साकळीत दोन दिवसीय कडकडीत लॉकडाऊन ठेवला जाणार का ?

साकळी ता.यावल (वार्ताहर) जिल्हाधिकारी जळगाव यांचे आदेशानुसार कोरोना या महामारीला आळा घालणेसाठी व शासनाकडून पुढील आदेश येईपावेतो नियमानुसार आज दि.१० वार-शनिवार व उद्या दि.११ वार-रविवार या दोन्ही दिवशी तसेच यापुढील येणाऱ्या शनिवार व रविवार रोजी प्रशासनाकडून कडकडीत लॉकडाऊन जाहीर केलेला असल्याने साकळी येथे कोणीही आठवडे बाजार किंवा भाजीपाला विक्रीची मंडई भरवू नये किंवा तसा भरवणेचा […]

Read More

साकळीचे बस स्टँड ठरत आहे ‘ शोपीस ‘!

■महिला प्रवाश्यांची मोठी गैरसोय■दुरुस्तीची मागणी साकळी ता.यावल (वार्ताहर) येथील बसस्टॅन्डची फार मोठया प्रमाणात पडझड झाल्याने दुरावस्था झालेली आहे.तर आता हे बसस्टँड शेवटची घटिका मोजत असून ते बसस्टँड नुसते नावालाच उरले आहे. या बस स्टॅन्ड मध्ये बसायला जागा नसल्यामुळे महिला प्रवाशांना कुठे बसावे ?असा प्रश्न पडत असतो. याठिकाणी बसायला जागा नसल्याने महिला प्रवाशां सह सर्व प्रवाशांची […]

Read More

फैजपूर कोविड सेंटरमध्ये १८० खाटांची व्यवस्था

प्रतिनिधी फैजपूर >> कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून परिसरातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आमोदा रस्त्यावर मसाकाजवळ कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या सेंटरची क्षमता १५० खाटांची होती. आता ती वाढवून १८० खाटांची करण्यात आली. सध्या तेथे १०२ रुग्ण उपचार घेत असून न्हावी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित सरोदे या सेंटरचे प्रमुख आहेत. कोविड […]

Read More

साकळी येथील जि.प.मराठी शाळेत वॉल कंपाऊंडचे काम तब्बल आठ महिन्यांपासून रखडले

पुर्ण करण्याची मागणीजिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष शिफारसीने मंजूर झालेल्या… वरिष्ठ प्रशासनाकडून सुद्धा कोणतीच कार्यवाही नाही साकळी ता.यावल >> येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेतील बंदिस्त वालकंपाऊंड भिंतीचे अपुर्ण बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे या मागणीसाठी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे दि.१९ जाने.२०२१ रोजी लेखी निवेदन दिले आहे.मात्र सदर निवेदनावर गेल्या तब्बल दोन महिन्यांपासून […]

Read More

प्रेमप्रकरणातून घर जाळल्याप्रकरणी एकास अटक

यावल >> प्रेम प्रकरणातील वादानंतर पोलिस कर्मचारी असलेली तरुणी व तिच्या कुटुंबीयांनी थेट संबंधित मुलाचे घर जाळून टाकल्याची घटना १८ जानेवारी रोजी घडली होती. तेव्हा या पोलिस कर्मचारी तरुणीसह सात जणांविरुद्ध यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यात यापूर्वी दोघांना अटक करण्यात आली असून रविवारी पुन्हा एका संशयितास अटक करण्यात आली. अन्य फरार […]

Read More

साकळीत लसीकरणापूर्वी कोरोना चाचणीसाठी सक्ती का? ३० लाभार्थी लस न घेताच गेले घरी!

प्रतिनिधी यावल >> यावल तालुक्यातील साकळीसह काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणासाठी आलेल्यांना रॅपिड अॅन्टिजेन चाचणीची सक्ती केली आहे. यामुळे बुधवारी प्राथमिक केंद्रातून सुमारे ३० लाभार्थी लस न घेताच माघारी गेले. साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गेलेल्यांना वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रथम रॅपिड अॅन्टिजेन चाचणी करावी लागेल. यानंतरच लसीकरण होईल, असे सांगितले गेले. मात्र, कोरोनाची […]

Read More

रेल्वेखाली मृत्यू झालेली ‘ती’ महिला साकळीची रहिवासी!

प्रतिनिधी जळगाव >> पिंप्राळा रेल्वेगेटजवळ धावत्या रेल्वेखाली आल्याने अनोळखी वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना १२ मार्च रोजी घडली होती. लोहमार्ग पोलिसांनी रविवारी या वृद्धेची ओळख पटवली. कमलबाई रघुनाथ चौधरी (वय ७६, रा. जोशीपेठ) असे मृत वृद्धेचे नाव आहे. शहरातील रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या पिंप्राळा रेल्वे गेटजवळ रेल्वेचा पोल क्रमांक (४१८/१४ -१६) जवळ धावत्या रेल्वेखाली वृद्धेचा […]

Read More

साकळीत चार ठिकाणी सौरऊर्जेवर चालणारे हायमास्ट लॅम्प

यावल >> साकळी येथे जि.प.सभापती रवींद्र पाटील यांच्या प्रयत्नातून व आमदार चंदूलाल पटेल यांच्या निधीतून सौर ऊर्जेवर चालणारे चार हायमास्ट दिवे मंजूर झाले होते. त्यांचे भूमिपूजन व लोकार्पणही सभापती पाटील यांच्या हस्ते झाले. पहिला दिवा वाडेश्वर महादेव मंदिर परिसरात बसवण्यात आला. यावेळी ग्रा.पं. सदस्य साहेबराव बडगुजर, अप्पाभाऊ खेवलकर, नितीन फन्नाटे, दीपक पाटील, दिनकर माळी, तुकाराम […]

Read More

३८ वर्षीय विवाहितेने पतीसह चार मुलांना सोडून थाटला दुसरा संसार !

प्रतिनिधी यावल >> तालुक्यातील ३८ वर्षीय विवाहितेने चार मुले व पतीला सोडून दुसऱ्यासोबत संसार थाटला. दुसरीकडे माहेरी गेलेली पत्नी अद्याप परत का येत नाही? याचा शोध घेतल्यावर पत्नीने दुसऱ्यासोबत संसार थाटल्याचे समोर आले. या प्रकरणी यावल पोलिसांत महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. नायगाव (ता.यावल) येथील प्यारसिंग भाया बारेला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची पत्नी बोंदरीबाई बारेला […]

Read More

सातपुड्यातील आग थांबेना आज मनुदेवी परिसरात पोहोचली वणव्याची धग

आडगाव ता. यावल प्रतिनिधी >> गेल्या १५ दिवसांपासून सातपुड्यात पेटलेला वणवा आता मनुदेवी परिसरातील जंगलात पोहोचला. यामुळे मदतकार्य करणारे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, वन्यजीवप्रेमींची तारांबळ उडाली. वराड, कृष्णापुर, गुळप्रकल्प, या भागात बऱ्यापैकी वणवा नियंत्रणात आणण्यासाठी वनविभागाला यश आले. त्या भागात वणवा आटोक्यात आला असला तरी आता अडावद, पांढरी भागात शुक्रवारी तर देवझीरी, हंड्या-कुंड्या, वाघझिरा, मनुदेवी, मानापुरी […]

Read More

यावलसह तालुक्यात खुलेआम बिनधास्त गावठी दारूची विक्री ; राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांसमोर आव्हान

यावल, प्रतिनिधी >> तालुक्यात वाळु माफिया, भुखंड माफियानंतर आता गावठी दारूसह अवैध देशी-विदेशी दारू माफियांचे प्रस्थ वाढत असून त्यांची खुलेआम सार्वजनिक ठिकाणी दारूची विक्री करण्यापर्यंत मजल गेली असून राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस प्रशासनासमोर आव्हान उभे केले आहे. तालुक्यात मागील काही दिवसांपासुन यावलसह सांगवी, कोरपावली, सावखेडा सिम, डोंगर कठोरा, अंजाळे, किनगाव, साकळी, न्हावी, आमोदे, पाडळसा, […]

Read More

मंडळाधिकाऱ्यांना ढकलून देत सात जणांवर घातली कार, डंपर पकडल्याचा राग ; ५ जणांवर गुन्हा

यावल-किनगाव प्रतिनिधी >> अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका डंपरला महसूलच्या पथकाने किनगावजवळ पकडले. त्यास कारवाईसाठी पोलिस ठाण्यात नेताना डंपर पळवण्याचा प्रयत्न करत महसूलच्या पथकावर कार घालून ठार मारण्याचा प्रयत्न झाला. डंपर सोडवण्यासाठी कारमधून आलेल्या इतर चौघांनी शासकीय कामात अडथळा आणला. या प्रकरणी एकूण पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी डंपरसह कार ताब्यात घेतली. गेल्या आठवड्यात […]

Read More

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य महामार्गावर खराब रस्त्यामुळे अपघात झाल्यास मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

यावल प्रतिनिधी >> येथून गेलेल्या अंकलेश्वर ते बुऱ्हाणपुर राज्य महामार्गाच्या रस्ता दुरूस्ती करण्याकरिता तात्काळ कामाची निविदा प्रक्रियापुर्ण करून कामास त्वरीत सुरवात करावी व तात्काळ दुरूस्त करावा जर कामास विलंब झाला व रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दुदैवाने अपघातास यावल सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार धरून संबधीतांच्या विरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा ईशारा एका लेखी निवेदनाद्वारे महाराष्ट्र […]

Read More

श्रीराममंदिर हे ‘राष्ट्रमंदीर’ व्हावे ! महंत जनार्दन हरीजी महाराज यांचे साकळीत प्रतिपादन

साकळी प्रतिनिधी >> मानवाला जीवन जगण्यासाठी हवा, पाणी यासह सृष्टीतील सर्व घटक आपल्याला विनामोबदला मिळत असते व त्याचा आपण उपभोग घेतो. या सर्व गोष्टीचे भान ठेवून आपणही देवाच्या कार्यासाठी आपल्या यथाशक्ती प्रमाणे हातभार लावावा. जेणेकरून आपल्या सर्वांच्या समर्पित सेवेतून अयोध्येतील श्रीराम मंदिराचे निर्माण होऊन ते मंदीर निश्चितच ‘राष्ट्रमंदिर’ होईल असे भावनिक प्रतिपादन महामंडलेश्वर महंत स्वामी […]

Read More

साकळी येथे उद्यापासून उरुस, आज निघणार संदल

साकळी प्रतिनिधी >> यावल तालुक्यातील साकळी येथील हजरत सजनशाह वली (रहे.) यांच्या उर्स सोहळ्यास रविवारपासून (दि.१०) सुरुवात होत आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या उर्स सोहळ्यास शेकडो वर्षाची परंपरा आहे. संदल शरीफ यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने होणार आहे. पाच आठवडे चालणाऱ्या या उरूस शरीफमध्ये दर्गा परिसरात गर्दी न करण्याचे अवाहन करण्यात आले आहे. प्राचीन काळी […]

Read More

यावल-चोपडा रस्त्यावर दुचाकीला ट्रकची धडक

यावल प्रतिनिधी >>चोपडा रस्त्यावरील वढोदे गावाजवळ दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण जखमी झाला. हा अपघात सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन छोटू धनगर (वय २१) रा. बोराजंटी, ता.चोपडा या तरुणाने येथील पोलिसांत फिर्याद दिली. त्या नुसार तो सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास दुचाकी द्वारे चोपड्याकडून […]

Read More

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी घेतली आढावा बैठक

यावल, प्रतिनिधी >> तालुक्यातील ग्राम पंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर झाल्यापासुन निवडणुक लढविण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जोळणीसाठी तहसील कार्यालयात नागरीकांनी एकच गर्दी केली असल्याने तहसील कार्यालयास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यावल तालुक्यातील या निवडणुकीसाठी नेमणुक करण्यात आलेल्या निवडणुकी निर्णय अधिकारी यांची एक निवडणुक प्रक्रिया संदर्भातील महत्वपुर्ण […]

Read More

एक दिवसाच्या अर्भकाला शेतात टाकून महिला पसार ; यावल तालुक्यातील घटना

किनगाव प्रतिनिधी >> यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात जळगाव -धानोरा रस्त्यावर अज्ञात महिलेने एक दिवसाचे पुरूष जातीचे अर्भक रस्त्याच्या कडेला शेतात टाकून दिल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. मजुरांच्या सतर्कतेमुळे या बाळाला यावल ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथून अर्भकाला जळगावला नेले आहे. रविवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास डांभुर्णी शिवारात नितीन फालक यांच्या गट क्रमांक ७८५ मधील […]

Read More

यावल तालुक्यात ग्रामीण भागात एसटी बस सेवा सुरु करण्याची मागणी

यावल प्रतिनिधी >> जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्वात जास्त उत्पन्न यावल आगार नेहमी देत असतो. लॉकडाऊन जाहीर झाल्याने एसटी बससेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. परंतु, आता जिल्ह्यासह राज्यातील बससेवा सुरळीत झालेली असतांना यावल आगारातून ग्रामीण भागातील बससेवा अद्यापही सुरु करण्यात आली नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून प्रभारी आगर व्यवस्थापकांनी ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत सुरु करावी […]

Read More
यावल ग्रामीण रुग्णालय

यावलला दोन दुचाकींची धडक, पाच गंभीर जखमी

यावल >> यावल–चोपडा रस्त्यावर गिरडगावजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन पाचजण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडला. जखमींना यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर काहींना खासगी हॉस्पिटलमध्ये तर काहींना जळगावला हलवण्यात आले. सोमवारी दुपारी दुचाकीने (क्रमांक एम. पी. ६८ एम. जी. २१३८) भवूकुमार बारेला (वय २५) व ओमप्रकाश […]

Read More