Source By Google

बोदवड : खडसेंच्या प्रवेशासाठी ५० गाड्यांनी कार्यकर्ते जाणार

बोदवड ::> तालुक्यातील ५०० कार्यकर्ते एकनाथ खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. बोदवड तालुक्यात नगरपंचायत, पंस, जिपचे २ सदस्य व अनेक ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे कार्यकर्ते तयारीला लागले आहे. ५० वाहने घेऊन कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होणार आहे. बुधवारी दुपारी २ वाजता बोदवड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर खडसे समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. […]

read more

बोदवडात ऑनलाईन कॅशबॅक ऑफरच्या बहाण्याने 99 हजार रुपयांत लुटले

बोदवड प्रतिनिधी ::> फोन-पे वरून कॅशबॅकची ऑफर असल्याची बतावणी करत बँक खात्यातील ९८ हजार ७३१ रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार बोदवड येथे उघडकीस आला. याप्रकरणी बोदवड येथे गुन्हा दाखल झाला. शहरातील बाजार समितीच्या दुसऱ्या मजल्यावर अनमोल विमा सेवा येथे रवींद्र रमेश पाटील (वय २० रा.प्रभाग क्रमांक १०, महादेव मंदिराजवळ, बोदवड) हे खासगी नोकरी करतात. त्यांना फोन-पे […]

read more

बोदवडात प्रकाश हॉटेलमध्ये बिलावरून राडा करत ८ जणांनी मालकालाच केली मारहाण

बोदवड प्रतिनिधी ::> शहरातील मलकापूर रस्त्यावरील प्रकाश हॉटेल व परमिट रूम बिअर बारमध्ये जेवणाचे बिल देण्याच्या कारणावरून आठ ते दहा तरुणांनी हॉटेल चालकाच्या दोन पुतण्यांना मारहाण व शिवीगाळ केली. शुक्रवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळेत ही घटना घडली. या प्रकरणी प्रफुल्ल सुरेश ठोसरे व अनोळखी आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. या घटनेमुळे […]

read more

बोदवडकरांसाठी गुड न्यूज रेल्वे स्टेशनवर महाराष्ट्र एक्सप्रेसला थांबा

बोदवड प्रतिनिधी ::> तालुक्यात गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली रेल्वेसेवा आता सुरू झाली आहे. बोदवड स्टेशनवर एकमेव ०१०३९ कोल्हापूर-गोंदिया स्पेशल महाराष्ट्र एक्सप्रेस सुरू झाली आहे. या गाडीचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खान्देश प्रवासी मंचने केले आहे. प्रवाशांनी जास्तीत जास्त रेल्वेसेवेचा उपयोग करुन रेल्वेच्या उत्पन्नात भर घालावी. तसेच शालिमार-दादर, अमरावती-सुरत, विदर्भ एक्सप्रेस, नवजीवन एक्सप्रेस, हावडा […]

read more

बोदवडातील ९ लाख रुपयांच्या चोरी प्रकरणात परराज्यातील चोरट्यांची टोळी

बोदवड ::> शहरातील स्टेट बॅकेतून झालेल्या ९ लाख रुपयांच्या चोरी प्रकरणात परराज्यातील चोरटे असल्याची माहिती पोलिसांना लागली आहे. तर त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी व्यक्त केला आहे. गत वर्षी स्टेट बँक मध्ये पेट्रोल पंपाचा भरणा करण्यासाठी आलेल्या ज्वालासिंग याच्या जवळची सत्तर हजारा ची रोकड तर यंदा १७ सप्टेंबर […]

read more

बोदवड-साळशिंगीत शेतातून चार क्विंटल कापसाची चोरी ; गुन्हा दाखल

साळसिंगी प्रतिनिधी ::> बोदवड तालुक्यातील साळसिंगी शिवारातून चाेरट्यांनी चार क्विंटल कापसाची चाेरी केल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस अाले. या प्रकरणी येथील पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. साळशिंगी शेत शिवारात येथे सुभद्राबाई टिलू महाजन यांचे चार एकर शेत असून त्यांचा मुलगा निवृत्ती महाजन हा सर्व शेती सांभाळताे. या शेतातून साेमवारी रात्री शेतात चाेरटे व वन्य प्राणी […]

read more

शिवसेना नेता कोरोनामुक्त व्हावा म्हणून मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांनी मंदिरात जाऊन केली पूजा-अर्चा! व्हिडीओ व्हायरल

मुक्ताईनगर प्रतिनिधी ::> जिल्ह्यातील मुक्ताईनगर-बोदवड विधानसभेचे शिवसेना राष्ट्रवादी पुरस्कृत आमदार चंद्रकांत पाटील यांनी बोदवड तालुक्यातील शिरसाळा हनुमान तीर्थक्षेत्र येथे थेट मंदिरात प्रवेश करून पूजा अर्चा केली. एकीकडे लॉकडाऊन पासून मंदिर तीर्थक्षेत्र बंद आहेत. मात्र आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिरसाळा हनुमान तीर्थक्षेत्रावर जाऊन आपल्या कार्यकर्त्यांसोबत थेट मंदिरात प्रवेश केला असून शिवसेना नेते व राज्याचे नगरविकास मंत्री […]

read more

माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा बोदवड पंचायत समितीतून हटवला फोटो

बोदवड ::> पंचायत समितीच्या बांधकाम विभागात लावलेला एकनाथ खडसे यांचा फोटो काढण्यासंदर्भात युवासेनेने मंगळवारी, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) आर.बी.सपकाळे यांना निवेदन दिले. तसेच फोटो न हटवल्यास आंदोलनाचा ईशारा दिला. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटात खडसे यांचा फोटो काढण्यात आला. ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकानुसार शासकीय कार्यालयात जिल्हास्तरीय अथवा राज्यस्तरीय राजकीय व्यक्तींचे फोटो लावण्यास प्रतिबंध आहे. तरीही बोदवड पंचायत समिती […]

read more

गेम करून टाकू अशी धमकी देत बोदवड तालुक्यात महिलेचा विनयभंग; 4 जणांवर गुन्हा दाखल

बोदवड प्रतिनिधी ::> तालुक्यातील कुऱ्हा हरदो येथील महिलेचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. चार संशयितांविरुद्ध बोदवड पोलिसांत गुन्हा दाखल झाला. कुऱ्हा हरदो येथील जि.प.मराठी शाळेच्या वॉल कंपाऊंडचे बांधकाम सुरू आहे. सोमवारी राहुल मधुकर माळी, विशाल मधुकर माळी, अतुल मधुकर माळी व मधुकर दामू माळी हे कंपाऊंडची पाहणी करण्यासाठी गेले होते. हे बांधकाम बोगस आहे. […]

read more

बोदवडात विवाहितेचा विनयभंग, संशयित अटकेत

बोदवड ::> शहरातील माळी गल्लीतील रहिवासी संशयित कैलास सीताराम माळी (वय ३१) याने बुधवारी (दि.२३) रात्री रेणुका माता मंदिराजवळील रस्त्यावर विवाहितेचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडीतेच्या फिर्यादीरूवरून बोदवड पोलिसांत गुन्हा दाखल झाला. संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास विलास महाजन करत आहेत.

read more

ऑक्टोबरमध्येच जिल्ह्यातील कापूस, मका खरेदी सुरू करावी : राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील

जलसंपदामंत्री जयंत पाटलांकडे करणार मागणी रिड जळगाव बोदवड टीम ::> जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे येत्या बुधवारी जिल्ह्यात येणार आहेत. जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प, केळीवर आलेली रोगराई, मका आणि कापूस खरेदी ऑक्टोबरमध्येच सुरू करण्याच्या विषयासाठी त्यांच्याकडे मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील बोदवड उपसा सिंचन प्रकल्पासह अन्य अपूर्ण […]

read more

बोदवडला शनिवारी-रविवारी दोन दिवस कडकडीत बंद पाळणार

बोदवड ::> कोरोनाचा संसर्ग तालुक्यात दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे बोदवड येथे आज गुरुवारी सायंकाळी ५ वाजता गांधी चौकात सर्व व्यापारी संघटना, दुकानदार, हातगाडीधारक, टपरी, आॅटोरिक्षाचालक, भाजीपाला विक्रेत्यांसह इतर सर्व दुकानदारांची सभा झाली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आगामी शनिवारी आणि रविवारी दोन दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे शनिवार आणि रविवारी या दोन दिवशी […]

read more

बोदवड शहरात २५ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

प्रतिनिधी बोदवड ::> शहरात २५ वर्षीय राहुल विश्वनाथ माळी या युवकाने माळी वाड्यातील आपल्या जुन्या घरी छताला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन अात्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस अाली. अात्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी त्याचा लहान भाऊ विशाल विश्वनाथ माळी, रा.गाेरक्षनाथ नगर याच्या खबरी वरून येथील पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद […]

read more

बोदवडात मारूती ओमनी कारने घेतला अचानक पेट

बोदवड प्रतिनिधी >> साळशिंगीकडून बोदवडकडे येणार्‍या कारने अचानक पेट घेतल्याची घटना येथे आज घडली असून यातील चालकाने प्रसंगावधान राखत बाहेर पडल्याने अनर्थ टळला. साळशिंगीकडून बोदवडकडे येणार्‍या मारूती ओमनी कंपनीच्या कारने शहरातील शारदा कॉलनीजवळ अचानक पेट घेतला. यातील चालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबवत बाहेर उडी घेतली. तर परिसरातील नागरिकांनी धाव घेत आज विझवली. संबंधीत ओमनी कार […]

read more

बोदवड येथे मोहरम पर्वाचा समारोप

रिड जळगाव प्रतिनिधी : >> बोदवड येथील हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेल्या मोहरमच्या चार दिवशीय सवारीच्या शेवटचा करबला करीत रविवारी समारोप झाला. तहसीलदार हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक बळीराम हिरे, उपनिरीक्षक भाईदास मालचे यांच्यासह प्रशासनाच्या नियंत्रणाने कायदा व सुव्यवस्था राखत शांततेत पार पडला. यासाठी गांधी चौक परिसररातील दर्ग्यामध्ये सर्व सवारींचा समारोप करण्यात आला. त्यामध्ये शहरातील समस्त […]

read more

बोदवड येथे मंदिरे उघडण्यासाठी भाजपातर्फे घंटानाद आंदोलन

बोदवड प्रतिनिधी :>> राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने जागतिक कोरोना संकट काळात दारूच दुकाने उघडी केलीत,बाजारपेठा उघड्या केल्यात,मात्र राज्यातील मंदीरे बंद आहेत.त्यामुळे सरकार भाविक भक्तांच्या भावनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. केंद्र सरकारने दि.४ जून २०२० रोजी नियमावलीसह मंदिरे उघडण्यासाठी परिपत्रकही जारी केले तरी,मात्र अजूनही सरकारने राज्यातील देवस्थाने बंदच ठेवली आहेत. मंदिरे सुरू करा या मागणी […]

read more

बोदवड तालुक्यातील मनुर येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

कैलास कोळी प्रतिनिधी मनुर बुद्रुक ता. बोदवड>> येथील युवा शेतकरी विशाल परशुराम शेळके यांनी आपल्या बोदवड येवती रोडवरील मोठा मुंजोबा जवळील येवती शिवारातील आपल्या मक्याच्या शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मागच्या दोन वर्षापासून सततचा दुष्काळ व यावर्षी ही जेमतेम पेरणी झाली नंतर पावसाने लपंडाव चालू केला, आता पंधरा […]

read more

बोदवड शहरात चिखलमय झालेल्या रस्त्यांमुळे नागरिक हैराण

चिखलयुक्त रस्त्याने ये – जा करणाऱ्या त्रस्त नागरिकांची नगरपंचायत प्रशासनाकडे मागणी बोदवड प्रतिनिधी >> शहरातील विविध प्रभागांमधील रस्ते चिखलमय झाल्याने नगर पंचायत प्रशासनाने उचित उपाययोजना करून शहरातील रस्ते चिखलमुक्त करावे अशी मागणी जोर धरत आहे. पावसाळा सुरू होण्याआधी रस्ते कॉंक्रिटीकरण न झालेल्या विविध प्रभागांमधील रस्त्यांवर नगरपंचायत प्रशासनाकडून मुरूम टाकून योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक होते. […]

read more

बोदवड तालुक्यातील साळशिंगी येथील ३५ वर्षीय बेपत्ता तरुणाचा विहरीत आढळला मृतदेह!

साळशिंगी ता. बोदवड वार्ताहर >> येथील बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा तिसर्‍या दिवशी विहिरीत मृतदेह आढळला आहे. उमेश प्रल्हाद चौधरी ( 35) असे मयताचे नाव आहे. 6 रोजी चौधरी हे घरात कोणालाही न सांगता घरातून सकाळी सहा वाजता बाहेर गेले होते व परिसरात त्यांचा शोध सुरु होता. बुधवारी सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास साळशिंगी शेती शिवारात जलचक्र […]

read more

बोदवडात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपनगराध्यक्षांच्या भावासह पाच जणांवर गुन्हा दाखल

बोदवड >> जिल्हाधिकाच्या आदेशानुसार फौजदारी प्रक्रिया साहितांचे कलम १४४ प्रमाणे सध्या कोरोना विषारी संसर्गजन्य विषाणू आजारापासून नागरिकांचे संरक्षण करिता जमाव बंदी, संचार बंदी, जिल्हा बंदी असताना आदेशाच पालन न करता शहरात सार्वजनिक ठिकाणी आठवडे बाजार भरवून तोंडाला मास्क न लावता मानवी जीवित व व्यक्तिगत आरोग्य धोक्यात येईल असे कृत्य करून संसर्ग पसरवण्याची घातक कृती करून […]

read more