अमळनेरात बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या मंगळसूत्राची चोरी

अमळनेर प्रतिनिधी >> बसमध्ये चढताना एका महिलेचे १५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास येथील बसस्थानकात घडली. सुरेखा बबन पाटील या टाकरखेडा जाण्यासाठी बुधवारी सकाळी दोंडाईचा ते जळगाव बस (एमएच- १४, बीटी- १३२५)मध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ५ ग्रॅम वजनाचे १५ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र […]

Read More

अमळनेर पंचायत समितीच्या सभापतीची आज होणार निवड

अमळनेर प्रतिनिधी गजानन पाटील >> अमळनेर पंचायत समितीच्या सभापती रेखा नाटेश्वर पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सभापती पदाची निवडणूक २४ डिसेंबरला सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहे. निवडणुकीस पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार मिलिंद वाघ राहतील. त्यांना गटविकास अधिकारी संदीप वायाळ सहाय्य करतील. ही जागा जनरल महिला राखीव असल्याने यात महिलांमध्ये चुरस रंगणार […]

Read More

बेरोजगारीच्या नैराश्यातून २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या

अमळनेर प्रतिनिधी>> बेरोजगारीच्या नैराश्यातून भिलाली ता.अमळनेर येथील २५ वर्षीय तरुणाने गुरुवारी (दि.१७) राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. दुपारी १ वाजता हा प्रकार उघडकीस आला. अनिल शांताराम माळी असे मृताचे नाव आहे. नाशिक येथे गेलेला अनिल माळी हा पाच-सहा वर्षांपासून खासगी नोकरी करत होता. मात्र, कोरोनामुळे या नोकरीवर देखील टाच आल्याने त्याला घरचा रस्ता धरावा […]

Read More

घरात घुसून विवाहितेसोबत अंगलट ; चार जणांवर गुन्हा दाखल

अमळनेर >> पाच वर्षांपूर्वीच्या ओळखीचा गैरफायदा घेत चौघांनी घरात अनधिकृत प्रवेश केला. एकाने विवाहितेचा विनयभंग करून अश्लील शिवीगाळ केल्याची घटना १५ डिसेंबरला दुपारी ४ वाजता वर्धमान नगरात घडली. भालेराव नगरातील संदीप धनराज पाटील याने तीन मित्रांसह घरात अनधिकृत प्रवेश केला. विवाहितेसोबत लगट करून शिवीगाळ केली. महिलेने आरडाओरड करताच चौघे पळून गेले. चौघांविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल […]

Read More

अमळनेरात जनता कर्फ्यूला व्यापारी महासंघाचा विरोध ; निर्णय घेताना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप

अमळनेर >> येथील उपविभागीय कार्यालयात गेल्या आठवड्यात व्यापाऱ्यांच्या बैठकीत ठरल्यानुसार मुख्याधिकाऱ्यांनी शहरात दर रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, शहरातील अनेक संघटनांकडून या निर्णयास विरोध होत आहे. तसेच व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या अमळनेर शहर व्यापारी महासंघाने देखील या जनता कर्फ्यूला विरोध दर्शवला. त्यामुळे प्रशासन विरूद्ध व्यापारी असे चित्र निर्माण झाले आहे. कोरोना नियंत्रणासाठी […]

Read More

अमळनेर तालुक्यातील जनावरांची तस्करी फसली, वाहनचालकाविरुद्ध गुन्हा

अमळनेर प्रतिनिधी >> तालुक्यातील निसर्डी, बहादरवाडी व हेडावे येथून चोरीचे गुरे घेऊन जाणारी चारचाकी धुक्यामुळे रस्त्याच्या कडेला उतरून फसली. यानंतर मंगरूळ येथील युवकांच्या प्रयत्नामुळे या गुरांची सुटका झाली. याप्रकरणी वाहनचालकविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सोमवारी सकाळी ४ ते ५ वाजेदरम्यान एमएच.२३-एन.५५४१ या क्रमांकाच्या वाहनातून गुरांची वाहतूक सुरू होती. मंगरूळ चालकाचे नियंत्रण सुटून गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन […]

Read More

जिल्ह्यातील या शहरात उद्यापासून असणार दर रविवारी जनता कर्फ्यू

अमळनेर प्रतिनिधी >> अमळनेरात उद्या रविवार दि.१३ पासून दर रविवारी जनता कर्फ्यू सुरू करण्याचा व्यापाऱ्यांच्या बैठकीत स्वयंस्फुर्तीने न.पा.प्रशासनाचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी शहरातील वैद्यकीय सेवेसाठी औषधे दुकान,कृषी सेवा विषयक दुकाने, दूध व्यवसायीक, आत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.असे न.पा.प्रशासनाने पत्रांन्वये कळविले आहे.

Read More

अतिवृष्टीमुळे बाधित २० गावातील शेतकऱ्यांसाठी ५ कोटी अनुदान ; ५२ गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळणार- आ. अनिल पाटील

अमळनेर प्रतिनिधी >>गेल्या वर्षी जुलै २०१९ मध्ये अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या २० गावातील शेतकऱ्यांसाठी ५ कोटी अनुदान प्राप्त झाले. तसेच शासन दरबारी पाठपुराव्याचे हे पहिले यश आहे. याच पद्धतीने टप्प्याटप्प्याने संपुर्ण ५२ गावातील बाधित शेतकऱ्यांना एकूण १२ कोटी अनुदान मिळून १०० टक्के न्याय मिळेल अशी माहिती आ. अनिल भाईदास पाटील यांनी दिली आहे. अनुदानाची रक्कम लवकरच […]

Read More

अमळनेर बस स्थानकावरून महिलेचे मंगळसूत्र लंपास

अमळनेर >> अमळनेर बस स्थानकावरून महिलेचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना सोमवाारी दुपारी घडली. ७ तारखेला मोठ्या प्रमाणात लग्नतिथी होती, तर सोमवारचा बाजार असल्याने बस स्थानकावर गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत दुपारी ३.२० वाजता धुळे यावल बसने फैजपूर जाणाऱ्या सुनीता माधव भोई यांचे पाच ग्रॅम वजनाचे २५ हजारांचे मंगळसूत्र १४ ते १५ वर्षाच्या मुलीने धक्का […]

Read More

अमळनेरात भावजायीला शरीरसुखाची मागणी करुन विनयभंग ; तिच्यासह भावाला आई-वडिलांना मारहाण

अमळनेर >> भावजयीचा विनयभंग करून तिच्यासह भावाला आणि आई-वडिलांना मारहाण केल्याची घटना ४ रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. माळीवाडा, अमलेश्वर नगरमधील मूळ रहिवासी असलेली व मुंबई येथे राहणारी एक विवाहिता मामांचे निधन झाल्याने अमळनेर येथे आली हाेती. ४ रोजी रात्री महिलेचे जेठाने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करुन विनयभंग केला. तसेच महिलेचा पती व त्याचा भाऊ […]

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्वपूर्ण बैठक

प्रतिनिधी अमळनेर >> तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची महत्वपुर्ण आढावा बैठक आज दि 04 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता येथील राष्ट्रवादी पार्टीच्या अमळनेर कार्यालयात आयोजित केली आहे. बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच संभाव्य नगर परिषद, ग्रामपंचायत निवडणुका व संघटना बांधणीसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण आढावा बैठक आयोजित […]

Read More

चारित्र्यावर संशय घेऊन चौघांची विवाहितेस मारहाण ; धमकी देत केला विनयभंग!

तू शेतीत हिस्सा मागू नको. अन्यथा तुला ठार करू जेठाकडून विवाहित महिलेला धमकी अमळनेर प्रतिनिधी >> शेतीचा वाटा का मागते? अशी विचारणा करत ठार मारण्याची धमकी देत आणि महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन जेठ, जेठनी, पुतणी व जेठणीच्या मैत्रिणीने मारहाण व विनयभंग केला. ही घटना ३० नोव्हेंबरला तालुक्यातील बहादरवाडी येथे घडली. बहादरवाडी येथील रहिवासी विवाहितेचे पती […]

Read More

अमळनेर बीडीओसह ६ जणांवर खंडणीचा गुन्हा

गजानन पाटील प्रतिनिधी अमळनेर >> वैयक्तिक शौचालय योजनेत एक लाखाची खंडणी मागणे, सरपंचपदाचा कालावधी नसताना मठगव्हाण येथील सरपंचावर अपहाराचा आरोप करून त्यांच्या अपात्रतेचा प्रयत्न केल्याप्रकरणी अमळनेर गटविकास अधिकारी, दोन विस्तार अधिकाऱ्यांसह सहा जणांवर मंगळवारी खंडणी, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. मठगव्हाण (ता.अमळनेर) येथील तत्कालीन सरपंच मायाबाई प्रवीण वाघ यांनी ३० नोव्हेंबरला तक्रार दिली होती. त्यात त्या […]

Read More

कापसाच्या मापात पाप घालणाऱ्यां व्यापाऱ्यांना चाप द्या सामजिक कार्यकर्ते रजनीकांत पाटील

अमळनेर :- तालुक्यातील बऱ्याच ठकाणी होत असलेला हा कापसाचा काळाबाजार सुरू आहे असे बरेच प्रकार उघडकीस येत असता मात्र त्यांना काही वरिष्ठ पुढारी व नातेसंबंध दाखवून दाबले जातात हे याबाबत शेतकरी हा दिवसरात्र उन्हात राब राबत कापसाच्या एक एक झाडाची आपल्या मुलासारखी निगा राखत देखरेख करत त्याला वाढवतो व दिवसभर उन्हा तान्हात उभा राहून तो […]

Read More

पातोंडा येथे मृत माकडावर वाजतगाजत अंत्यसंस्कार

अमळनेर >> हनुमानाचे प्रतिरूप व माणसाप्रमाणे वावर असलेले तसेच आपण वानरांचे वंशज आहोत. या उद्देशाने येथिल ग्रामस्थांनी मृत्यू पावलेल्या एका वानराची (माकडाची) अंत्ययात्रा मानवाच्या विधिवत अंत्ययात्रे प्रमाणे वाजतगाजत दि.२६ च्या सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान काढली. अंत्ययात्रेस बहुसंख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. सविस्तर की येथे गेल्या सातआठ दिवसापासून दोन ते तीन माकड गावात आले […]

Read More

यंदा त्रिपुरारी पौर्णिमेस अंतूर्ली येथील कार्तिक स्वामी मंदिर राहणार बंद

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टीनचा निर्णय अमळनेर >> दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेस भाविकांसाठी खुले असणारे अंतुर्ली येथील कार्तिक स्वामी मंदिर यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्याचा निर्णय विश्वस्तांनी घेतला आहे.दरवर्षी अंतुर्ली येथील कार्तिक स्वामींचा यात्रोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडत असतो.मात्र, यंदा कोरोना मुळे भाविकांना दर्शनापासून वंचित राहावे लागणार आहे. कार्तिक महिन्यात त्रिपुरारी पौर्णिमा दि. २९ रोजी आहे. दरम्यान,कोरोनाच्या […]

Read More

अमळनेर समता परिषदेतर्फे ओ.बी.सी आरक्षण बचावासाठी तहसीलदारांना निवेदन…!

अमळनेर >> येथील अ.भा महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी राज्य सरकारने उच्य व सर्वोच्य न्यायालयात वकील नियुक्त करावा व ओबीसी कोट्याला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे ह्या मागणीचे निवेदन तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना देण्यात आले. मराठा समाजाचा समावेश ओबीसींमधे झाल्यास ५२% लोकसंख्या असलेल्या ओबीसींना अवघ्या १७% जागा दिल्या गेल्या आहेत […]

Read More

अमळनेर-धुळे रस्त्यावरील कोरडे वृक्ष वाहनधारकांसाठी बेतू शकते जिवावर ?

रजनीकांत पाटील अमळनेर >> अमळनेर-धुळे हायवे रस्त्यावरील डांगर या गावापुढे रस्त्याच्या कडेला एक कोरडे वृक्ष उभे असून त्या वृक्षाच्या कोरड्या फांद्या या लांबल्या असल्याने ते कधीही खाली पडू शकते व एखाद्याचा जीव देखील घेऊ शकते त्या कोरड्या वृक्षामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असून सदर धोकादायक वृक्ष काढण्यात यावा, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे. रस्त्यावरील धुळे […]

Read More

विटंबनेची अफवा निघाल्याने खवशी ग्रामस्थांनी सोडला नि:श्वास

लहान मुलांच्या खेळण्यातून अनवधानाने झाला प्रकारअमळनेर प्रतिनिधी >> तालुक्यातील खवशी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची बातमी सर्वत्र पसरली आणि प्रशासन सज्ज झाले. मात्र, लहान मुलांच्या खेळण्यातून हा प्रकार झाल्याचे लक्षात आल्यावर ती अफवा ठरली आणि ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तालुक्यातील खवशी येथे अज्ञात व्यक्तीने एका महापुरुषांच्या पुतळ्यावर शेणाचा मारा करुन पुतळ्याची विटंबना केल्याचे […]

Read More

जिल्ह्यात होमगार्डच्या कानफटात मारून पोलिसाची कॉलर पकडत घातली हुज्जत!

अमळनेर प्रतिनिधी गजानन पाटील >> शहरातील वाहतूक नियंत्रण करणार्‍या होमगार्डला कानफटात मारून पोलिसांची कॉलर पकडण्याची घटना आज सुभाष चौक ते पाच कंदील चौकाच्या दरम्यान घडली आहे. सुभाष चौकात वाहतुकीची कोंडी झालेली असताना होमगार्ड निलेश दिलीप मराठे हे वाहतूक नियंत्रण करत होते. तेव्हा पानखिडकी भागातील इस्माईल जहुर पठाण उर्फ इस्माईल खड्डा हा अचानक येऊन निलेश मराठे […]

Read More