भुसावळ-कंडारी येथे ३० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

भुसावळ ::> शहरालगतच्या कंडारी येथील रहिवासी अनिल रमेश कोरी (वय ३०) यांनी राहत्या घरात बुधवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. या घटनेमागील कारण स्पष्ट झालेले नाही. हवालदार इकबाल सय्यद, समाधान पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा केला. वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला.

read more

३९ वर्षीय तरुणाची तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या

भुसावळ ::> तापी नदीच्या पुलावरून उडी घेत साकरी (ता.भुसावळ) येथील युवकाने सोमवारी दुपारी ३ वाजता आत्महत्या केली. संतोष भोळे (वय ३९) असे मृताचे नाव आहे. पुलावरून उडी घेताच नदीपात्रातील खडकावर आपटल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेत मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढला. शहर पोलिस ठाण्यात अकस्मात […]

read more

भुसावळ : अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा संशयित जाळ्यात

भुसावळ ::> अमरावती येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी नागपुरी गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील संशयीत भुसावळात असल्याची माहिती मिळाल्याने बाजारपेठ पोलिसांनी बुधवारी त्याच्या मुसक्या आवळल्या. विशाल जितेंद्र जावळे ( रा.जामनेर रोड, वाल्मीक नगर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. संशयित जावळे याचा अमरावती पोलिस शोध घेत होते. तो भुसावळात आल्याची माहिती अमरावती […]

read more

भुसावळात ओटीपी विचारून ऑनलाईन चोरट्यांचा दोन लाखाचा लावला चुना

बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल भुसावळ ::> बँकेत पेन्शन अपडेट करायचे आहे, त्यामुळे तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सांगा, असे सांगून भामट्याने ओटीपी मिळवत पाटबंधारे खात्यातील निवृत्ताच्या बँक खात्यातून २ लाख ६ हजार रुपये परस्पर काढून घेतले. २६ सप्टेंबरला ही घटना उघडकीस आली, याप्रकरणी मंगळवारी रात्री बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शहरातील जामनेर रोडवरील रहिवासी […]

read more

वरणगाव बोहर्डी शिवारात अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्यांना पकडले ; २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

वरणगाव ::> येथून जवळच असणाऱ्या बोहर्डी बुद्रुक शिवारातून अवैधरित्या गौणखनिज वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांनी पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या घटनेबाबत महसूल विभाग अनभिज्ञ होता. शुक्रवारी रात्री ९ वाजता बोहर्डी बुद्रुक येथून अवैधा गौणखनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर वरणगाव येथे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याबाबत मंडळाधिकारी अधिकारी योगिता पाटील यांना देण्यात आली. त्या माहितीच्या आधारे येथील […]

read more

यावल-निमगाव येथील ४५ वर्षीय विवाहितेची तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या

यावल ::> तालुक्यातील निमगाव येथील एका ४५ वर्षीय विवाहितेने तापी नदीच्या पुलावरून उडी घेवून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. ही घटना बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. विजया दशरथ कचरे असे मृत महिलेचे नाव आहे. या बाबत फैजपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निमगाव येथील विजया दशरथ कचरे ही विवाहिता बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता […]

read more

भुसावळ-वांजोळा गावात पाच वर्षीय मूकबधिर मुलीवर अत्याचार

भुसावळ >> तालुक्यातील वांजोळा येथे एका पाच वर्षीय मूकबधिर बालिकेवर तिच्याच नात्यातील ३० वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. संशयित मंगल भील यास तात्काळ अटक केली आहे. बालिका घरी एकटी असताना नराधमाने तिला सायकलवर बसवत स्वत:च्या घरी आणून अत्याचार केला. याच […]

read more

भुसावळात युवकाच्या खूनप्रकरणी ४ संशयितांना अटक, एकचा कसून शोध

भुसावळ ::> पंचशीलनगरात रविवारी रात्री शेख कैफ शेख जाकीर (वय १६) याचा डोक्यात रॉडने वार करून खून झाला होता. अवैध दारू विक्रीच्या वादातून ही घटना घडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणात चार संशयितांना पोलिसांनी अटक केली. धम्म प्रिय उर्फ धम्मा मनोहर सुरळकर (वय १८), समीर उर्फ कल्लू अजय बांगर (वय १८), शुभम पंडित […]

read more

भुसावळात अल्पवयीन मुलाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून खून खुनाने !

भुसावळ प्रतिनिधी ::> शहरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्याचा खून केल्याची घटना पंचशीलनगर भागात, रविवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास घडली. युवकाला त्याच्या नातेवाइकांनी डॉ.मानवतकर हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. त्यामुळे संतप्त झालेल्या मृताच्या नातेवाइकांनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. या घटनेमागील कारण स्पष्ट झालेले नाही. शहरातील पंचशीलनगर परिसरात रविवारी […]

read more

वरणगावात २३ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

वरणगाव प्रतिनिधी ::> येथील गणपती नगरातील मानसिक ताणामुळे आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. सागर भंगाळे (वय २३) असे मृताचे नाव अाहे. या प्रकरणी वरणगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. येथील संजय भंगाळे यांचा मुलगा असलेल्या सागरने मानसिक ताण असह्य झाल्यामुळे पहाटे राहत्या घरातील किचनमधील छताच्या हुकांना दोरी लावून गळफास घेतला. शनिवारी सकाळी ही […]

read more

भुसावळ : साकेगाव, वराडसीम येथे गावठी दारू जप्त

भुसावळ ::> तालुक्यातील साकेगाव अाणि वराडसीम येथे तालुका पाेलिसांनी केलेल्या कारवाईत ८ हजार रुपये किमतीची ९० लिटर गावठी दारू पाेलिसांनी जप्त केली. याप्रकरणी दाेन संशयीतांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. साकेगाव येथील शिंगारबर्डी भागात देवेंद्र अर्जून तायडे आणि वराडसीम येथे भिका सीताराम पाटील या दोघांवर ही कारवाई झाली. याप्रकरणी तालुका पाेलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल […]

read more

वरणगावात शहरात आज शिवसेनेची बैठक

भुसावळ ::> रविवारी (दि.११) दुपारी १ वाजता वरणगाव येथील हनुमान नगरातील अभ्यासिका हॉलमध्ये शिवसेनेची बैठक होणार आहे. रावेर लोकसभा संपर्कप्रमुख विलास पारकर यांची उपस्थिती असेल. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना व अंगीकृत संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी केले आहे.

read more

आयपीएस कुमार चिंथा यांनी घेतला भुसावळचा पदभार

भुसावळ ::> येथील डीवायएसपी गजानन राठाेड यांची नवी मुंबई येथे बदली झाल्याने, भुसावळ विभागाचा पदभार मंगळवारी आयपीएस अधिकारी कुमार चिंथा यांनी स्विकारला. तालुका, बाजारपेठ आणि शहर पाेलिस ठाण्याला भेट देऊन त्यांनी पाेलिस ठाण्यांची पाहणी केली. सहायक पाेलिस अधीक्षक कुमार चिंथा हे मंगळवारी भुसावळात दाखल झाले. डीवायएसपी कार्यालय गाठून त्यांनी तालुका पाेलिस ठाण्याची पाहणी केली. यावेळी […]

read more

१२ वर्षीय बालिकेस फुस लावून पळविले ; तरुणाविरूद्ध गुन्हा दाखल

वरणगाव ::> तळवेल येथील १२ वर्षीय बालिकेस फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी तरुणाविरूद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला. मंगळवारी रात्री ८ वाजता शौचाला जाण्याचा बहाणा करुन मुलगी घराबाहेर गेली होती. बराच वेळ होऊनही ती घरी न आल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. तर शेजारी राहणारा तरुणदेखील गायब होता. त्यामुळे वरणगाव पोलिसात सोमवारी गुन्हा दाखल झाला. सहायक पोलिस […]

read more

भुसावळात हंप्या हत्याकांडातील आरोपीच्या घराला आग

भुसावळ प्रतिनिधी ::> शहरातील भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन नगरसेवक रविंद्र बाबुराव खरात उर्फ हंप्या हत्याकांडातील आरोपी राज उर्फ मोहसीन अजगर खान यांच्या घराला सोमवार रोजी सकाळी आग लागल्याची घटना घडली. याविषयी, शहरात एकच चर्चा होती. शहर पोलीस ठाण्यात मात्र रात्री उशिरापर्यंत कुणीही तक्रार दिली नसल्यामुळे अकस्मात आगीची नोंद करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी निरीक्षक दिलीप […]

read more

हावडा-मुंबई मेल, हावडा एक्स्प्रेस दररोज धावणार ; भुसावळ, जळगावात थांबा!

रिड जळगाव टीम ::> नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, रेल्वे प्रशासनाने हावडा मुंबई मेल व हावडा अहमदाबाद एक्स्प्रेस या गाड्या आठवड्यातून तीन दिवस सुरु केल्या होत्या. मात्र आता रेल्वे प्रशासनाकडून या गाड्या दररोज सोडल्या जाणार आहेत. रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता हावडा-मुंबई मेल आणि हावडा-अमदाबाद या विशेष गाड्या आठवड्यातू तीन दिवस धावत होत्या. मात्र […]

read more

भुसावळ साकेगाव जवळ ओमनी कारला लागली अचानक आग ; जीवितहानी टळली!

भुसावळ प्रतिनिधी ::>> दि. 3 ऑक्टोबर शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास नॅशनल हायवे क्रमांक 6 वर भुसावळ कडून  जळगाव कडे जाणाऱ्या ओमनी कार गाडीची वायर जळल्याने शॉर्टसर्किट झाले आणि अचानक आग लागली. या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसून ओमनी कारमधील सर्व प्रवास करणारे प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील […]

read more

मुंबई ते प्रयागराज दोन विशेष दुरंतो रेल्वे गाड्या धावणार

भुसावळ ::> रेल्वेतर्फे मुंबई ते प्रयागराज दरम्यान दोन दुरंतो विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस ते प्रयागराज दरम्यान या गाड्या धावतील. २ ऑक्टोबरपासून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर सोमवार व शुक्रवारी सायंकाळी ५.२५ वाजता दुरंतो विशेष गाडी सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी १२.४५ वाजता पोहोचेल. तर दुरंतो स्पेशल प्रयागराज येथून दर […]

read more

गावठी पिस्तुल विकणाऱ्या आरोपीला बऱ्हाणपूर येथून पोलिसांनी केली अटक

भुसावळ प्रतिनिधी ::> येथील तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत गावठी पिस्तुल विकणाऱ्यांला अखेर अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर केले असता २ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, भाग 6 गुरून 227/2020 आर्म ऍक्ट 3/25 मधील या गुन्ह्यात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना गावठी पिस्तुल विकणारा प्रमोद उर्फ प्रदीप अशोक सुरवाडे […]

read more

सहा महिलांची १ लाख ८९ हजारांत फसवणूक प्रकरणी संशयिताचे मोबाइल लोकेशन काढणार

भुसावळ प्रतिनिधी ::> कर्जाची मागणी करणाऱ्या सहा महिलांची १ लाख ८९ हजारांत फसवणूक झाल्याची घटना १५ ऑगस्ट ते २५ सप्टेंबर या काळात घडली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी संशयिताचे मोबाईल लोकेशन काढण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. आपणास कर्ज पाहिजे आहे का? अशी जाहिरात वृत्तपत्रात आली होती. या जाहिरातीमधील मोबाइल […]

read more