चाळीसगांवातील सोडा वॉटरच्या नावाखाली अवैध दारू विक्रेत्याला अटक

क्राईम चाळीसगाव

चाळीसगाव राज देवरे ::> शहर पोलीस स्टेशन हद्दीतील शिवाजी घाटावरील सोडा वॉटरच्या नावाखाली सुरू असलेला अवैध दारू विक्रेत्याला 15 ऑक्टोबर 20 गुरुवार रोजी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनच पथकाने वतीने कारवाई करण्यात आली.

त्यामध्ये दारूविक्री करणारा आरोपी गजानन भिकन अहिरे वय- 35 वर्षे, राहणार- डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, चाळीसगाव हा त्याचे ताब्यात देशी टंगो संत्रा दारूच्या 22 बाटल्या, मॅकडोवेल नंबर वन, व्हिस्की व एमपेरिअल ब्लू व्हिस्कीच्या 30 बाटल्या चोरट्या विक्रीसाठी बाळगून असल्याचे मिळून आल्याने रक्कम रुपये 4769 ची देशी व विदेशी दारूच्या एकूण 52 बाटल्यांसह आरोपीला ताब्यात घेऊन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला आणून आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई, शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री विजयकुमार ठाकूरवाड यांचा मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे, पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव, पोलीस शिपाई विनोद खैरनार व विजय पाटील या पथकाच्या वतीने कारवाई केली आहे.

शहरातील सोडा वॉटरच्या नावाखाली अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर अशीच कडक कारवाई करणार असल्याचे चाळीसगांवचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी यावेळी सांगितले.