणे, चिंचोली निपाणी (धनगर वाडी) ता. भोकरदन जिल्हा जालना येथे दिनांक 11/ 10 /2020 रोजी सायंकाळी सात वाजता एका शेतकरी मेंढपाळ रामदास खंडोबा जोशी यांच्यावर पूर्व वैमन्यस्य व रस्त्याच्या वहीवाटेवरून पूर्वनियोजित कट करून शेतात बकर्या, मेंढ्या गेल्याचे निमित्त साधुन 7/8 गावगुंडांना त्यांच्यावर क्रुरपणे कुऱ्हाडी सारख्या हात्याराने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले व त्याच्या पुतण्यच्याही अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना गंभीररित्या जखमी केले त्यातच दिनांक 7 /10 /2020 रोजी दुपारी तीन वाजता रामदास जोशी यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना निधन झाले.

त्यामुळे गावातील संपूर्ण समाज व त्यांचे कुटुंब भयभीत झाले आहे अशा घटनांना आळा घालण्यासाठी व भटक्या विमुक्तांना निर्भयपणे जगण्यासाठी अशा आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यामुळे आम्ही मागणी करतो की या घटनेमध्ये ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून केस फास्ट ट्रॅक वर चालवून सदरील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच वनविभाग कायदा व बॉम्बे कोर्ट फी स्टॅम्प अॅक्ट 1958 नुसार सदरील आरोपींवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच पीडित कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करून कुटुंबातील सदस्य शासकीय नोकरी देण्यात यावी अशी आम्ही मागणी धनगर समाज सेवा संस्थेच्यावतीने करीत आहे असे निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष नवनाथ ढगे, आबा रावते, स्वप्नील वैदकर धर्मराज बच्चे, महिला तालुकाध्यक्षा वैशाली जाणे (कादांळकर), समाधान जाणे, कैलास गढारी, रतन रावते, संजय गढारी, चेतन मोरे, रावसाहेब रावते, ज्ञानेश्वर सोनवणे, योगेश आगोणे, पंढरीनाथ रावते, गणेश पवार, सागर जानराव, भैय्या परदेशी, देवगन सोनवणे, रोशन रावते, राजीव ठोकरे, ऋषिकेश शिंदे, राजेंद्र साबळे, दगडू बच्छाव, नाना साबळे, दिनेश साबळे, ज्ञानेश्वर सोनवणे, देवचंद साबळे, संतोष बच्चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.