आमदार मंगेश चव्हाण यांना दर सोमवार, मंगळवारी लावावी लागणार चाळीसगाव पोलिस ठाण्यात हजेरी

प्रतिनिधी जळगाव >> महावितरणचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुक शेख यांना मारहाण केल्याप्रकरणी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांना सोमवारी जिल्हा न्यायालयाने अटीशर्तींवर जामीन मंजूर केला. न्यायाधीश छाया पाटील यांच्या न्यायालयात आमदार चव्हाण यांच्यासह सर्व संशयितांच्या जामीन अर्जावर दोन्ही पक्षांचे युक्तिवाद १ एप्रिल रोजी पूर्ण झाले होते. दरम्यान, सोमवारी न्यायालयाने सर्वांना जामीन अर्ज मंजूर केले. […]

Read More

यावल तालुक्यात ४५ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

यावल >> तालुक्यातील न्हावी येथे शेतातील विहिरीत उडी घेऊन एका ४५ वर्षीय शेतमजुराने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री घडली असून प्यारसिंग रेमसिंग बारेला असे मृत शेतमजुराचे नाव आहे. न्हावी येथील शेतकरी टेनु डोंगर बोरोले यांच्या न्हावी शिवारातील शेतात सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतात कामास असलेल्या प्यारसिंग रेमसिंग बारेला, रा. माळीवाडा याने शेतातील […]

Read More

सावदा येथील गुरांचा बाजार बंद, सुमारे ४० लाखांची उलाढाल ठप्प

सावदा >> येथे रविवारी भरणारा आठवडे बाजार तसेच गुरांचा बाजार रद्द करण्यात आला होता. मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी तीन दिवस आधी या संदर्भात शहरात दवंडी दिली होती. रविवारी या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी झाली. दोन्ही बाजार बंद असल्यामुळे सावद्यात आठवडे बाजारातून होणारी उलाढाल ठप्प होती. एकही शेतकरी आणि व्यापारी बाजारात हजर नव्हता. आठवडे बाजार तसेच गुरांच्या […]

Read More

राज्य सरकारमुळे धान्य खरेदी ठप्प : आमदार मंगेश चव्हाण

चाळीसगाव प्रतिनिधी राज देवरे >> तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी नोंदणी केली असताना त्या अंतर्गत मका, ज्वारी व बाजरी या धान्य पिकांची २० टक्केही खरेदी झालेली नाही. केंद्र सरकारने खरेदीचे उद्दिष्ट वाढवण्यासाठी मागितलेली माहितीही राज्यातील महा विकास आाघाडी सरकारने दिली नाही. त्यामुळे या सरकारचे शेतकरी प्रेम केवळ नाटकी असल्याची टीका तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केली आहे. […]

Read More

महाविकास आघाडीला कृषी कायद्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही- खा. उन्मेष पाटील

चाळीसगाव प्रतिनिधी >> केंद्राचे कृषी कायदे हे शेतकर्‍यांच्या हिताचे असून महाविकास आघाडीला यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे प्रतिपादन खासदार उन्मेष पाटील यांनी केले. ते भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अंत्योदय कार्यालयात आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलत होते. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अंत्योदय कार्यालयात शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रारंभ स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या […]

Read More

सावधान मुक्ताईनगर तालुक्यात आढळला वाघाचा वावर

मुक्ताईनगर >> तालुक्यातील डोलारखेडा वनहद्दीत गावातील वन कार्यालयाच्या बाजूला असलेल्या गुरांच्या हौदाजवळ वाघाने, आठवडाभरात पाणी पिण्यासाठी तब्बल दोन वेळेस हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी मध्यरात्री तसेच पाच ते सहा दिवसांपूर्वी रात्री आठ वाजेच्या सुमारास वाघ या ठिकाणी आल्याचे सांगितले जाते. दोन दिवसांपूर्वी तालुक्यात वाघाने गायीची शिकार केल्याची घटना समोर आली आहे.

Read More

यावल-निमगाव शिवारात बिबट्या आढळल्याने खळबळ ; सावधानता राखण्याची गरज

यावल प्रतिनिधी >> तालुक्यातील निमगाव शिवारात गुरूवारी पहाटे बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिवारात पाहणी करून बिबट्याच्या पायांचे ठसे घेतले. शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी, अशी सूचना देण्यात आली आहे. निमगाव येथील शेतकरी अरुण जुलालसिंग पाटील यांच्या शेतात गुरूवारी पहाटे बिबट्या दिसला. या बाबत तात्काळ यावल प्रादेशिक वनविभागास माहिती देण्यात […]

Read More

चोपड्यातील भार्डू शिवारात आढळला बिबट्या!

चोपडा राजेंद्र पाटील प्रतिनिधी >> तालुक्यातील भार्डू येथे १३ डिसेंबरला सकाळी ११ वाजेच्या सुमारास सालगडी बैल बांधण्यास गेला असता त्याच्यावर बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. त्यानंतर रात्री ११ वाजता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्या पकडण्यात यश मिळाले. भार्डू येथील शेतकरी मिलिंद पाटील यांच्या शेतात कामाला असलेला सालगडी नाना पावरा हा सकाळी ११ वाजता शेतात […]

Read More

बोदवड बाजार समितीमध्ये बैलगाडीतून ७५ किलो कापसाची चोरी

बोदवड प्रतिनिधी >> येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या सीसीआय कापूस खरेदी केंद्रात विक्रीसाठी आणलेल्या ७५ कि.ग्रॅ. कापसाची चोरी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. यामुळे कापूस घेऊन आलेल्या वाहनांच्या पहाऱ्यासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे. गुरुवारी येथील शेतकरी महिला रत्‍नाबाई दिलीप माळी यांनी येथील सीसीआय खरेदी केंद्रावर कापसाच्या दोन बैलगाड्या भरून आणल्या […]

Read More

व्यापाऱ्यांना टोकन दिल्यास कारवाई; जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला इशारा

जळगाव >> किमान आधारभूत दराने करण्यात येत असलेली कापूस खरेदी पारदर्शीपणे पार पाडा. कापूस खरेदीचे टोकन देताना शेतकऱ्यांना अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी, खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना टोकन दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सहकार, कापूस पणन महासंघ व सीसीआयच्या […]

Read More

कृषी विधेयकाविरुद्ध यावलला आज आंदोलन

यावल प्रतिनिधी >> येथील तहसील कार्यालयासमोर गुरूवारी कृषी विधेयकांविरुद्ध काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन केले जाणार आहे. उत्तर भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा हे आंदोलन केले जाणार आहे. आमदार शिरिष चौधरी आंदोलनाचे नेतृत्व करतील. माजी आमदार रमेश चौधरी, जिल्हा परिषदेचे गटनेता प्रभाकर सोनवणे, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, बाजार समितीचे माजी सभापती नितिन चौधरी, पंचायत समितीचे माजी सभापती लिलाधर […]

Read More

कापूस खरेदीसाठी कट्टी लावू नका, शेतकऱ्यांची लूट थांबवा : शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची चोपड्यात मागणी

राजेंद्र पाटील चोपडा प्रतिनिधी >> यंदा शेतकरी अनेक संकटांना तोंड देत आहेत. मोठ्या कष्टाने त्यांनी कापूस पिकवला आहे. त्या कष्टाचे मोल त्याला मिळाले पाहिजेत. शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कट्टी लावून अक्षरश: लूट केली जात आहे, ती थांबली पाहिजे, असा सूर शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. सीसीआय कापूस खरेदी केंद्रात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचा […]

Read More

विवरे खु. येथील सुनिल पाटील यांना कृषी भूषण पुरस्कार जाहीर

रावेर >> तालुक्यातील विवरे येथील प्रगतशील शेतकरी सुनिल दामोदर पाटील यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे दिला जाणारा कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. लवकरच पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा संदीपा वाघ बापुसाहेब सुमित पाटील सर यांनी दिली आहे. सुनिल पाटील हे आपल्या शेतीत नेहमीच वेगवेगळे […]

Read More

जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांचा १३० क्विंटल कापूस घेऊन ट्रकचालक रफूचक्कर

पारोळा >> शहरातील चार शेतकऱ्यांचा १३० क्विंटल कापूस घेऊन चालक ट्रकसह पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पारोळा शहरातील योगेश भोसले, पंढरीनाथ पाटील, किशोर दुसाने, नामदेव वाघ (जळगाव) या चारही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन १३० क्विंटल कापूस गुजरात राज्यातील कडी येथील एपीएमसी मार्केटमध्ये विक्रीसाठी नेण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी अक्कलकुवा […]

Read More

केळी खरेदीत १० लाखांवर फसवणूक; व्यापाऱ्यास अटक

जळगाव प्रतिनिधी ::> जिल्ह्यातील केळी व्यापाऱ्याकडून केळीची खरेदी करून त्याचे पैसे न देता १० लाखांवर फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याला जळगाव शहर पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. संतोष रामनरेश गुप्ता (रा.अतुल टॉवर, हिराणेवाडी केळी मार्केट कांदिवली, मुंबई) असे त्या व्यापाऱ्याचे नाव आहे. केळी व्यापारी शालिक दौलत सोनवणे (रा.वराडसीम, ता.भुसावळ) हे सू्र्यकांत विधाते यांच्यासोबत जळगाव शहरातील जयकिसान केला […]

Read More

राज्य सरकार विरोधी ९ नोव्हेंबर रोजी किसान मोर्चा : खा. रक्षा खडसे यांची माहिती

यावल प्रतिनिधी ::> केळी पीक विमा व शेतकरी विरोधी राज्य सरकार विरोधातील दि. ०९ नोव्हेंबर च्या किसान मोर्चा संदर्भात फ्रुटसेल सोसायटी न्हावी ता.यावल येथे बैठक घेण्यात आली. यावेळी उत्तर महाराष्ट्र किसान मोर्चा संयोजक सुरेश धनके, नारायणबापू चौधरी, फ्रुटसेल सोसायटी चेअरमन शरद महाजन, श्री.किशोर विठ्ठल कोलते, डॉ.भरत झोपे, श्री.गणेश नेहते, श्री.नरेंद्र नारखेडे, श्री.भोजराज बोरोले, श्री.भानू चोपडे, […]

Read More

चोपडा तालुक्यात भरड धान्य विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील ::> सन २०२०-२१ या खरीप हंगामात शासनाकडून किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत भरड धन्य केंद्र सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार शेतकी संघामार्फत ज्वारी, मका खरेदीसाठी ४ नोव्हेंबरपासून ऑनलाइन नावनोंदणी सुरू होईल. या केंद्रात ज्वारी २६२०, मका १८५० आणि बाजरीला २१५० प्रती क्विंटल हमीभाव देण्यात येईल. शेतकऱ्यांनी ऑनलाइन नावनोंदणीसाठी चालू […]

Read More

चाळीसगाव तालुक्यात शेतकऱ्याची फसवणूक ; पोलिसात गुन्हा दाखल

चाळीसगाव प्रतिनिधी राज देवरे ::> तालुक्यातील मुंदखेडे येथील शेतकऱ्याने वैद्यकीय उपचारासाठी मासिक ५ रूपये दराने चार लाख २० हजार रूपयांची रक्कम घेतली होती. या बदल्यात ६ एकर शेती गहाण खत करण्याच्या नावाखाली खरेदी खत करून या वृद्ध शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंदखेडे येथील तक्रारदार […]

Read More

पीक विमा धोरण जाहीर झाल्यानंतरच आंदोलन ; शेतकरी-लोकप्रतिनिधींच्या बैठकीत निर्णय

रावेर प्रतिनिधी ::> केळी पीक विम्याचे निकष बदलण्याबाबत शासन स्तरावर मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी पाठपुरावा केला आहे. याबाबत सरकारचे धोरण दोन दिवसांत जाहीर होणार आहे. हे धोरण जाहीर झाल्यानंतरही निकष बदलले नसतील तर त्यानंतर शेतकऱ्यांनी यासाठी आंदोलनाची दिशा ठरवावी. आम्ही लोकप्रतिनिधी असलो तरी शेतकरी व शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आंदोलनात आमचा सहभाग असेल असे आश्वासन […]

Read More

धरणाचे पाणी शेतात गेल्याने शेतकऱ्यांना पाण्यात उभे राहून वेचावा लागतोय कापूस

शहादा प्रतिनिधी ::> तालुक्यातील सुसरी धरणाचे पाणी थेट गोदीपूर ते नवलपूर रस्त्यावर आल्याने हा रस्ताच पाण्यात बुडाला आहे. तसेच परिसरातील काही शेतातही पाणी साचल्याने शेतकऱ्यांवर कंबरे एवढ्या पाण्यात उतरून कापूस वेचणी करण्याची वेळ आली आहे. सुसरी धरणाच्या पाण्यामुळे गोदीपूर ते नवलपूर रस्ता पाण्याखाली गेल्याने गोदीपूर व नवलपूर शिवारात जाण्यासाठी शेतकऱ्यांना चार ते पाच किलोमीटरचा फेरा […]

Read More