गावठी हातभट्टी उध्वस्त, एकाला अटक ; फैजपूर पोलिसांची कारवाई

मयूर मेढे, फैजपूर, फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कासवे (ता. यावल) शिवारातील तापी नदीच्या पात्रात सार्वजनिक ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू गाळण्याची भट्टी फैजपूर पोलिसांनी नष्ठ करत एकाला ताब्यात घेतले आहे. यावेळी कच्चे रसायन व दारु तयार करण्याचे साहित्य म्हणजेच २१.५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जगन कौतुक तायडे (रा.कासवे) […]

Read More

चोपडा शहरात दीड लाखाचा गुटखा जप्त

प्रतिनिधी चोपडा >> शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पाटीलगढी भागात गुरुवारी सकाळी पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दिड लाखांचा गुटखा व साडेतीन लाखाची रिक्षा असा एकूण पाच लाखाचा मुद्देमाल रंगेहाथ पकडून जप्त केला आहे. पाटील गढी भागात गुरुवारी सकाळी गुटखा व सुगंधित पान मसाल्याची रिक्षा येत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना मिळाली हाेती. […]

Read More

ट्रिपल सीट दुचाकीस्वाराची पोलिसाला मारहाण

प्रतिनिधी भुसावळ >> शहरातील खडकारोड परिसरात ट्रिपलसीट फिरणाऱ्या दुचाकीस्वारान पोलिसासोबत हुज्जत घालत मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी शहर वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी श्रीकृष्ण चाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कृष्णाकुमार उदयसिंग याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा, बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुरूवारी रात्री दाखल झाला. पोलिस कर्मचारी श्रीकृष्ण चाटे हे कर्तव्यावर असताना संशयित कृष्णाकुमार उदयसिंग दुचाकीवर […]

Read More

वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

प्रतिनिधी जळगाव >> शहरात वेगवेगळ्या घटनेत दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही प्रकरणात संबधित पोलिस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत म्हसावद गावातील खडसे नगरात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीस ७ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता साहिल जावेद (रा. म्हसावद) या तरुणाने फुस लावून रिक्षेत बसवून पळवून नेले. या […]

Read More

अवैध दारू विक्रेत्यांवर छापा, दोन महिलांकडून मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी जळगाव >> शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात अवैध गावठी दारु विक्री करणाऱ्यांवर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. यात दोन महिलांकडून सुमारे ८ हजार ९५८ रुपयाची गावठी व देशी दारु जप्त करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुप्रीम कॉलनी परिसरातील सोमन बलवीर कंजर या महिलेला तिच्या घरासमोरील मोकळ्या जागेत विनापरवाना देशी व […]

Read More
civil jalagaon

जीएमसीचा हलगर्जीपणा, आदिवासी रुग्णाचा मृत्यू ; मृताच्या नातेवाइकांचा आरोप

प्रतिनिधी जळगाव >> चोपडा तालुक्यातील कोरोना बाधित आदिवासी रुग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला, हलगर्जीपणाने व आदिवासी असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज मिळावे, अशी मागणी करत शहर पोलिस ठाण्यासह राज्यपालांकडे तक्रार केली आहे. प्रदीप पावरा यांना २९ मार्च रोजी सकाळी श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने […]

Read More

नशिराबादला ४३ वर्षीय प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

प्रतिनिधी नशिराबाद >> मुक्तेश्वर नगरातील ४३ वर्षीय प्रौढाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. ते पाहून कुटूंबियांनी एकच आक्रोश केला. याबाबत सुधाकर धोबी यांच्या खबरी वरून नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सुनील दत्तु बोदडे हे सकाळी पत्नीला कामावर सोडुन घरी आले आणि गळफास घेतला. त्यांच्या भाच्याच्या […]

Read More

आमदार मंगेश चव्हाण यांना दर सोमवार, मंगळवारी लावावी लागणार चाळीसगाव पोलिस ठाण्यात हजेरी

प्रतिनिधी जळगाव >> महावितरणचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुक शेख यांना मारहाण केल्याप्रकरणी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांना सोमवारी जिल्हा न्यायालयाने अटीशर्तींवर जामीन मंजूर केला. न्यायाधीश छाया पाटील यांच्या न्यायालयात आमदार चव्हाण यांच्यासह सर्व संशयितांच्या जामीन अर्जावर दोन्ही पक्षांचे युक्तिवाद १ एप्रिल रोजी पूर्ण झाले होते. दरम्यान, सोमवारी न्यायालयाने सर्वांना जामीन अर्ज मंजूर केले. […]

Read More

पैशांसाठी विवाहितेवर सासरच्यांचे सुरीने वार

प्रतिनिधी जळगाव >> घराचा हप्ता भरण्यासाठी विवाहितेने माहेराहून दरमहा २० हजार रुपये आणावे अशी मागणी करीत सासरच्या लोकांनी विवाहितेवर सुरीने वार केल्याची घटना ४ एप्रिल रोजी वाघनगरात घडली. प्रियंका सागर इंगळे यांचे लग्न वाघनगर परिसरातील कोल्हे हिल्स येथील सागर संजय इंगळे यांच्यासोबत सन २०१९ मध्ये झाले. सुरुवातीच्या सहा महिन्यांनंतर पतीसह सासरच्यांनी घराचा हप्ता भरण्यासाठी प्रियंकाने […]

Read More

लग्नात ५० पेक्षा जास्त वऱ्हाडी आल्याने येवतीला वधू पित्यावर गुन्हा दाखल

प्रतिनिधी बोदवड >> तालुक्यातील येवती येथे रविवारी लग्नसमारंभात ५० पेक्षा जास्त वऱ्हाडी आढळल्याने सरपंचांच्या तक्रारीवरून लग्न आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नात डीजे लावून समारंभ सुरू होता. तेथे शंभर ते दीडशे वऱ्हाडी जमले होते. त्यामुळे सरपंच संजय पाटील यांच्या फिर्यादीवरून वधूचे वडील भारत बोदडे, भगवान सोनवणे (रा.येवती), विकास झनके, राहुल भारंबे, मिलिंद पाटील (रा.दुधलगाव […]

Read More

धामणगाव येथे २३ वर्षीय महिलेने केली आत्महत्या

जळगाव >> तालुक्यातील धामणगाव येथे राहणाऱ्या दुर्गाबाई दीपक कोळी (वय २३) यांनी तीन एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजेपूर्वी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमगाचे कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक कासार या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Read More

दारू पिण्यास पैसे न दिल्याने तरुणाच्या डोक्यात मारली फरशी

प्रतिनिधी जळगाव >> दारू पिण्यास पैसे न दिल्याचा राग आल्यामुळे एकाने तरुणाच्या डोक्यात फरशी मारली. एक एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता गेंदालाल मिल परिसरात ही घटना घडली. मोहसीन बेग अल्ताफ बेग (वय २९, रा. गेंदालाल मिल) असे जखमी तरुणाचे नाव आहे. मोहसीन बेग हे रिक्षाचालक आहेत. ते गेंदालाल मिल परिसरात असताना फिरोज शहा याने त्यांच्याकडे […]

Read More

रावेर तालुक्यातील २७ वर्षीय विवाहितेवर अत्याचार

प्रतिनिधी रावेर >> तालुक्यातील केऱ्हाळा बुद्रूक येथील २७ वर्षीय विवाहितेवर त्याच गावातील व्यक्तीने लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून अरुण सुभाष प्रजापती याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. आरोपी मात्र पसार झाला आहे. केऱ्हाळा बुद्रूक येथील २७ वर्षीय पीडित विवाहिता २६ मार्चला दुपारी १२ वाजता अरुण सुभाष प्रजापती याच्या राहत्या घराच्या छतावर दाळ वाळत घालण्यासाठी […]

Read More

अनोळखी तरुणाचा मेहरुण तलावात बुडून मृत्यू

जळगाव >> मेहरुण तलावात बुडून अनोळखी तरुणाचा मृत्यू झाला. ३१ मार्च रोजी सायंकाळी या तरुणाचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. या तरुणाचे वय अंदाजे २८ एवढे आहे. दरम्यान, या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस या तरुणाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गुरुवारी रात्रीपर्यंत ओळख पटलेली नव्हती. मेहरुण परिसरातील नागरिकांना […]

Read More

६० वर्षीय शेतकऱ्याचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू

पारोळा >> तालुक्यातील लोणी खुर्द येथील एका ६० वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीच्या पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना ३१ मार्चला घडली. लोणी येथील गुलाब खंडू पाटील असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. लोणी येथील संजय पाटील यांना गुलाब पाटील यांचा मृतदेह परशूराम पाटील यांच्या विहिरीत दिसून आला. तर विहिरीच्या काठावर गुलाब पाटील यांनी कपडे, चप्पल काढून ठेवले होते. […]

Read More

तांबापुरा भागातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले

प्रतिनिधी जळगाव >> तांबापुरा परिसरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना ३० मार्च रोजी रात्री १० ते १.४५ वाजेच्या सुमारास घडली. मुलीच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवार २९ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास मास्टर कॉलनीतील तावेश ऊर्फ ताबू (पूर्ण नाव माहित नाही) याने १७ वर्षांच्या मुलीला फूस व आमिष दाखवत […]

Read More

३५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग; नशिराबादमध्ये दोघांविरूद्ध गुन्हा

जळगाव >> वाद सोडवण्यासाठी गेलेल्या ३५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील भादली येथे २९ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता घडली. भादली येथे पती-पत्नी घरी होते. जुन्या भांडणाच्या कारणावरून मनोज सुरेश सपकाळे याने दारूच्या नशेत शिवीगाळ व महिलेचा विनयभंग केला. मनोजच्या आईने शिवीगाळ करून मारहाण केली. विवाहितेच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध नशिराबादला गुन्हा दाखल झाला.

Read More

२० वर्षीय तरुणीस लग्नाचे आमिष देऊन अत्याचार करणाऱ्या आरोपीस १० वर्षे सक्तमजुरी

प्रतिनिधी जळगाव >> शहरातील २० वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीशी जवळीक करून तिला लग्नाचे आमिष दिले व सातत्याने तिच्यावर अत्याचार केले. ती गर्भवती राहिल्यानंतर तरुणाने लग्नास नकार दिला. अखेर त्या विद्यार्थिनीने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने बुधवारी आरोपीस दोषी धरुन १० वर्षे सक्तमजुरी व तीन लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. जयकुमार अशोक सोनवणे […]

Read More

२० वर्षीय तरुणीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

प्रतिनिधी जळगाव >> म्हसावद येथील एका तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. २७ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता ही घटना उघडकीस आली. सोनाली बाळू महाजन (वय २०, रा. म्हसावद) असे मृत तरुणीचे नाव आहे. सोनाली हीने २७ रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर कुटुंबियांनी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व […]

Read More

अनैतिक संबंधाबाबत जाब विचारल्याने पत्नीस मारहाण

प्रतिनिधी जळगाव >> गणपतीनगरातील माहेर असलेल्या ३३ वर्षीय विवाहितेच्या पतीने विवाहबाह्य अनैतिक संबध ठेवले. तसेच पैसे मागत पत्नीचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गणपती नगरातील तरुणीचे नवापूर तालुक्यातील पानबारा येथील तरुणाशी सन २०१५ मध्ये लग्न झाले. तिच्या पतीचे परस्त्रीशी संबंध असल्याची माहिती विवाहितेला समजली. याचा जाब तिने पतीस विचारला […]

Read More