कुऱ्हा काकोडा येथील सेंट्रल बँकेच्या गलथान कारभारामुळे खातेदारांना खूप मोठ्या त्रासाला जावे लागत आहे सामोरे

मुक्ताईनगर सिटी न्यूज

मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी >> येथील राष्ट्रीयकृत सेंट्रल बँक कुऱ्हा शाखेच्या सेंट्रल बँकेत एकूण ३६ गावे जोडलेली आहे. आणि या परिसरात ही एकमेव राष्ट्रीय कृत बँक आहे शासनाने संपूर्ण व्यवहारशेतकरी वर्गाचे सरकारी नोकरी वर्गाचं ग्रामपंचायतीचे शासनाचं येणारे अनुदान राष्ट्रीयकृत बँकांना अधिकृत केलेले आहे.

व्यापारी लोकांचे व्यवहार आणि कर्जदार शासनमान्यता बचत गट यांचे व्यवहार या सेंट्रल बँकेत आहे. संपूर्ण क्षेत्रातील नागरिकांना खातेदारांना या बँकेकडून बऱ्याच खातेदारांना अपमानास्पद वागणूक मिळत आहे.

आमचे व्यवहार होत नाही याचे कारण विचारले असता बँक कर्मचाऱ्याकडून उत्तर देण्यात येत नाही. मात्र काही नागरिकांना तर बँक कर्मचारी ऊधट व आर्वोच्चभाषेत बोलतात. तुम्हाला जेथे आमच्या तक्रारी कराची असेल तेथे करा. काही प्रतिष्ठित नागरिक यांना विचारणा केली असता व्यवहार बंद का आहे त्यांना ते सांगतात नेट बंद आहे. आम्ही काय करणार दिवसभरात दहा-पंधरा मिनिट काम करतात आणि नंतर आत मध्ये पाच वाजेपर्यंत बसून राहतात.

मात्र नागरिकाना कुठल्याच प्रकारची माहिती पण देत नाही. नागरिक महिला वृद्धापकाळ अपंग विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. सध्या देशात कोराना महामारी मुळे गेल्या ३ महिन्यापासून सर्वसामान्यांच्या हाताला काम नाही केंद्रसरकारने महिलांच्या जनधन खात्यात प्रत्येकी ५०० रुपये टाकले आहे.

परिसरातील महिला खातेदार यांना ५०० रुपये काढण्यासाठी बँकेत येत असतात आणि त्यांना पैसे मिळत नाही म्हणून उपासमारीची वेळआलेली आहे तर काही आपले खाते बंद पडलेले चालू करण्यासाठी बँकेच्या रोज चकरा मारतात मात्र बँकेचे कर्मचारी त्यांची दखल घेत नाही. आणि प्रिंटर मशीन खराब असल्याने खातेदारांना आपल्या खात्यामध्ये पैसे आले की नाही हे सुद्धा समजत नाही. हे कारण दोन महिन्यापासून खातेदारांना कर्मचारी सांगत आहे व महिला दिव्यांग जेष्ठ नागरिक रोज ८ वाजेपासून ते 3 वाजे पर्यंत खातेदार हजर असतात ,बँक व्यवस्थापनाने समोर सोशल डिस्टन्स साठी वर्तुळ आखणी केलेली नाही सॅनिटायझर चा वापर होत नाही.

वर्तुळात आपली पादत्राणे काढून एका ठिकाणी येऊन बसतात त्यामुळे बँकेकडून ग्राहकांची कोणतीही ही दखल घेतली जात नाही व ग्राहकांचे काम होत नसल्यामुळे बँकेसमोर रोज गर्दी वाढत आहे. त्यामुळे महिलावर्ग ज्येष्ठ नागरिक दिव्यांग विद्यार्थी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रकाराकडे, मुक्ताई नगर मतदार संघातील नवनिर्वाचित आमदार व रावेर लोकसभा मतदारसंघातील खासदार लक्ष देतील का ? व होणाऱ्या त्रासापासून नागरिकांना मुक्त करतील का? अशी कु-हाकाकोडा परिसरातील सुज्ञ नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *