एकतर्फी प्रेमातून चाळीसगावात १८ वर्षीय तरूणीवर चाकू हल्ला

क्राईम चाळीसगाव

चाळीसगाव प्रतिनिधी >> एकतर्फी प्रेमातून तरूणीवर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना तालुक्यातील मेहुणबारे येथे घडली आहे.

मेहूणबारे (ता.चाळीसगाव) येथे १८ वर्षीय तरूणी ही राहते. ती चाळीसगाव येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून तिची घरासामोर राहणारा प्रशांत चौधरी याच्याशी तिची ओळख झाली. यातून त्याने प्रेमाची विचारणा केली असता तरूणीने नकार दिला. यानंतर त्याने त्रास देण्यास प्रारंभ केला.

यानंतर काल रात्री साडेआठच्या सुमारास प्रशांत याने तरूणीच्या घरात जाऊन चाकूने तरुणीवर वार केले. तरुणीने आरडाओरड केल्याने.तरुणीचा भाऊ धावत आला असता त्यालाही जखम झाली. नंतर मात्र तो पळून गेला. या प्रकरणी पीडित तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून प्रशांत चौधरी याच्या विरोधात तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.