चाळीसगाव ( राज देवरे ) : चाळीसगाव धनगर समाज उन्नती मंडळ व धनगर समाज सेवा संस्थेमार्फत सिंधुताई सपकाळ (माई) यांना सामूहिक आदरांजली वाहण्यात आली.

अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले महिन्या भरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते त्यांच्यावर उपचार सुरु होते मात्र उपचार सुरू असतानाच सिंधुताईंना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत पुण्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे माई यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे 2021 साली पद्मश्री पुरस्काराने आणि 2010 साली राज्यस्तरीय राजमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्काराणी गौरवण्यात आले होते त्यांचे कार्य त्यांची समाजसेवा करिता हा पुरस्कार देण्यात आला होता राजमाता यांची शिकवण आणि त्यांचा विचार पुढे नेण्याचं काम सिंधुताई सपकाळ यांच्या विचार क्षमतेने व मायेच्या ममतेने संपूर्ण समाजाला दाखवून दिली होती.

माईंना राजमाता अहिल्यादेवी चौकात धनगर समाज उन्नती मंडळ व धनगर समाज सेवा संस्थे मार्फत आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अध्यक्ष साहेबराव नाना आगोणे, उपाध्यक्ष देविदास आगोणे, कायदा सल्लागार कैलास आगोणे, धनगर समाज सेवा संस्था तालुकाध्यक्ष बाप्पू लेणेकर, जिल्हाध्यक्ष शांताराम आगोणे, शहराध्यक्ष ऋषिकेश(आप्पा)देवरे, पप्पू साबळे व समाज बांधव व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *