यावल तालुक्यातील शेत मजुराची आत्महत्या

यावल प्रतिनिधी >> तालुक्यातील सावखेडा सिम येथील एका शेत मजुराने गाव शिवारातील विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याची पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार. सावखेडा सिम तालुका यावल येथील राहणारे अनिल धुळकु पाटील यांनी सावखेडा सिम शिवारातील अजय दिलीप पाटील यांच्या शेतातील खोल विहीरीत उडी […]

Read More

फैजपूर-यावल रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तडस ठार

फैजपूर प्रतिनिधी >> रस्ता ओलांडणाऱ्या तडसाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. फैजपूर ते यावल रस्त्यावर हंबर्डी गावाजवळ ही घटना घडली. गुरुवारी सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी वन प्रेमी अनिल नारखेडे यांना दूरध्वनीद्वारे याबाबत माहिती दिली. तर अजय पाटील, हंबर्डी यांनी यावल वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांना कळवले. घटनास्थळी अनिल नारखेडे व वन […]

Read More

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य महामार्गावर खराब रस्त्यामुळे अपघात झाल्यास मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

यावल प्रतिनिधी >> येथून गेलेल्या अंकलेश्वर ते बुऱ्हाणपुर राज्य महामार्गाच्या रस्ता दुरूस्ती करण्याकरिता तात्काळ कामाची निविदा प्रक्रियापुर्ण करून कामास त्वरीत सुरवात करावी व तात्काळ दुरूस्त करावा जर कामास विलंब झाला व रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दुदैवाने अपघातास यावल सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार धरून संबधीतांच्या विरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा ईशारा एका लेखी निवेदनाद्वारे महाराष्ट्र […]

Read More

यावल तालुक्यातील ग्रा.पं.निवडणूक उमेदवारांची सोशल मिडियामध्ये बदनामी ; गुन्हा

यावल प्रतिनिधी >> अट्रावल ग्राम पंचायतच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांची सोशल मिडीयातून बदनामी केल्याप्रकरणी संबंधित ग्रुपसह एका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यात ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असुन, गावपातळीवर ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व उमेदवारांनी आपआपल्या प्रचारात आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे यंदा मात्र प्रथम निवडणुकीत सोशल नेटवर्कच्या माध्यमातुन प्रचार मोठया प्रमाणावर वाढला आहे. […]

Read More

श्रीराममंदिर हे ‘राष्ट्रमंदीर’ व्हावे ! महंत जनार्दन हरीजी महाराज यांचे साकळीत प्रतिपादन

साकळी प्रतिनिधी >> मानवाला जीवन जगण्यासाठी हवा, पाणी यासह सृष्टीतील सर्व घटक आपल्याला विनामोबदला मिळत असते व त्याचा आपण उपभोग घेतो. या सर्व गोष्टीचे भान ठेवून आपणही देवाच्या कार्यासाठी आपल्या यथाशक्ती प्रमाणे हातभार लावावा. जेणेकरून आपल्या सर्वांच्या समर्पित सेवेतून अयोध्येतील श्रीराम मंदिराचे निर्माण होऊन ते मंदीर निश्चितच ‘राष्ट्रमंदिर’ होईल असे भावनिक प्रतिपादन महामंडलेश्वर महंत स्वामी […]

Read More

साकळी येथे उद्यापासून उरुस, आज निघणार संदल

साकळी प्रतिनिधी >> यावल तालुक्यातील साकळी येथील हजरत सजनशाह वली (रहे.) यांच्या उर्स सोहळ्यास रविवारपासून (दि.१०) सुरुवात होत आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या उर्स सोहळ्यास शेकडो वर्षाची परंपरा आहे. संदल शरीफ यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने होणार आहे. पाच आठवडे चालणाऱ्या या उरूस शरीफमध्ये दर्गा परिसरात गर्दी न करण्याचे अवाहन करण्यात आले आहे. प्राचीन काळी […]

Read More

यावल-चोपडा रस्त्यावर दुचाकीला ट्रकची धडक

यावल प्रतिनिधी >>चोपडा रस्त्यावरील वढोदे गावाजवळ दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण जखमी झाला. हा अपघात सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन छोटू धनगर (वय २१) रा. बोराजंटी, ता.चोपडा या तरुणाने येथील पोलिसांत फिर्याद दिली. त्या नुसार तो सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास दुचाकी द्वारे चोपड्याकडून […]

Read More

यावलात एकास १० ते १५ जणांकडून बेदम मारहाण

यावल प्रतिनिधी >> येथे गाळ वाहतुक बंद पुकारण्यात आले असता वाहतुकीचे ट्रॅक्टर भरण्यासाठी गेलेल्या एका तरूणास १०ते १५ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली असुन याबाबत पोलीसात मात्र गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीद्वारे कळते. याबाबत मिळालेली माहीती अशी यावल शहरातील गाळ वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी मजुरी वाढवुन मिळावी यासाठी मागील दोन दिवसांपासुन […]

Read More

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी घेतली आढावा बैठक

यावल, प्रतिनिधी >> तालुक्यातील ग्राम पंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर झाल्यापासुन निवडणुक लढविण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जोळणीसाठी तहसील कार्यालयात नागरीकांनी एकच गर्दी केली असल्याने तहसील कार्यालयास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यावल तालुक्यातील या निवडणुकीसाठी नेमणुक करण्यात आलेल्या निवडणुकी निर्णय अधिकारी यांची एक निवडणुक प्रक्रिया संदर्भातील महत्वपुर्ण […]

Read More

मनसेच्या जनहित कक्ष जिल्हाध्यक्षपदी यावल येथील चेतन अढळकर यांची निवड

यावल >> मनसेच्या रावेर लोकसभा मतदार संघाच्या जनहित कक्ष जिल्हाध्यक्षपदी यावल येथील चेतन अढळकर यांची नियुक्ती झाली. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसे जनहित कक्ष व विधी राज्याध्यक्ष अॅड.किशोर शिंदे यांच्या हस्ते अढळकर यांना नियुक्तिपत्र देण्यात आले.

Read More

भुसावळ-फैजपूर रस्त्यावर अपघात ; एक जण ठार

यावल >> तालुक्यातील भुसावळ-फैजपूर रस्त्यावर भोरटेकजवळ दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ४४ वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी सांयकाळी घडला. विकास धनसिंग पाटील-जाधव (रा. जळगाव) असे मृताचे नाव आहे. रविवारी पाटील हे पाडळसे येथे नातेवाइकांकडे आले होते. सायंकाळी ७.३० वाजता ते पाडळसेहून दुचाकीने (एमएच. १९ एसी.१४४३) जळगावला जाण्यासाठी निघाले. भोरटेक फाट्याजवळ अज्ञात वाहनाने […]

Read More

एक दिवसाच्या अर्भकाला शेतात टाकून महिला पसार ; यावल तालुक्यातील घटना

किनगाव प्रतिनिधी >> यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात जळगाव -धानोरा रस्त्यावर अज्ञात महिलेने एक दिवसाचे पुरूष जातीचे अर्भक रस्त्याच्या कडेला शेतात टाकून दिल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. मजुरांच्या सतर्कतेमुळे या बाळाला यावल ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथून अर्भकाला जळगावला नेले आहे. रविवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास डांभुर्णी शिवारात नितीन फालक यांच्या गट क्रमांक ७८५ मधील […]

Read More

यावल तालुक्यात ग्रामीण भागात एसटी बस सेवा सुरु करण्याची मागणी

यावल प्रतिनिधी >> जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्वात जास्त उत्पन्न यावल आगार नेहमी देत असतो. लॉकडाऊन जाहीर झाल्याने एसटी बससेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. परंतु, आता जिल्ह्यासह राज्यातील बससेवा सुरळीत झालेली असतांना यावल आगारातून ग्रामीण भागातील बससेवा अद्यापही सुरु करण्यात आली नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून प्रभारी आगर व्यवस्थापकांनी ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत सुरु करावी […]

Read More

यावल-निमगाव शिवारात बिबट्या आढळल्याने खळबळ ; सावधानता राखण्याची गरज

यावल प्रतिनिधी >> तालुक्यातील निमगाव शिवारात गुरूवारी पहाटे बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिवारात पाहणी करून बिबट्याच्या पायांचे ठसे घेतले. शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी, अशी सूचना देण्यात आली आहे. निमगाव येथील शेतकरी अरुण जुलालसिंग पाटील यांच्या शेतात गुरूवारी पहाटे बिबट्या दिसला. या बाबत तात्काळ यावल प्रादेशिक वनविभागास माहिती देण्यात […]

Read More

यावलात घराबाहेर उभी असलेली दुचाकीची चोरी, गुन्हा दाखल

यावल >> येथील देशमुख वाड्यातून दुचाकी चोरीला गेल्याने खळबळ उडाली असून मंगळवारी रात्री घडलेली ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी येथील पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशमुख वाड्यातील महादेव मंदिराजवळील रहिवासी रोशन सुभाष चौधरी यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. त्या नुसार त्यांची दुचाकी (क्र. एमएच १९ डीएच ९७०५) मंगळवारी रात्री […]

Read More

यावल तालुक्यातील ४७ ग्रा.पं.च्या निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर

यावल प्रतिनिधी >> तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मंगळवारी येथील तहसीलदार महेश पवार यांनी अधिसूचना जाहीर केली. तसेच संपूर्ण ग्रामपंचायत निहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक देखील करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या सोमवारी प्रसिद्ध झाल्या होत्या. तर आता निवडणूक अधिसूचना जाहीर झाल्यानंतर तालुक्यातील त्या -त्या गावांमध्ये तलाठी कार्यालयात ही निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. तहसील […]

Read More

मुक्त विद्यापीठाच्या रिपीटर विद्यार्थ्यांच्या परीक्षा २१ पासून

यावल >> यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या केंद्र असलेल्या येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सर्व वर्गातील रिपीटर विद्यार्थ्यांची परीक्षा या २१ डिसेंबरपासून ऑनलाइन होत आहे. तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यास त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर परिक्षा संदर्भातील लिंक येणार असुन एक तास ही परीक्षा राहणार आहे. मुक्त विद्यापीठाच्या यंदाच्या सर्व प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील बी.ए., बी.कॉम.च्या […]

Read More
यावल ग्रामीण रुग्णालय

यावलला दोन दुचाकींची धडक, पाच गंभीर जखमी

यावल >> यावल–चोपडा रस्त्यावर गिरडगावजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन पाचजण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडला. जखमींना यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर काहींना खासगी हॉस्पिटलमध्ये तर काहींना जळगावला हलवण्यात आले. सोमवारी दुपारी दुचाकीने (क्रमांक एम. पी. ६८ एम. जी. २१३८) भवूकुमार बारेला (वय २५) व ओमप्रकाश […]

Read More

अट्रावलच्या २५ वर्षीय तरुणीवर अत्याचार, बळजबरीने केला गर्भपात

प्रतिनिधी यावल >> तालुक्यातील अट्रावल येथील २५ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वर्षभर शारीरिक संबंध ठेवत लैंगिक अत्याचार केले. तिला बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडले. तसेच लग्नाला नकार दिल्याने संबंधितांविरुद्ध यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. अट्रावल येथील श्रावण कैलास कोळी याने पीडितेशी परिचय वाढवला. यानंतर विश्वासात घेत तुझ्याशी मी लग्न करेल, असे आमिष […]

Read More

गुरांची अवैधरित्या वाहतूक करणारे वाहन पकडले

यावल प्रतिनिधी >> शहरातून अवैधरीत्या व अत्यंत निर्दयपणे गुरांची वाहतुक करणाऱ्या एका वाहनास पोलिसांनी पकडले. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली असून वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून गुरे गोशाळेत रवाना करण्यात आली. या प्रकरणी पोलिस कर्मचारी गणेश मधुकर ढाकणे यांनी फिर्याद दिली. त्या नुसार पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले हे शुक्रवारी रात्री गस्तीवर असताना त्यांना एका […]

Read More