वडिलांच्या अंत्यविधीनंतर तिन्ही भावांनी केले मतदान

ऐनपूर >> येथील रहिवासी सुखदेव वामन महाजन (वय ७९) यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार झाले. या दु:खाच्या प्रसंगातही त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी अंत्यविधीनंतर मतदान केले. त्यात त्यांच्या तिन्ही मुलांचाही समावेश होता. वाॅर्ड क्रमांक तीनमध्ये असलेल्या या मतदारांनी लोकशाहीचा आदर करत मतदानाला प्राधान्य दिले.दु:खातही स्व.महाजन यांच्या पत्नी, तीन मुले, तीन सुना […]

Read More

सावद्यात पावणेसात लाखांचा प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त

सावदा >> येथील सावदा–फैजपूर रोडवर सावदा पोलिसांनी शुक्रवारी सकाळी सापळा रचून, ट्रकमधील ६ लाख ७२ हजारांचा प्रतिबंधित तंबाखूचा साठा पकडला. ट्रकसह एकूण १० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी एका संशयिताला अटक केली तर दुसरा पसार झाला. गुप्त माहितीवरून शहरातील डायमंड तोल काट्यासमोर पोलिसांनी सापळा रचला होता. सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास या जागेवर ट्रक (क्र.एम.पी.०९ […]

Read More

रावेरात शिवसेनेची उद्या जिल्हा बैठक ; संपर्कप्रमुख येणार

रावेर >> शिवसेना जळगाव लोकसभा मतदारसंघाची बैठक शुक्रवारी शहरात आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत हे उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी दुपारी २ वाजता सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, आंबेडकर मार्केट येथे ही बैठक होईल. बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत उपस्थित राहणार आहेत. बैठकीला आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, […]

Read More

पीक विमा कंपनीचा निष्काळजीपणा, सहा गावांतील १५ शेतकऱ्यांना फटका

रावेर >> हवामानावर आधारित केळी पीक विमा घेतला असतानाही झालेल्या नुकसानीपोटी पीक विमा कंपनीच्या निष्काळजीपणामुळे तालुक्यातील ६ गावातील १५ शेतकऱ्यांना लाभ मिळाला नसल्याची तक्रार या शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्हा कृषी अधीक्षक अधिकाऱ्यांनी याची दाखल घ्यावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. हवामानावर आधारित केळी फळ पीक विमा घेण्यासाठी गत वर्षी खानापूर, अटवाडा, अजनाड, निरूळ, चोरवड […]

Read More

रावेर-वाघोदा परिसरात बनावट दोनशेच्या नोटा आढळल्या

मोठा वाघोदा >> रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा, चिनावल, कोचूर, खिरोदा परिसरात शंभर व दोनशेच्या बनावटी नोटा चलनात आल्या आहेत. बाजारात गर्दीच्या ठिकाणी किंवा ग्राहकांची वर्दळ असलेल्या दुकानांवर या नोटा चालवण्यात आल्या आहेत, अशी माहिती संबंधित दुकानदारांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. हुबेहूब दिसणाऱ्या या नोटा गेल्या आठवडाभरात व्यवहारात आल्या आहेत. या बनावटी नकली नोटा चालवणाऱ्यांचे […]

Read More

रावेर तालुक्यात १२ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य ; गुन्हा दाखल

रावेर प्रतिनिधी >> वडगाव ता. रावेर येथील एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर तालुक्यातील कांडवेल शिवारातील शेतात मोकळ्या जागेवर १२ वर्षीय मुलाला पैश्यांचे आमिष दाखवत संशयित आरोपी गबा उर्फ प्रेमलाल धुडकू भालेराव (वय-२३) रा. कोळोदे ता. रावेर याने […]

Read More

रावेर बोरखेडा हत्याकांड प्रकरणी दोषारोपपत्र केले दाखल

रावेर >> राज्याला हादरवून सोडणाऱ्या बोरखेडा रोडवरील हत्याकांडप्रकरणी, घटनेतील मुख्य आरोपी महेंद्र बारेला याला शोधून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ६० दिवसांच्या आत, अर्थात १४ रोजी भुसावळ सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जलदगती न्यायालयात हा खटला चालवण्यात येणार असून, सरकारतर्फे अॅड.उज्ज्वल निकम काम पाहणार आहेत. रावेर तालुक्यातील बोरखेडा शिवारात महिताब भिलाल हे पत्नी व पाच मुलांसह मजुरीनिमित्त राहत […]

Read More

२५ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

वाघोड प्रतिनिधी >>येथील रहिवासी राहुल कैलास सुतार (वय २५) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास त्याच्या राहत्या घरात ही घटना घडली. घरातील लाकडाच्या वेलीस साडी बांधून त्याने गळफास घेतला. रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेन करण्यात आले. या घटनेमागील कारण स्पष्ट झालेले नाही. मृताच्या पश्चात पत्नी, दोन महिन्यांची मुलगी, आई- वडील, एक […]

Read More

रावेर तालुक्यातील ४८ ग्रा.पं.साठी३७ निवडणूक निर्णय अधिकारी

रावेर प्रतिनिधी >> राज्यात जाहीर झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांतर्गत रावेर तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी या प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. तालुक्यात ४८ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ३७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे तहसीलदार उषाराणी देवगुणे […]

Read More

चंपाषष्ठीदिनी होणारा सावद्यातील खंडेराव महाराज यात्रोत्सव रद्द

सावदा ता. रावेर प्रतिनिधी >> येथे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्ठीला होणारी खंडेराव महाराजांची यात्रा या वर्षी कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आली आहे. येथील जागृत देवस्थान खंडेराव महाराज मंदिर परिसरात दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या चंपाषष्ठीला मोठी यात्रा भरते. मात्र यंदा कोरोना महामारीचे संकट व आरोग्याच्या दृष्टीने येत्या २० डिसेंबर रोजी भरणारी यात्रा रद्द करण्यात येत असल्याचे भगत […]

Read More

केळीचे भाव जाहीर होत नसल्याने यावल तालुक्यातील शेतकऱ्यांचे हाल

यावल प्रतिनिधी >> येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर पूर्वीपासून केळी बोर्डाचे भाव एका फलकाद्वारे जाहीर केला जायचे. त्यामुळे शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यामुळे ठिकठिकाणच्या केळीच्या भावाची माहिती मिळायची. मात्र गेल्या काही दिवसांपासून येथील फलक गायब झाला असून परिणामी सर्वसामान्य शेतकऱ्यांना केळीचे भाव कळत नसल्याची परिस्थिती आहे. बाजार समितीकडे मागणी करूनही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात […]

Read More

भाजपचा रावेरला आजपासून दोन दिवसीय अभ्यास वर्ग

रावेर प्रतिनिधी >> रावेर लोकसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शनिवारपासून दोन दिवसीय अभ्यास वर्ग आयोजित करण्यात आला आहे. भाजपतर्फे येथील विवरा रस्त्यावरील मायक्रो व्हिजन शाळेच्या मागील हनुमान मंदिरात शनिवार व रविवार असा दोन दिवस हा वर्ग सुरू राहणार आहे. माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील, जिल्हाध्यक्ष […]

Read More

रावेरातील २८ वर्षीय युवकाची नैराश्यातून आतेभाऊला कॉल करून तापी नदीत उडी घेत केली आत्महत्या

रावेर प्रतिनिधी >> रावेरातील एका २८ वर्षीय युवकाने तापी नदीत उडी घेत आत्महत्या केली असून याप्रकरणी रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रावेर शहरातील श्री हनुमान वाड्यात राहणारे रहिवासी व एका आरोग्य विमा कंपनीतच नोकरी करत असलेल्या २८ वर्षीय अविवाहित युवकाने आतेभावाला कॉलवरून कळवत निंभोरासीम ते नांदुपिंप्री दरम्यान असलेल्या पुलावरून तापी […]

Read More

कत्तलसाठी २१ बैलांना घेऊन जाणारा आयशर रावेर पोलिसांनी केला जप्त

रावेर प्रतिनिधी >> कत्तलसाठी २१ बैलांना आयशर गाडीमध्ये कोंबून घेऊन जाण्याचा प्रकार पोलिसांच्या सतर्कतेने शनिवारी रात्री उघडकीस आला आहे. रावेर तालुक्यातील कर्जोद फाट्याजवळ शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास एमपी ०८ : जीए-१६७९ या क्रमांकाचे आयशर वाहन रावेर पोलिसांच्या पथकाने जप्त केले. यामध्ये २१ बैलांना अतिशय डांबून-कोंबून भरण्यात आले होते. गाडीतील अनेक बैल हे जखमी अवस्थेत […]

Read More

रावेर बीडीओंनी धुडकावला जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

रावेर प्रतिनिधी >> महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ५१ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हांतर्गत ७ नोव्हेंबरला बदल्या केल्या आहेत. येथील पंचायत समितीत यावल येथून सहायक कार्यक्रम अधिकारी दिनेश अंजाळे यांची बदली झाली आहे. ते ११ तारखेला येथे हजर होण्यासाठी आले असता बीडीओ दीपाली कोतवाल यांनी त्यांना हजर करून घेतले नाही. […]

Read More

रावेरात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या, गुन्हा दाखल

रावेर >>येथील ४२ वर्षीय महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्री घडली. भारती दिनेश चौधरी असे मृत महिलेचे नाव आहे. जुना सावदा रस्त्यावरील पंचमुखी हनुमान नगरातील रहिवासी असलेल्या भारती चौधरी यांनी राहत्या घरात सुतळीच्या साहाय्याने रविवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी बचत गटाचे सहकारी घरी आले तेव्हा भारती चौधरी या गळफास अवस्थेत आढळून […]

Read More

वखरणी करताना शॉक लागून बैलजोडी ठार, शेतकरी गंभीर जखमी

रावेर प्रतिनिधी >> गहू पेरणीसाठी शेतात वखरणी करताना शॉक लागून शेतकरी गंभीर जखमी, तर बैलजोडी जागीच ठार झाली. ही घटना रसलपूर-केऱ्हाळा रस्त्यावरील रावेर शिवारात सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. केऱ्हाळा बुद्रूक येथील शेतकरी प्रभाकर तुकाराम महाजन (वय ६५) हे रसलपूर येथील भागवत चिंतामण सोनवणे यांच्या रावेर शिवारात भागीदारीने केलेल्या शेतात वखरटी करत होते. या […]

Read More

निंभोरा पोलिसांकडून काटेरी झुडपांची साफसफाई

पोलिसदादाच वळणावरील झुडपे काढताना पाहून प्रवाश्यांना आश्चर्याचा धक्का बसला निंभोरा प्रतिनिधी >>पावसाळा संपल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूने झुडपे वाढतात. याचा त्रास सर्वांनाच होतो. असे असले तरी केवळ प्रशासनाकडे बोट दाखवून गळे काढले जातात. या पार्श्वभूमीवर स्वतः हातात विळे घेत ही झुडपे काढण्यासाठी सरसावलेले पोलिस पाहून वाहन धारकांना सुखद धक्का बसला. निंभोरा पोलिस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले […]

Read More

विवरे खु. येथील सुनिल पाटील यांना कृषी भूषण पुरस्कार जाहीर

रावेर >> तालुक्यातील विवरे येथील प्रगतशील शेतकरी सुनिल दामोदर पाटील यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे दिला जाणारा कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. लवकरच पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा संदीपा वाघ बापुसाहेब सुमित पाटील सर यांनी दिली आहे. सुनिल पाटील हे आपल्या शेतीत नेहमीच वेगवेगळे […]

Read More

शेळगाव बॅरेज लवकरच पूर्ण करणार; यावलसह रावेरातील प्रवाशांना जळगाव जाण्यासाठी सोयीस्कर : पालकमंत्री पाटील

यावल प्रतिनिधी >> शेळगाव बॅरेजसाठी माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे योगदान आहे. आगामी काळात हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. याच प्रकल्‍पावरील पुलाचे टेंडर निघाले असून यावलसह रावेरमधील नागरिकांना जळगाव जाण्यासाठी खूप अंतर कमी होणार आहे. याच रस्त्यावर असोदा रेल्वे गेट साठी उड्डाणपुलाची निविदा मंजूर झाली असून आगामी एक-दोन महिन्यात त्याची अंतिम प्रक्रिया पूर्ण […]

Read More