चाळीसगावतील वीस जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

चाळीसगाव सिटी न्यूज

चाळीसगांव (राज दोवरे ) :

शहरातील गजानन हॉस्पिटल रुग्णालयात उपचार घेणारा अमोदे ता.नांदगाव येथील ५५ वर्षीय पुरुष नाशिक येथे कोरोना पॉझिटिव निघाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. चाळीसगाव प्रशासनाने खबरदारी घेत हॉस्पिटल सिल करत डॉक्टर, कर्मचारी व उपचार घेत असलेले रुग्ण कोरोना बांधित रुग्णाच्या संपर्कात आल्याच्या संशयावरुन शहरातील डॉक्टारासह २० जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते सर्वांचे सॅब घेवून ते धुळे येथे तपासणी पाठविण्यात आले होते. आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाला तपासणीचा अहवाल आला असून सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची अधिकृत माहिती वैद्यकिय आधिकारी डॉ.डी.डी.लांडे यांनी दिली. चाळीसगावकरांनी मोकळा श्वास घेतला असता तरी खबरदारी घेणे गरजेचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *