जळगावात विवाहितेचा दोन लाख रुपयांसाठी छळ

जळगाव >> सदगुरूनगरातील विवाहितेस सासरच्यांनी २ लाख रुपयांसाठी छळ व मारहाण केली. ही घटना १० मार्च २०१९ ते २८ मे २०१९ दरम्यान घडली. या प्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध एमआयडीसीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

भुसावळात महिलेसह पाच जणांची अत्याचारप्रकरणी चौकशी

भुसावळ प्रतिनिधी >> मध्य प्रदेशातील खरगोन येथील ३५ वर्षीय महिलेवर भुसावळात सोमवारी (दि.२२) रात्री एका तरुणाने अत्याचार केले होते. या आरोपीच्या तपासासाठी तीन पोलिस पथके सक्रिय आहेत. गुरुवारी एका महिलेसह पाच संशयितांची चौकशी करण्यात आली. खरगोन येथील ३५ वर्षीय महिला भुसावळात आली होती. एका अनोळखी तरुणाने तिला दुचाकीवरून ट्रामा केअर सेंटर मागील निर्जन स्थळी नेत […]

Read More

आईस्क्रीम पार्लरमध्ये प्रेमीयुगलांना एकांत, चालकावर कारवाई

धुळे प्रतिनिधी >> आईस्क्रीम पार्लरच्या नावाखाली प्रेमीयुगुल यांना एकांत करुन देणाऱ्या हॉटेलवर धुळे शहर पोलिंसानी कारवाई केली. या वेळी दोन तरुण व तरुणी या हॉटेलध्ये मिळून आलेत. धुळे शहर पोलिसात याबबत नोंद करण्यात आली आहे. साक्री रोडला लागून असलेल्या गौरव आईस्क्रीम पार्लर या ठिकाणी प्रेमी युगुलांना बसण्यासाठी खास सोय करण्यात आली आहे. अशी माहिती पोलिसांना […]

Read More

जळगावच्या डी-मार्टला ५० हजार रुपये ठोठावला दंड

जळगाव प्रतिनिधी >> कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात असताना डी-मार्ट या मॉलमध्ये प्रचंड गर्दी आढळून आली होती. त्यामुळे महापालिकेने मंगळवारी डी-मार्टला सील ठोकले होते. याप्रकरणी पालिकेने डी-मार्टला ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. तसेच शुक्रवारी बोर्ड ऑफ डायरेक्टरविरूध्द गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे उपायुक्त संतोष वाहुळे यांनी सांगितले. मनपाने बुधवारी डी-मार्ट प्रशासनाला नोटीस बजावल्यानंतर […]

Read More

वरिष्ठ लिपिकाला ७०० रुपयांची लाच भोवली ; गुन्हा दाखल

पाचोरा >> येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाने ७०० रुपयांची लाच मागितली असता एका तक्रारदाराने शेतमिळकती व घरमिळकतींच्या उताऱ्यांचे मुल्यांकन दाखला मिळणेसाठी अर्ज केला होता. मुल्यांकन दाखला देण्याच्या मोबादल्यात लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने आज त्याला रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वृत्त असे की, तक्रारदार यांनी पाचोरा न्यायालयात […]

Read More

जळगावात हळदीच्या कार्यक्रमात डीजे जप्त ; गुन्हा दाखल

जळगाव >> आशाबाबानगर येथे २३ रोजी रात्री हळदीच्या कार्यक्रमात बेकायदेशीरपणे डीजे वाजवल्याने पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करीत डीजे जप्त केला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ५० पेक्षा जास्त नागरिकांनी सार्वजनिक कार्यक्रमात गर्दी करू नये असे स्पष्ट आदेश असताना नागरिकांकडून त्यांचे उल्लंघन केले जात आहे. २३ रोजी रात्री आशाबाबानगर येथे बापूराव श्रावण पाटील यांनी हळदीचा कार्यक्रम आयोजित केला होता. […]

Read More

रात्री नऊ वाजेनंतरही सुरू असलेल्या दोन बियरबारवर कारवाई

जळगाव प्रतिनिधी >> कोरोना रोखण्यासाठी प्रशासन विविध पातळ्यांवर काम करीत आहेत. नियम तयार करीत आहेत. अशात बियरबार, हॉटेल्स यांना रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या बसस्थानक परिसरातील हॉटेल श्री स्टार पॅलेस व कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेल जलपरी यांच्यावर २३ रोजी रात्री कारवाई करण्यात आली. गर्दी टाळण्यासाठी हॉटेल्स व बियरबारमध्ये […]

Read More

‘तू लग्न कसे करते ते पाहतो’ असे म्हणत तरुणीला लग्नाच्या दोन दिवस आधी धमकी

प्रतिनिधी जळगाव >> दोन दिवसांवर लग्न येऊन ठेपलेल्या एका तरुणीस ‘तू लग्न कसे करते ते पाहतो’ असे म्हणत तरुणाने धमकी देऊन विनयभंग केला. ही घटना जळगाव तालुक्यात मंगळवारी सायंकाळी ७ वाजता घडली. रोहन साहेबराव सपकाळे (रा. अंजाळे, ता. यावल) या तरुणाने तरुणीला धमकी दिली आहे. रोहन हा गेल्या अनेक दिवसांपासून या तरुणीची छेड काढतो आहे. […]

Read More

करमाड येथे दोन भावांना किरकोळ कारणाने मारहाण

पारोळा >> कट मारल्याच्या कारणावरून जाब विचारल्याने दोन जणांना मारहाण झाल्याची घटना करममाड येथे २३ रोजी घडली. याप्रकरणी दोन महिलांसह एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. दीपक साहेबराव पाटील हे पत्नीसह शेतातून दुचाकीने घरी येत होते. वाटेत ज्ञानेश्वर लोटन पाटील याने त्याच्या वाहनाने दीपक पाटील यांच्या दुचाकीला कट मारला. घटनेनंतर ज्ञानेश्वर पळून गेला. या घटनेनंतर […]

Read More

कर्ज, नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

पाडळसरे >> येथून जवळच असलेल्या सबगव्हाण येथील जिजाबराव माधवराव पाटील (वय ४५) या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून, बुधवारी सकाळी ९ वाजता स्वत:च्या शेतात निंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत जिजाबराव पाटील यांच्याकडे सहा बिघे कोरडवाहू शेती आहे. त्यात त्यांनी यंदा कापूस लागवड केली होती. मात्र, बोंडअळी आणि अतिवृष्टीमुळे त्यांना कपाशीचे अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. […]

Read More

भुसावळ-कंडारीत ३० वर्षीय युवतीची आत्महत्या

भुसावळ >> शहरालगतच्या कंडारी येथे अंजली किसन वाघमारे (वय ३०) या युवतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. नागसेन कॉलनीतील रहिवासी अंजली किसन वाघमारे या युवतीने रविवारी दुपारी ४ वाजता आत्महत्या केली. सहायक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, हवालदार नागेंद्र तायडे, विकास बाविस्कर यांनी घटनास्थळी पंचनामा केला. […]

Read More

पत्नी माहेरी गेलेली असताना पतीची राहत्या घरात आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी >> पिंप्राळा येथे पत्नी मुलांसह माहेरी गेलेली असताना पतीने स्वत:च्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. अनिल शंकर पाटील (वय ३८, रा. पिंप्राळा) असे मृत प्रौढाचे नाव आहे. अनिल हा व्यवसायाने प्लंबर होता. त्याची पत्नी ही दोन मुलांसह माहेरी निघून गेलेली आहे. शनिवारी रात्री […]

Read More

प्रेमविवाहाला कुटुंबीयांनी नकार दिल्याने प्रेमीयुगुलाने घेतले विष

जळगाव प्रतिनिधी >> मोठ्या बहिणीच्या दिरावर दीड वर्षांपासून प्रेम जडले. पण त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबीयांनी प्रेमविवाहाला नकार दिला. त्यामुळे युवतीसह युवकाने १९ जानेवारी रोजी ममुराबाद शिवारातील शेतात दुपारी दीड वाजता विषारी द्रव प्राशन केले. त्यात ब्रेनडेड झालेल्या युवतीचा उपचारादरम्यान रविवारी सकाळी सव्वाआठ वाजता रुग्णालयात मृत्यू झाला. युवकाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. मोहिनी […]

Read More

नोकरीचे आमिष; भुसावळच्या तरुणीस ९३ हजारांत गंडवले

जळगाव >> ‘एअर इंडिगो’ या विमान कंपनीत नोकरीचे आमिष देत भामट्याने तरुणीस ९३ हजार २५० रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला. ८ ते १८ जानेवारी दरम्यान ही घटना घडली. पूजा बजरंग कुमावत (वय २१, रा. भुसावळ) असे फसवणूक झालेल्या तरुणीचे नाव आहे. अमित मित्तल नावाच्या भामट्याने पूजाच्या जीमेल आयडीवर नोकरीचे आमिष दिले. तिचा मोबाइल क्रमांक घेऊन एअर […]

Read More

चाळीसगावच्या तरुणाचा भरधाव ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू

चाळीसगाव प्रतिनिधी >> नाशिकहून आईस भेटण्यासाठी येत असलेला मुलगा हिरापूर रेल्वे स्थानक जवळ भरधाव ट्रकच्या धडकेत जागीच ठार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील चितेगाव येथील विश्वास उत्तमराव शितोळे ( वय ४४) असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव असून नाशिक येथे महिंद्रा कंपनीत […]

Read More

२४ वर्षीय विवाहित तरुणाने अडीचला केले मतदान अन ३ वाजता गळफास घेत आत्महत्या

चाळीसगाव प्रतिनिधी >> ग्रामपंचायतीसाठी मतदान केल्यानंतर अवघ्या अर्धा तासाने वडगाव लांबे (ता.चाळीसगाव) येथील २४ वर्षीय विवाहित तरुणाने घरात गळफास घेत आत्महत्या केली. सचिन डोंगरसिंग घोरपडे असे मृत तरूणाचे नाव आहे. दुपारी २.३० च्या सुमारास सचिनने मतदान केले. तेथून घरी परतल्यावर त्याने आई व मोठ्या वहिनींना मतदानासाठी पाठवले. यावेळी सचिनचे वडील व भाऊ शेतात गेले होते. […]

Read More

विटेनरला तरुण शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू

जळगाव >> शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या राकेश हिंमत जाधव (वय २४, रा. विटनेर, ता. जळगाव) या तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास विटनेर शिवारात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राकेश जाधव हा तरुण विटनेर येथे कुटुंबियांसह वास्तव्यास होता. गॅरेज चालवून व सोबत […]

Read More

वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांनी घेतला गळफास

धुळे प्रतिनिधी >> साक्री तालुक्यातील कासारे येथील रहिवासी आरिफ हबीब पिंजारी (वय २८) या तरुणाने मेहेरगाव येथे राहत्या घरी गळफास घेतला. घटनेच्या वेळी त्याची पत्नी बाहेर गेली होती. ती परत आल्यावर आरिफ ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉ.अजय पावरा यांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी मनोहर बना […]

Read More

‘तुला मुलीच होतात’ या कारणावरुन विवाहितेचा छळ; ६ जणांवर गुन्हा

जळगाव >> ‘तुला मुलीच होतात’ या कारणावरुन विवाहितेचा पतीसह सासरच्या लोकांनी छळ केला. गितांजली उर्फ भावना संदीप चौधरी (रा. भवरखेडा, ता. धरणगाव) असे विवाहितेचे नाव आहे. त्यांना दोन मुली आहेत. दरम्यान, या कारणावरुन तिचा पती संदीप चौधरीसह सासरच्या ६ जणांनी सातत्याने मारहाण करुन छळ केला. तसेच घर बांधणे व प्लॉट घेण्यासाठी माहेराहून तीन लाख रुपये […]

Read More

हिस्ट्रीशीटर महिलेचा एसपींच्या कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव प्रतिनिधी >> पिंप्राळा हुडकोतील हिस्ट्रीशीटर महिलेने जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय परिसरात अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.४५ वाजता ही घटना घडली. शारदा श्रावण मोरे असे या महिलेचे नाव आहे. तिचा मुलगा गौरव सुरवाडे याचे ११ जानेवारी रोजी कोणीतरी अपहरण केले. या संदर्भात शारदा मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रामानंदनगर […]

Read More