६० वर्षीय शेतकऱ्याचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू

पारोळा >> तालुक्यातील लोणी खुर्द येथील एका ६० वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीच्या पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना ३१ मार्चला घडली. लोणी येथील गुलाब खंडू पाटील असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. लोणी येथील संजय पाटील यांना गुलाब पाटील यांचा मृतदेह परशूराम पाटील यांच्या विहिरीत दिसून आला. तर विहिरीच्या काठावर गुलाब पाटील यांनी कपडे, चप्पल काढून ठेवले होते. […]

Read More

कर्जबाजारीपणा, वीज कनेक्शन तोडल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

प्रतिनिधी पारोळा >>तालुक्यातील मोरफळ येथील कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याने नैराश्यामुळे २८ रोजी दुपारी २ वाजता शेतात विष घेऊन आत्महत्या केली. याबाबत रावसाहेब मगन पाटील यांनी पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. तरुण शेतकरी गणेश पाटील याने शेतीसाठी विकास सोसायटी तसेच हातउचलचे ३ लाख रुपये कर्ज घेतले होते. अपेक्षित उत्पन्न न आल्याने ते नैराश्यात होते. ८ दिवसात थकबाकीमुळे […]

Read More

घराशेजारी राहणाऱ्या प्रदीपने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवले; गुन्हा दाखल

पारोळा >> तालुक्यातील चिखलोड येथे २६ रोजी मध्यरात्री एका युवकाने १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीस पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात चिखलोड येथील अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, पत्नी व मुलीसह मी २६ रोजी रात्री झोपलेले होतो. परंतु, २७ रोजी सकाळी उठल्यानंतर माझी मुलगी जागेवर नव्हती. तपास केला […]

Read More

पारोळा तालुक्यात दोघांची विविध कारणाने आत्महत्या !

पळासखेडे येथे २६ वर्षीय मजुराने केली आत्महत्यापारोळा >> तालुक्यातील पळासखेडे येथील २६ वर्षीय शेत मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २० रोजी रात्री ८ वाजता घडली. याबाबत अशोक पाटील यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, त्यांचा भाऊ दीपक अशोक पाटील (वय २६) हा २० रोजी रात्री ८ वाजता जेवण करून मित्रांसोबत बाहेर फिरून येतो, […]

Read More

पारोळ्यातून तीन मुलांसह विवाहिता झाली बेपत्ता

प्रतिनिधी पारोळा >> शहरातून आपल्या तीन मुलांसह विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना घडली असून याबाबत पाेलिसांत हरवल्याची नाेंद करण्यात आली. ९ रोजी सकाळी ११ वाजता बस स्थानक ते मुख्य बाजार पेठ या दरम्यान एका विवाहितेसह दाेन मुले व एक मुलगी बेपत्ता झाले. या बाबत गोकुळ मरसाले यांनी येथील पोलिसांत हरवल्याची तक्रार दिली. त्यानुसार नाेंद झाली. त्यांची […]

Read More

पारोळ्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घराबाहेर लागणार फलक

पारोळा >> येथे एरंडोल विभागाचे उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांच्या उपस्थितीत १५ रोजी प्रशासकीय चमूची बैठक झाली. यात कोरोनाबाबत त्यांनी विविध सूचना दिल्या. या वेळी त्यांनी शासकीय आयटीआयमधील कोव्हिड सेंटरची पाहणी केली गेली. दरम्यान, आता पॉझिटिव्ह रुग्णाच्या घराबाहेर फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी प्रांत गोसावी यांनी स्पष्ट केले की, नवे रुग्ण ट्रेसिंगसाठी तसेच […]

Read More

किरकोळ वादातून मारहाणीच्या घडल्या दोन घटना ; गुन्हे दाखल

पारोळा >> तालुक्यातील तामसवाडी व जोगलखेडे येथे किरकोळ वादातून मारहाणीच्या दोन घटना घडल्या. या प्रकरणी तालुका पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. योगेश कृष्णा भोई (रा.तामसवाडी) यांनी फिर्याद दिल्यानुसार हेमंत महाजन, अशोक लिंगायत व मधुकर महाजन यांनी शुक्रवारी दारूच्या नशेत बहिणीने हेमंत याच्या विरोधातील मानसिक छळाची केस मागे घेण्यावरून मारहाण व खिशातून ८ हजार रुपये […]

Read More

पारोळाच्या लाचखोर पोलिस रवींद्र रावतेला अखेर केले निलंबित

पारोळा >> येथील पोलिस कर्मचारी रवींद्र रावते याला २५ फेब्रुवारी रोजी एसीबीने लाच घेण्याच्या प्रयत्नात पकडले होते. रावतेने लाच स्विकारली नव्हती पण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदाराच्या शर्टाला लावलेल्या डीव्हाईसमध्ये, त्याने लाच मगितल्याचे स्पष्ट झाले होते. त्यास ताब्यात घेतले होते. या बाबत विभागीय चौकशी पूर्ण झाली आहे. पोलिस अधीक्षकांनी ११ रोजी लाचखोर निलंबनाचे आदेश काढले. आदेश […]

Read More

नाचताना धक्का लागल्याने दंगल, भोकरबारीतील १० जणांविरुद्ध गुन्हा

पारोळा >> भोकरबारी येथे किरकोळ कारणावरून दोन गटात दंगल उसळल्याची घटना ९ रोजी रात्री घडली. यात तीन जण गंभीर जखमी झाले असून, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. हळदीच्या कार्यक्रमात भूषण पाटील, विनोद पाटील, विकास पाटील, दिनेश पाटील, अनिल पाटील, प्रवीण पाटील, केवलसिंग पाटील, उषाबाई पाटील, रंजना पाटील, वैशाली पाटील हे आले होते. नाचताना संजयचा धक्का […]

Read More

पारोळा तालुक्यात चोरी, अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

पारोळा >> तालुक्यातील दळवेल व करमाड खुर्द सोमवारी (दि.८) चोरीच्या घटना घडल्या. दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी एकूण अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. दळवेल येथील विजय शरद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, सोमवारी सायंकाळी त्यांच्या काकू मंगलबाई आनंदराव पाटील यांच्या बंद घराचा दरवाजा चोरट्यांनी तोडून आत प्रवेश केला. तसेच घरातील लाकडी कपाटातून ७० हजार रुपये रोख व दहा […]

Read More

पिंपळकोठ्यात प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

पारोळा >> तालुक्यातील पिंपळकोठा येथे ७ मार्चला पहाटे ५ वाजता एका ४८ वर्षाच्या प्रौढाने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. पिंपळकोठा येथील नवनीत भगवान पाटील (वय ४८) हे अनेक दिवसापासून आजारी होते. त्यामुळे त्यांना नैराश्य आले होते. रविवारी त्यांनी त्यांच्या घरा शेजारील शाळेच्या आवारातील एका झाडाला गळफास घेतल्याची घटना पहाटे ५ वाजता उघडकीस आली. काही नागरिकांनी […]

Read More

पारोळ्यात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा; मुख्य महामार्गावर प्रचंड गर्दी

पारोळा प्रतिनिधी >> कोरोनाच्या वाढत्या रुग्णामुळे आठवडे बाजार बंद केलेला असतानाही रविवारी येथील राष्ट्रीय महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर शेतकरी व व्यापारी वर्गाने प्रचंड गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. रविवार हा तालुक्याचा आठवडे बाजाराचा दिवस असतो. परंतु कोरोना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने आठवडे बाजार बंदची घोषणा केली होती. त्या मुळे भाजीपाल्यासह इतर मालाचे […]

Read More

पारोळ्यात लाचखोर पोलिसासह पोलिस पाटलाला घेतले ताब्यात

पारोळा >> पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदाराच्या आई-वडिलांना आरोपी न करण्यासाठी तसेच त्याच्या भावाला जामिनासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना, पोलिस कर्मचारी रवींद्र त्र्यंबक रावते आणि मंगरूळ (ता. पारोळा) येथील प्रल्हाद पुंडलिक पाटील यास एसीबीने गुरुवारी ताब्यात घेतले. या प्रकरणात १० हजार रुपयांची लाच घेताना दोघे जाळ्यात अडकले.

Read More

करमाड येथे दोन भावांना किरकोळ कारणाने मारहाण

पारोळा >> कट मारल्याच्या कारणावरून जाब विचारल्याने दोन जणांना मारहाण झाल्याची घटना करममाड येथे २३ रोजी घडली. याप्रकरणी दोन महिलांसह एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. दीपक साहेबराव पाटील हे पत्नीसह शेतातून दुचाकीने घरी येत होते. वाटेत ज्ञानेश्वर लोटन पाटील याने त्याच्या वाहनाने दीपक पाटील यांच्या दुचाकीला कट मारला. घटनेनंतर ज्ञानेश्वर पळून गेला. या घटनेनंतर […]

Read More

पारोळ्यात ५ लाखांसाठी विवाहितेचा छळ, १२ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी पारोळा >> कार घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये आणावे, या मागणीसाठी येथील सासर असलेल्या विवाहितेचा छळ झाला. याप्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात सासरकडील १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. आफरीनबी शेख अल्ताफ मणियार हिने फिर्याद दिली. त्यात २५ जानेवारी २०२० ते ३ जानेवारी २०२१ दरम्यान वेगवेगळ्या कारणांवरून सासरकडील मंडळींनी वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला. कार […]

Read More

३ लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ, ६ जणांवर गुन्हा दाखल

पारोळा >> तालुक्यातील शिरसोदे येथील माहेर, तर विरार (ता.वसई) येथील सासर असलेल्या विवाहितेचा रिक्षा घेण्यासाठी माहेरातून ३ लाख रुपये आणावे यासाठी सासरी छळ झाला. अंगावरील सोने-चोदींचे दागिने काढून घेत छळ केला. ठार मारण्याची धमकी देत तीन वेळा तलाक असे म्हणत गैर कायद्याने तलाक दिला. याप्रकरणी सासरकडील जावेद शेख, अफरोजबी युनूस शेख, युनूस युसूफ शेख, अजीम […]

Read More

अल्पवयीन मुलीवर नराधम बापाने केला अत्याचार, मुलगी सहा महिन्यांची गरोदर ; गुन्हा दाखल

पारोळा प्रतिनिधी >> व्यसनाधीन बापाने आपल्या स्वत:च्या मुलीवर धमकी देत अत्याचार केला. यामुळे मुलगी सहा महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून कन्हेरे येथील नराधम बापावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कन्हेरे येथील हा नराधम पिता आपली पत्नी, १ मुलगा व मुलीसह राहतो. सहा महिन्यांपूर्वी शालकाचे लग्न असल्याने त्याची पत्नी […]

Read More

पारोळा तालुक्यात ३२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

पारोळा >> तालुक्यातील बोळे येथे १६ डिसेंबरला सकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान ३२ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केली. याबाबत भुरेसिंग भोजू गिरासे यांनी खबर दिली. त्यात त्यांची सून हर्षा ज्ञानेश्वर गिरासे (वय ३२) हिने १६ रोजी सकाळी ६.३० वाजता राहत्या घरात विषारी औषध घेतल्याने ती अत्यवस्थ दिसली. यानंतर हर्षाला पारोळा […]

Read More

पारोळ्यात बंद घरातून ४० हजारांची चोरी ; प्रमाण वाढले

पारोळा >> येथील म्हसवे शिवारातील स्वामी नारायण नगरात १५ डिसेंबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने बंद घर फोडून ४० हजारांची रक्कम लंपास केली. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात वाहन चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या पाठोपाठ चोरट्यांनी बंद घरांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. राहुल बापू शिंदे यांनी चोरीप्रकरणी पारोळा पोलिसांत फिर्याद दिली. त्यात त्यांच्या घराजवळील रहिवासी हितेंद्र कोतवाल […]

Read More

बहिणीशी प्रेमाचा सूत असल्याच्या संशयावरून भावाने पारोळ्यातील एका तरुणावर केले ब्लेडने वार

पारोळा >> बहिणीसोबत प्रेम संबंधाच्या संशयावरून संतप्त झालेल्या भावाने एका तरुणावर भर चौकात ब्लेडने वार केले. शुक्रवारी दुपारी ४ वाजता पारोळा शहरातील गणेश इलेक्ट्रिकल पुढील शिरोडे प्रोव्हिजनसमोर ही घटना झाली. ब्लेडने वार केल्याने जखमी झालेल्या तरुणावर धुळे येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, ही माहिती मिळताच पोलिसांनी तासाभरात संशयित अजय चौधरी याला जुलामपुरा भागातून ताब्यात घेतले. […]

Read More