चाळीसगावातील ढोमणे गावाचा पाणीप्रश्न मिटणार : आमदार मंगेश चव्हाण

Politicalकट्टा Social कट्टा कट्टा चाळीसगाव

चाळीसगाव प्रतिनिधी >> तालुक्यातील ढोमणे नळ पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनच्या कामाचे भूमिपूजन रविवारी तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते झाले. आपल्या स्थानिक विकास निधीतून त्यांनी या कामासाठी ८ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

तालुक्यातील ढोमणे गावाला घरोघरी नळ पाणीपुरवठा करणारी २५ वर्षांपूर्वीची पाइपलाइन खराब झाल्याने पाणी असूनदेखील नळाद्वारे पाणीपुरवठा करता येत नव्हता. त्यामुळे ढोमणे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. याबाबत गावाचे सरपंच किशोर पाटील, बाजार समिती सदस्य विश्वजीत पाटील व स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.

आ. चव्हाण यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून जुनी नळ पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन बदलून त्याजागी नवीन पाइपलाइन कार्यरत करण्यासाठी ८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. नव्या पाइपलाइनमुळे ढोमणे गावाची पाणीटंचाईचा प्रश्न सुटून प्रत्येक घरी नळाचे पाणी येणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. काम पूर्ण झाल्यानंतर गावाचा पाणी प्रश्न कायमचा मिटणार आहे.