युवकांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा

धडगाव प्रतिनिधी ::>पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रमांतर्गत तालुक्यातील उमराणी बुद्रुक येथील युवकांनी गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यावर वनराई बंधारा बांधला. तालुक्यातील उमराणी ब्रुद्रुक गावाजवळून चार नाले वाहतात. या नाल्याचे पाणी वाहून जाते. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाई जाणवते. या पार्श्वभूमीवर गावातील युवकांनी या नाल्यावर श्रमदानातून वनराई बंधारा बांधला. त्यामुळे पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. कृषीसेवक वामन पावरा, प्रा. […]

read more

धरणाचे पाणी शेतात गेल्याने शेतकऱ्यांना पाण्यात उभे राहून वेचावा लागतोय कापूस

शहादा प्रतिनिधी ::> तालुक्यातील सुसरी धरणाचे पाणी थेट गोदीपूर ते नवलपूर रस्त्यावर आल्याने हा रस्ताच पाण्यात बुडाला आहे. तसेच परिसरातील काही शेतातही पाणी साचल्याने शेतकऱ्यांवर कंबरे एवढ्या पाण्यात उतरून कापूस वेचणी करण्याची वेळ आली आहे. सुसरी धरणाच्या पाण्यामुळे गोदीपूर ते नवलपूर रस्ता पाण्याखाली गेल्याने गोदीपूर व नवलपूर शिवारात जाण्यासाठी शेतकऱ्यांना चार ते पाच किलोमीटरचा फेरा […]

read more

नवापूर तालुक्यात 6 वेळा कारवाई झाल्याने लाकूड तस्करांचे धाबे दणाणले तर लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त!

प्रतिनिधी नवापूर ::> नवापूर तालुक्यात वनविभागाने एकाच आठवड्यात सहा वेळा कारवाई करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने वनतस्करांचे धाबे दणाणले आहे. शुक्रवारी नवापूर तालुक्यातील रायंगण गावात घरावर छापा टाकत अवैध लाकूडसाठा जप्त केल्यानंतर काही तासांत तालुक्यात विजापूर येथे छापा टाकला. त्यानंतर शनिवारी पुन्हा वनविभागाने भवरे येथे घरावर छापा टाकत कारवाई केली. लागोपाठ वनविभागाची कारवाई सुरू […]

read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या !

नंदुरबार ::> तालुक्यातील वाघोदा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला नराधमाला फाशी देण्यात यावी, अशी मागणी टायगर ग्रुपने केली आहे. याविषयी पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. याविषयी टायर ग्रुपचे सदस्य आदित्य मनोज डोडवे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,वाघोदा येथील अल्पवयीन मुलीवर ३१ ऑगस्टला एका नराधमाने बलात्कार केला. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. याप्रकरणी संशयित […]

read more

शेतीच्या वादातून दगडफेक; मनस्तापातून एकाची आत्महत्या

नंदुरबार ::> शेतीच्या वादातून दगडफेक करण्यात झाली. या घटनेमुळे झालेल्या मनस्तापातून १७ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. धडगाव तालुक्यातील माळ चांदसैली गावात २ सप्टेंबरला दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली.शेतीच्या वादातून घरांवर दगडफेक करण्यात आली. त्याचा मनस्ताप झाल्याने अमन ब्रिजलाल वळवी (वय. १७ रा.माळ चांदसैली) याने आत्महत्या केली. या प्रकरणी देटका रोंदा वळवी, अनिता भरत वळवी, […]

read more

नंदुरबारच्या तरुणाचा दुचाकी स्लिप झाल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू

धुळे ::> नंदुरबार येथे दुचाकी स्लिप झाल्यामुळे जयेश प्रदीप गोसावी ( वय १९) हा तरुण जखमी झाला. त्याला शहरातील मालेगावरोड परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्याचा शनिवारी सकाळी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गोसावी कुटुंब कुसुंबा परिसरातील रहिवासी आहे. रोजगारासाठी ते नंदुरबारला गेले होते. मृतदेह कुसुंबा येथे नेत असल्याचे सांगण्यात आले.

read more

धुळे ११३ तर नंदुरबार जिल्ह्यात १२४ नवे रुग्ण

धुळे:>> जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ९ हजार १३ झाली असून, बुधवारी ११३ नवे रुग्ण समोर आले. तर चार बाधितांचा मृत्यू झाला. यात देवपुरातील दोन, भावसार कॉलनीमधील एक, साक्री तालुक्यातील गोराडे व शिंदखेडा तालुक्यातील परसामळ येथील प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यात १२४ नवे रुग्ण समोर आले.

read more

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश ; 15 सप्टेंबरपूर्वी नोंद करण्याचे आवाहन

यावल :>> आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणा-या इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल, पेठरोड, नाशिक, पिंप्रीसद्दोदिन, ता. इगतपूरी, नंदुरबार, ता. जि. नंदुरबार, अजमेर सौदाणे, ता. बागलाण, मवेशी, ता. अकोला, पिंपळनेर, ता. साक्री, टिटवे, डोगरसांगळी, चणकापुर, शिदेदिगर, धडगाव, अक्कलकुवा येथे सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 6 वीमध्ये तसेच इयत्ता 7 वी ते 9 वीच्या वर्गातील […]

read more

प्रशासनातील गोंधळामुळे कोरोनाचा फैलाव तर खान्देशात परिस्थिती अवघड

खान्देश रिपोर्ट >> नियमावलीच्या अंमलबजावणीत गोंधळ, अधिकाऱ्यांमधील सुप्त संघर्ष आणि चाचणीनंतर विलंबाने येणारे अहवाल हे घटक खान्देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत. नाशिकमध्ये जिल्हा प्रशासन आणि महापालिकेत फारसा समन्वय नाही. निर्बंध शिथिल करताना सुसूत्रतेचा अभाव, अंमलबजावणीत धरसोडवृत्ती, आरोग्य-महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील कलह आदींमुळे कोरोनावर नियंत्रण मिळवणे जिकिरीचे ठरत आहे. प्रशासन गोंधळलेल्या अवस्थेत आहे. नाशिकमधून अनेक […]

read more

कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव पदांच्या मान्यतेसाठी बेमुदत आंदोलनाचा आज चौथा दिवस

नवापूर प्रकाश खैरनार प्रतिनिधी >> महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव पद कृती समितीकडून वाढीव पदांच्या मान्यतेसाठी कालपासून (दि.१२) बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे. वाढिव पद कृती समितीच्या दि.८ जून रोजीच्या झालेल्या ऑनलाईन बैठकीमध्ये बेमुदत उपोषणाचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता. राज्यामध्ये आज कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १३०० शिक्षक वाढीव पदांवर कार्यरत आहेत. गेल्या पंधरा वर्षापासून हे शिक्षक […]

read more

आत्मक्लेश आंदोलनात हजारो शिक्षकांचा सहभाग घरी बसूनच केलेल्या आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद

नवापूर : प्रकाश खैरनार प्रतिनिधी : > राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे वतीने आपल्या महत्त्वांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठि शासनाच्या विरोधात आत्मक्लेश आंदोलन करून शासनावर तिव्र नाराजी व्यक्त केली विशेष म्हणजे हे आंदोलन घरि बसूनच झालयाने यात हजारो शिक्षकांनी सहभाग नोंदवला काहिनी वैयक्तिक तर काहिंनी आपल्या परिवारासह , विशेष म्हणजे आजच्या आंदोलनात महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी […]

read more

नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील वीज तंत्रज्ञाचा कुजलेल्या अवस्थेत घरात मृतदेह आढळला ; शेजारला दुर्गंधी येते असल्याने समजले..

नवापुर तालुक्यातील खांडबारा येथे महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग महावितरण कंपनीच्या नवापूर उपविभाग अंतर्गत खांडबारा येथे तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले योगेश मुरलीधर वाघ वय ३५ रा. सतीचे वडगाव ता. भडगाव जि. जळगाव हे गेल्या चार वर्षापासून तंत्रज्ञ म्हणून नोकरीत कार्यरत असून ते खांडबारा येथील बर्डीपाडा येथे एकटे रूम करून राहत होते. गेल्या महिन्याअखेर पासून ते महावितरण […]

read more

Nandurabar News : नंदुरबार जिल्ह्यातील महिलेने रेल्वेतच दिला बाळाला जन्म…

नंदुरबार > गुजरात राज्यातील जुनागढ येथे मजुरीसाठी गेलेले जिल्ह्यातील दीड हजारांवर आदिवासी मजूर आज श्रमिक एक्‍स्प्रेसने नंदुरबारमध्ये परतले. यात डोंगरगाव येथील महिलेने रेल्वेतच बाळाला जन्म दिला असून, तिची व बाळाची प्रकृती स्थिर आहे. या मजुरांना आपल्या गावी आणण्यासाठी पालकमंत्री ऍड. के. सी. पाडवी यांनी विशेष प्रयत्न केले. या सर्व मजुरांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ५२ […]

read more

लॉकडाऊनच्या कालावधीत नवापुर शहरात अवैध मद्यसाठा जप्त

प्रकाश खैरनारनवापूर – 06 मे रोजी सकाळी 07.00 वा. पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांना गुप्त माहिती मिळाली की, पांढऱ्या रंगाची SKODA FABIAगाडी क्र. MH.39 D 751 या गाडीत दारुची वाहतुक होत असुन सदरची कार ही गुजरात राज्यात जात आहे. अशी माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांनी सपोनि/धिरज महाजन यांना गावात पेट्रोलींग करुन सदर कारचा […]

read more

भारतातील कोणते रेल्वे स्टेशन आहे जेथे एकाच बाकावर बसलेले लोक दोन वेगवेगळ्या राज्यात आहेत?

देशातील सर्वात अद्वितीय रेल्वे स्टेशन, एकच बेंच दोन राज्यात विभागले गेले आहे हि कहाणी आहे एका अश्या रेल्वे स्टेशनची जिचा एक भाग महाराष्ट्रात आहे व दुसरा गुजुरात मध्ये. दोन राज्यांच्या वेगवेगळ्या हद्दीत वसलेल्या या स्टेशनमध्ये काय विशेष असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. चला सांगतो…वास्तविक, हे एकमेव रेल्वे स्टेशन आहे जे गुजरात-महाराष्ट्र सीमेला स्पर्श […]

read more