वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांनी घेतला गळफास

धुळे प्रतिनिधी >> साक्री तालुक्यातील कासारे येथील रहिवासी आरिफ हबीब पिंजारी (वय २८) या तरुणाने मेहेरगाव येथे राहत्या घरी गळफास घेतला. घटनेच्या वेळी त्याची पत्नी बाहेर गेली होती. ती परत आल्यावर आरिफ ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉ.अजय पावरा यांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी मनोहर बना […]

Read More

जिल्ह्यासह खान्देशातील २२ बेरोजगारांना नोकरीच्या बहाण्याने ६० लाखांची फसवणूक

पाचोरा प्रतिनिधी >> तालुक्यातील नगरदेवळ्यासह नाशिक, साक्री, सटाणा, शिरपूर येथील २० ते २२ बेरोजगार युवकांना लष्कर, रेल्वे, वन विभाग व सीआरपीएफमध्ये नोकरीस लावून देण्याच्या बहाण्याने ६० लाखांच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी नगरदेवळा येथील रहिवासी मुख्य आरोपी तथा सीआरपीएफ दलातील अधिकाऱ्याचा भाऊ सुरेश ईश्वर बागुल व अजय संजीव देशमुख या दोघांना पाचोरा पोलिसांनी ३ […]

Read More

मोठ्या भावाने केलेल्या मारहाणीत लहान भावाचा मृत्यू; मोठ्यावर खुनाचा गुन्हा दाखल

धुळे प्रतिनिधी >> साक्री तालुक्यातील गुंजाळपाडा येथे मोठ्या भावाने केलेल्या मारहाणीत लहान भाऊ विश्वास अहिरे यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मोठा भाऊ वेडू अहिरे याच्या विरोधात पिंपळनेर पोलिस ठाण्यात शुक्रवारी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पिंपळनेरपासून जवळ असलेल्या गुंजाळपाडा येथील विश्वास झिपरू अहिरे (वय ५२) हे नेहमीप्रमाणे सायंकाळी घरी आले. या वेळी ते शिवीगाळ […]

Read More

साक्री तालुक्यातील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

धुळे >> साक्री तालुक्यातील नवडणे येथे गळफास घेवून तरुणाने आत्महत्या केली. काळू मोरे असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी साक्री पोलिसात नोंद करण्यात आली आहे. नवडणे येथील काळू चांभाऱ्या मोरे ( वय २८) या तरुणाने घरामागे असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास लावून घेतला. सकाळी सात वाजता हा प्रकार समोर आला. या प्रकरणी ईश्वर रामा पवार यांच्या […]

Read More

सातव्या आर्थिक गणनेच्या कामाला सुरुवात : जिल्हाधिकारी संजय यादव

धुळे ::> धुळे जिल्ह्यात सातव्या आर्थिक गणनेच्या कामास सुरुवात झाली असून, नागरिकांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा आर्थिक गणनेचे चार्ज ऑफिसर संजय यादव यांनी केले आहे. जिल्हाधिकारी यादव यांनी म्हटले आहे, सातवी आर्थिक गणना केंद्र सरकारच्या सांख्यिकी व कार्यान्वयन मंत्रालयातर्फे घेण्यात येत आहे. या गणनेचे क्षेत्रकाम कॉमन सर्व्हिस सेंटर, ई-गव्हर्नन्स यांनी […]

Read More

१५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल

धुळे ::> साक्री तालुक्यातील मालपूर येथील १५ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने एकावर संशय व्यक्त केला आहे. मालपूर येथील १५ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही ती आढळली नाही. एटीडीचा अर्ज भरण्यासाठी जाते असे कारण सांगून ती घराबाहेर पडली होती. केतन उत्तम पानपाटील याच्या मोटारसायकलवरून जाताना पीडित मुलीला तिच्या […]

Read More

१७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले; गुन्हा दाखल

प्रतिनिधी ::> धुळे साक्री तालुक्यातील भाडणे येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेण्यात आले. या प्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. भाडणे गावातील इंदिरा नगरात राहणारी १७ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही आढळली नाही. याप्रकरणी शरद श्यामराव जाधव याचे नाव समोर आले. शरदने […]

Read More

अल्पवयीन मुलीला पळवून बलात्कार; एकाविरुद्ध गुन्हा

धुळे >> साक्री तालुक्यातील कासारे गावातील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला, अशी तक्रार पीडित मुलीच्या आईने दिली आहे. त्यावरून साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कासारे गावातील अल्पवयीन मुलीला सुनील सुरेश सोनवणे याने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. यानंतर तिला आसखेडा गावाजवळील जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला, अशी तक्रार […]

Read More

साक्री तालुक्यातील जैताणे येथे साडीने गळफास घेत तरुणाची आत्महत्या

प्रतिनिधी धुळे ::> साक्री तालुक्यातील जैताणे गावातील तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.जैताणे येथील विवेक हिरामण वाघ (वय २५) या तरुणाने राहत्या घरी छतास साडीने गळफास घेतला. दुपारी एक वाजेच्या सुमारास त्याचे वडील घरात आले असताना हा प्रकार समोर आला. त्यानंतर त्याला अत्यवस्थ परिस्थितीत जैताणे […]

Read More

लग्नकार्यात अडचणी येत असल्यामुळे नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

साक्री ::> तालुक्यातील निजामपूरपासून जवळ असलेल्या खुडाणे गावातील प्रवीण लक्ष्मण खैरनार ( वय २८) या तरुणाने राहत्या घरी दोरीने गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला अत्यवस्थ स्थितीत जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. उपचारांपूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. तपासणी करून डॉक्टरांनी प्रवीणला मृत घोषित केले. या प्रकरणी संदीप न्हानू खैरनार यांनी दिलेल्या माहितीवरून निजामपूर […]

Read More

साक्री तालुक्यातील कढरे शिवारात महिलेचा फास लावून केला खून

साक्री ::> तालुक्यातील कढरे शिवारातील जंगल भागात एका अज्ञात मोटारसायकलस्वाराने संगीताबाई होलार या महिलेचा साडीने गळफास लावून तिचा खून केल्याची घटना घडली. याबाबत रवी होलार याने तक्रार दिली असून, निजामपूर पोलिस ठाण्यात अज्ञात मोटारसायकलस्वार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलिस पथकाने दाखल होऊन परिसराची पाहणी केली. धुळे तालुक्यातील नंदाणे या गावाचे रहिवासी असलेल्या […]

Read More

नैसर्गिक विधीला जात असल्याचे कारण सांगून ती घराबाहेर पडली तर घरी आलीच नाही ; अपहरणाचा गुन्हा दाखल

धुळे ::> दोन वेगवेगळ्या घटनेत देवपुरातील गोंदूररोड परिसर व साक्री येथून दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेण्यात आले. गोंदूररोड परिसरातील १७ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. नैसर्गिक विधीला जात असल्याचे कारण सांगून ती घराबाहेर पडली होती. या परिसरात राहणाऱ्या रामलाल गोपीचंद बागुल याने आमिष दाखवून मुलीला पळवून नेल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने दिली आहे. त्यानुसार पश्चिम […]

Read More

२२ वर्षीय विवाहितेने गळफास घेत केली आत्महत्या

धुळे ::> साक्री तालुक्यातील मालपूर येथे नवविवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. आरती पवार असे मृत महिलेचे नाव आहे. साक्री तालुक्यातील दिघावे येथील आरती अशोक पवार ( वय २२) या पतीसह मालपूर गावात आल्या होत्या. तेथे राहणारे भटू सुखराम पवार यांच्याकडे आरतीला सोडून त्यांचे पती कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास भटू पवार […]

Read More

१६ वर्षीय अल्पवयीन मुलीला बुलेटवर बसवून नेले पळवून

धुळे ::> साक्री तालुक्यातील जामदा येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेले. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून निजामपूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामदा येथील १६ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही ती आढळली नाही. त्यानंतर गावातील नितेश जहांगीर चव्हाण याचे नाव समोर आले. नितेशने मुलीला काहीतरी आमिष दाखवले. या आमिषाला अल्पवयीन […]

Read More