एकनाथ खडसेंची अटक टाळण्यासाठी आटापिटा, मात्र दिलासा देण्यास ईडीचा विरोध

मुंबई >> भाजपातून राष्ट्रवादीमध्ये पक्षांतर झालेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी ईडीच्या नोटीसविरोधात याचिका दाखल केली आहे. ईडीने अटकेची कारवाई करू नये, यासाठी एकनाथ खडसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. ईडीने आपले प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले. त्यानुसार एकनाथ खडसेंना अटकेपासून दिलासा देण्यास ईडीचा विरोध आहे. एकनाथ खडसेंच्यावतीने वकिलांनी युक्तिवाद केला. […]

Read More

13 जानेवारी जळगाव जिल्हा वाचा थोडक्यात कोरोना अपडेट्स!

जळगाव >> जिल्ह्यात आज दिवसभरात 37 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 54630 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 499 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 37 नवीन #कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 56468 इतकी झाली. आतापर्यंत 1339 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Read More

श्रीराममंदिर हे ‘राष्ट्रमंदीर’ व्हावे ! महंत जनार्दन हरीजी महाराज यांचे साकळीत प्रतिपादन

साकळी प्रतिनिधी >> मानवाला जीवन जगण्यासाठी हवा, पाणी यासह सृष्टीतील सर्व घटक आपल्याला विनामोबदला मिळत असते व त्याचा आपण उपभोग घेतो. या सर्व गोष्टीचे भान ठेवून आपणही देवाच्या कार्यासाठी आपल्या यथाशक्ती प्रमाणे हातभार लावावा. जेणेकरून आपल्या सर्वांच्या समर्पित सेवेतून अयोध्येतील श्रीराम मंदिराचे निर्माण होऊन ते मंदीर निश्चितच ‘राष्ट्रमंदिर’ होईल असे भावनिक प्रतिपादन महामंडलेश्वर महंत स्वामी […]

Read More

सावधान मुक्ताईनगर तालुक्यात आढळला वाघाचा वावर

मुक्ताईनगर >> तालुक्यातील डोलारखेडा वनहद्दीत गावातील वन कार्यालयाच्या बाजूला असलेल्या गुरांच्या हौदाजवळ वाघाने, आठवडाभरात पाणी पिण्यासाठी तब्बल दोन वेळेस हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी मध्यरात्री तसेच पाच ते सहा दिवसांपूर्वी रात्री आठ वाजेच्या सुमारास वाघ या ठिकाणी आल्याचे सांगितले जाते. दोन दिवसांपूर्वी तालुक्यात वाघाने गायीची शिकार केल्याची घटना समोर आली आहे.

Read More

धानोरा येथील हॉटेलातील ५९ हजारांचा मुद्देमाल चोरीला ; गुन्हा दाखल

धानोरा प्रतिनिधी >> चोपडा तालुक्यातील धानोरा गावा नजदीक असलेल्या हॉटेल जत्रा बियरबार व परमीटचे गोडावून अज्ञात चोरट्यांनी फोडून ५९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीला आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे किशोर मुरलीधर बाविस्कर (वय-३५) रा. अडावद यांचे धानोरा-अडावद रोडवर हॉटेल जत्रा बिअरबार आणि परिमीटचे हॉटेल आहे. त्यांच्या […]

Read More

12 डिसेंबर जळगाव जिल्हा कोरोना अपडेट्स वाचा थोडक्यात!

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 49 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 53337 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 405 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 48 नवीन #कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 55055 इतकी झाली. आतापर्यंत 1313 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यात आज 2498 #कोरोना संशयितांचे स्वॅब घेण्यात आले. आज नव्याने 48 बाधित आढळले तर […]

Read More

जिल्ह्यात २२ डिसेंबरपर्यंत 37 (3) कलम जमावबंदी लागू

जळगाव >> जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात २२ डिसेंबर, २०२० पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) जारी करण्यात आले आहे. या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन कार्यालयाची पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा […]

Read More

व्यापाऱ्यांना टोकन दिल्यास कारवाई; जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला इशारा

जळगाव >> किमान आधारभूत दराने करण्यात येत असलेली कापूस खरेदी पारदर्शीपणे पार पाडा. कापूस खरेदीचे टोकन देताना शेतकऱ्यांना अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी, खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना टोकन दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सहकार, कापूस पणन महासंघ व सीसीआयच्या […]

Read More

Good News : जळगावात कोरोनाची लस येणार ?

रिड जळगाव टीम >> देशासह संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोविड १९ ला रोखण्यासाठीच्या प्रतिबंधक लसीची वाट पाहिली जात आहे. जिल्ह्यातही पहिल्या टप्प्यात १८ हजारांवर आरोग्यग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी येत्या तीन आठवड्यात कोरोना प्रतिंबधक लस जळगाव जिल्ह्यात दाखल होण्याचा आरोग्य यंत्रणेला अंदाज आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी दोन आठवड्यात राज्यासाठी लागणाऱ्या […]

Read More

बातमी का छापली ? म्हणत वाळूमाफियांची पत्रकारास मारहाण

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाळू माफियांचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढतच आहे. तर दुसरीकडे जिल्हा प्रशासन या वाळू माफियांवर नियंत्रण ठेवण्याचाही प्रयत्न करत आहे. गुरुवारी 3 डिसेंबर रोजी संध्याकाळी ‘दैनिकात बातमी का छापली’ असे विचारत त्याचा संताप येऊन एका वाळूमाफियाने पत्रकार अजय पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी तालुका पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला जाणार आहे. […]

Read More

औरंगाबाद, सोलापूर, धुळे, नगरसह ७ जिल्ह्यांतील तलाठी पदे भरणार

मुंबई >> औरंगाबाद, बीड, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा ७ जिल्ह्यांतील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. एसईबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली असल्यामुळे एसईबीसी प्रवर्ग वगळता ही भरती करण्यात येणार […]

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या जिल्हा बैठक

जळगाव >> राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा बैठक बुधवारी आयोजित केली आहे. दुपारी २ वाजता पक्ष कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीला जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील, माजी मंत्री डॉ.सतीश पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार अनिल पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराती यांच्यासह पक्षाचे माजी आमदार, खासदार आाणि पदाधिकाऱ्यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले […]

Read More

चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगावचा जवान अतिरेकी हल्ल्यात शहीद

चाळीसगाव प्रतिनिधी >> श्रीनगरमध्ये सेनेच्या गस्ती पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पिंपळगावच्या (ता. चाळीसगाव) २२ वर्षीय जवानाला गुरुवारी दुपारी वीरमरण आले. यश दिगंबर देशमख असे या शहीद झालेल्या सुपुत्राचे नाव आहे. घटनेनंतर पिंपळगाव येथे त्यांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून माहिती मिळताच त्यांच्या आईला धक्का बसून त्या बेशुद्ध झाल्या. घटनेमुळे तालुक्यात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. यश […]

Read More

जळगाव जिल्हा 24 नोव्हेंबर आजचे कोरोना अपडेटस वाचा थोडक्यात!

जळगाव >> जिल्ह्यात आज दिवसभरात 37 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 52484 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 460 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 57 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 54234 झाली. आतापर्यंत 1290 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Read More

साकळीत सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले ; नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढली ; गावात कोरोना पुन्हा येणार का?

साकळी ता.यावल (वार्ताहर) >> येथे सध्या दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढत असून वातावरणात बदल झाल्यामुळे गावात सर्दी खोकला व तापाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून अनेक घरांमध्ये किमान सर्दी खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढली असून गावात कोरोना परत येतो का ? अशी शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. एकूणच […]

Read More

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा : अभाविप

जळगाव प्रतिनिधी >> विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करुन येत्या परीक्षेसाठी अभ्यासिका आणि ग्रंथालय सुरू करावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेने केली आहे. याबाबत प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार व परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक बी.पी.पाटील यांना बुधवारी निवेदन देण्यात आले. अभाविपच्या शिष्टमंडळाने कुलसचिव व परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक यांची भेट घेत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा […]

Read More

सोमवारी जिल्ह्यातील या शहरात पाळला जाणार जनता कर्फ्यू

पारोळा प्रतिनिधी >> जिल्ह्यात सध्याला कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. जळगाव सह जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पारोळा तहसिल कार्यालयात येथे बैठकीचे आयोजन करण्यात येऊन सोमवारी जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आ. चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव पुन्हा वाढु नये म्हणुन […]

Read More

यावल-साकळी-किनगाव रस्ता दुरुस्तीस अखेर प्रारंभ

साकळी >> यावल तालुक्यातील यावल-साकळी-किनगाव रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. यासंदर्भात ‘रिड जळगाव’ ने ९ नोव्हेंबरला बातमी दिली होती. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरूस्ती सुरु केली आहे. त्यामुळे वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्यमहामार्गाअंतर्गत यावल-साकळी-किनगाव दरम्यानचा १५ किमीचा रस्ता खड्डेमय झाला आहे. साकळी ते गिरडगाव दरम्यानचा रस्त्यावर यामुळे अनेकदा […]

Read More

जळगावात तरुणाने अश्लिल हातवारे करत तरुणीची छेडछाड ; नागरिकांचा तरुणाला बेदम मारहाण

जळगाव >> शहरातील बेंडाळे कॉलेज समोरून दुचाकीने घरी जात असलेल्या तरूणीला अश्लिल हातवारे करून छेड काढणाऱ्या तरूणाला पकडून नागरीकांनी चांगलाच चोप दिला असून जिल्हापेठ पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. हा प्रकार दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडला. अंदाजे अठरा ते वीस वर्षीय तरूणी दुचाकीने आज सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास बेंडाळे कॉलेज समोरून घरी जात असतांना भारत […]

Read More

जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांचा १३० क्विंटल कापूस घेऊन ट्रकचालक रफूचक्कर

पारोळा >> शहरातील चार शेतकऱ्यांचा १३० क्विंटल कापूस घेऊन चालक ट्रकसह पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पारोळा शहरातील योगेश भोसले, पंढरीनाथ पाटील, किशोर दुसाने, नामदेव वाघ (जळगाव) या चारही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन १३० क्विंटल कापूस गुजरात राज्यातील कडी येथील एपीएमसी मार्केटमध्ये विक्रीसाठी नेण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी अक्कलकुवा […]

Read More