‘मागून हल्ला केला, पुढून केला असता तर माझ्या यशने 3 जण तरी मारले असते’

रिड जळगाव टीम >> श्रीनगरमध्ये सेनेच्या गस्ती पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पिंपळगावच्या ता. चाळीसगाव २२ वर्षीय जवानाला गुरुवारी दुपारी वीरमरण आले. अवघ्या विशीत हौतात्म्य आलेल्या वीरपुत्राचे वडिल दिगंबर देशमुख यांनी मन हेलावून टाकणाऱ्या भावना व्यक्त केल्या. यश सप्टेंबर महिन्यात घरी आला होता. 2 ऑक्टोबरला परत गेला. 4 दिवसांपूर्वी फोनवर बोलणं झालं होतं, कसे आहात विचारलं […]

Read More

शेतमजुराची आत्महत्या ; जळगावात शेतमालकाविरुद्ध गुन्हा

जळगाव >> शेतमालक छोट्या कारणांवरुन शिवीगाळ करून मारहाण करीत होता. त्याचप्रमाणे बैलजोडी चोरल्याच्या संशयावरुन त्रास देऊन मजुरास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुरुवारी रात्री शेतमालकाविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंदा श्रावण बारी (रा.बारीवाडा, रथचौक पिंप्राळा) यांचा मृतदेह ११ ऑक्टोबर रोजी पिंप्राळा येथील शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. ते शेतमालक नीलेश लक्ष्मीनारायण […]

Read More

गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू तस्करी टोळीतील ७ आरोपी पोलिस कोठडीत रवाना

धरणगाव प्रतिनिधी >> तालुक्यातील बांभोरी प्र.चा. येथील गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या टोळीतील ७ जणांना धरणगाव पोलिसांनी गुरुवारी पहाटे अटक केली होती. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केल्यावर ३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. वाळू ठेकेदार तथा भाजप नगरसेवक कुलभूषण पाटीलसह १२ जणांवर गुन्हा दाखल केला. त्यापैकी डंपर चालक प्रमोद सुभाष चव्हाण (सावदे), […]

Read More

विद्यापीठातर्फे पदवी प्रमाणपत्राच्या अर्ज भरण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

जळगाव >> कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या २९ व्या दीक्षांत समारंभात ज्या विद्यार्थ्यांना पदवी/पदवीका प्रमाणपत्र घ्यावयाचे आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी १५ डिसेंबर, २०२० पर्यंत मुदतवाढ केली आहे. विद्यापीठातर्फे ऑक्टोबर, २०१९ व त्यापूर्वी घेतलेल्या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि पीएचडीधारक अशा सर्व विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या […]

Read More

जळगावात बुक केलेल्या प्लॉटमध्ये १२ जणांची १ कोटींवर फसवणूक ; गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी >> पिंप्राळा शिवारातील हप्त्याने बुक केलेले प्लॉट खरेदी करून न देता १२ जणांची १ कोटी ४८ लाख ९७ हजार ७०४ रुपयांमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. डॉ. उल्हास यशवंत बेंडाळे, निर्मला उल्हास बेंडाळे व विनायक यशवंत बेंडाळे (रा.रिंगरोड, जळगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. […]

Read More

शहीद जवान यश देशमुख यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

चाळीसगाव प्रतिनिधी >> श्रीनगरमध्ये हल्ल्यात शहीद झालेल्या चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान यश डिगंबर देशमुख यांच्या पार्थिवावर आज सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान यश दिगंबर देशमुख हे शहीद झाले आहेत. त्यांचे पार्थिव आज सायंकाळी साडेपाच वाजता नाशिक येथे पोहचले आहे. लष्कराची गार्ड टीम आज सकाळी ६ वा. त्यांचे पार्थिव […]

Read More

जळगावात १४ महिलांची साडे तेरा लाख रुपयांची फसवणूक

जळगाव प्रतिनिधी >> १४ महिलांची १३ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक करत बचत गटाच्या माध्यमातून लघू उद्योगासह पैशाचे आमिष दाखवत महिलांना गंडविले असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वत्सला रमेश पाटील (वय-५९) रा. आदर्श नगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संगीता नीरज जोशी, नीरज जोशी, जागृती नीरज जोशी, संतोष जयनारायण […]

Read More

जळगावात दारू पिण्यासाठी पैसे मागत रिक्षाचालकावर चॉपरने हल्ला

जळगाव >> गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाने दारू पिण्यासाठी पैसे मागत एका रिक्षाचालकावर चॉपरने हल्ला केला. तसेच रिक्षाचालकाच्या पत्नीस शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. २५ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता शिवाजीनगर हुडको भागात ही घटना घडली. पोलिसांनी या गुन्हेगारास अटक केली आहे. गजानन बाविस्कर (रा. शिवाजीनगर हुडको) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. शिवाजीनगर हुडको भागात […]

Read More

नशिबादजवळच्या शोरूममधील विम्याच्या पैशांचा अपहारप्रकरणी दोघांवर गुन्हा

नशिराबाद >> जळगाव-भुसावळ रोडवरील नशिबादजवळच्या सरस्वती फोर्ड या चारकीच्या शोरुमध्ये विमा भरण्यासाठी आलेल्या ग्राहकाचे पैसे जमा न करता कॅशिअर आणि महिला कर्मचाऱ्याने अपहार केला तसेच शोरूम मालकाची फसवणूक आणि दमदाटी करत शिवीगाळ केल्याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरस्वती फोर्ड शोरुममधील दीपा बबन पाटील उर्फ दीपा विलास पाटील ही महिला इन्शुरन्स एक्सिकेटीव्ह […]

Read More

चाकूचा धाक दाखवत दुकानदारास लुटणाऱ्या दोघांना अटक

जळगाव प्रतिनिधी >> कपाट खरेदीचा बहाणा करून दुकानात शिरलेल्या दोन भामट्यांनी दुकानदारास चाकूचा धाक दाखवत पैसे व मोबाइल लांबवले होते. २ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३० वाजता शाहूनगर भागात ही घटना घडली होती. या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयितांना गुरुवारी अटक केली. दीपक चैनराज ललवाणी (वय ३२, रा. मुसळी फाटा, ता. धरणगाव) व दीपक […]

Read More

चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगावचा जवान अतिरेकी हल्ल्यात शहीद

चाळीसगाव प्रतिनिधी >> श्रीनगरमध्ये सेनेच्या गस्ती पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पिंपळगावच्या (ता. चाळीसगाव) २२ वर्षीय जवानाला गुरुवारी दुपारी वीरमरण आले. यश दिगंबर देशमख असे या शहीद झालेल्या सुपुत्राचे नाव आहे. घटनेनंतर पिंपळगाव येथे त्यांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून माहिती मिळताच त्यांच्या आईला धक्का बसून त्या बेशुद्ध झाल्या. घटनेमुळे तालुक्यात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. यश […]

Read More

रावेर बीडीओंनी धुडकावला जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

रावेर प्रतिनिधी >> महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ५१ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हांतर्गत ७ नोव्हेंबरला बदल्या केल्या आहेत. येथील पंचायत समितीत यावल येथून सहायक कार्यक्रम अधिकारी दिनेश अंजाळे यांची बदली झाली आहे. ते ११ तारखेला येथे हजर होण्यासाठी आले असता बीडीओ दीपाली कोतवाल यांनी त्यांना हजर करून घेतले नाही. […]

Read More

चोपडा तालुक्यातून अट्टल घरफोड्याला एलसीबीकडून अटक

चोपडा प्रतिनिधी >> तालुक्यातील सुटकार येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोड्या व दुचाकी चोरी करणाऱ्या संशयिताला मंगळवारी ताब्यात घेतले आहे. प्रदीप लोटन कोळी (वय २७ रा.सुटकार ता.चोपडा) असे त्याचे नाव आहे. सुटकार गावातील युवक जळगाव व चोपडा शहरात घरफोडी करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी […]

Read More

भादली खुर्दमध्ये वृद्धाची गळफास लावून आत्महत्या

भादली प्रतिनिधी >> जळगाव तालुक्यातील भादली खुर्द येथे मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास ७५ वर्षीय वृद्धाने घरातील पंख्याला साडीने गळफास लावून आत्महत्या केली. रघुनाथ पांडुरंग पाटील (वय ७५, रा. भादली खुर्द) असे मृताचे नाव आहे. त्यांचा मृतदेह कुटुंबीयांना पंख्याला साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर कुटुंबीयांनी आक्रोश केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व […]

Read More

जळगाव जिल्हा 24 नोव्हेंबर आजचे कोरोना अपडेटस वाचा थोडक्यात!

जळगाव >> जिल्ह्यात आज दिवसभरात 37 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 52484 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 460 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 57 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 54234 झाली. आतापर्यंत 1290 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Read More

जळगावात शेतकऱ्याची १ लाख ३० हजारात फसवणूक ; गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी >> शहरातील एका शेतकऱ्याची १ लाख ३० हजार रुपयांत फसवणूक केल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थोडक्यात माहिती अशी की, जळगावातील रहिवासी अशोक विश्वनाथ बारसे (वय-५०) रा. बारसे कॉलनी, स्मशानभूमीजवळ शिवाजी नगर हे शेतकरी आहेत. शेतीच्या कामासाठी त्यांना ट्रक्टरची आवश्यकता असल्याने त्यांचा मित्र धनराज भगवान करे रा. जळका […]

Read More

जिल्ह्यात ७ डिसेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू

जळगाव >> जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, सार्वजनिक शांततेचा भंग होवू नये. यासाठी ७ डिसेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) लागू करण्यात आले आहे. या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास, पूर्व परवानगीशिवाय सभा घेणे, मिरवणूक काढण्यास बंदी आहे. […]

Read More

जळगाव जिल्हा 22 नोव्हेंबर कोरोना अपडेट्स ; वाचा थोडक्यात!

जळगाव >> जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 43 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 52408 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 418 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 64 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 54112 झाली. आतापर्यंत 1286 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. खालील लिंकवर जाऊन क्लिक करा.

Read More

जिल्ह्यात 7 डिसेंबरपर्यंत सर्व शाळा राहणार बंद ; जिल्हाधिकारी राऊत यांचा आदेश

जळगाव प्रतिनिधी>> जिल्ह्यासह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यातील ९ वी ते १२ वी पर्यंतचे सर्व वर्ग ७ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज काढले आहे. गेल्या महिन्याभरापासून २३ नोव्हेंबर पासून ९ वी ते १२ वी चे वर्ग सुरू करण्याबाबत राज्य शासनाने निर्णय घेतला होता. मात्र दिवाळीच्या कालावधीत […]

Read More

जळगावात घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक ; २४ पर्यंत पोलीस कस्टडी

जळगाव प्रतिनिधी >> शहरातील वाघुळदे नगरातील घरफोडी करुन एलसीडी टीव्ही, मोबाईल, बॅग, बँकेचे पासबुक, दान पेटी व इतर साहित्य लांबविणार्‍या तीन संशयितांना शनिवारी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तिघांना आज न्यायालयात हजर केले असता २४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विठ्ठल उर्फ सोन्या अशोक लोंडे (25), पंकज उर्फ गोलु समुद्रे (22) व […]

Read More