चाळीसगावात मशाल रॅली काढणाऱ्या नगरसेवकांसह ३० जणांवर गुन्हा

Politicalकट्टा आंदोलन कट्टा चाळीसगाव

राज देवरे प्रतिनिधी चाळीसगाव >> आमदार मंगेश चव्हाण यांच्या अटकेच्या निषेधार्थ मशाल रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांमध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष, शहराध्यक्ष, नगरसेवक व माजी पं.स. सदस्यांचा समावेश आहे.

२७ रोजी सायंकाळी ७ ते ७.३० वाजे दरम्यान शहरात विश्रामगृह ते तहसील कार्यालय दरम्यान भाजपचे शहराध्यक्ष व नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांच्या नेतृत्वात आमदार चव्हाणांना जळगावला झालेल्या अटकेच्या निषेधार्थ मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

चाळीसगाव नगरसेवकांसह ३० जणांचा समावेश असलेल्या मशाल रॅलीत सहभागी झाले. त्या सर्वांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोहेकॉ गणेश पाटील यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला.