रिक्षात बसलेल्या दांपत्याचे तीन लाखांचे दागिने लंपास

प्रतिनिधी अमळनेर >> वावडे येथे घेऊन जाण्याच्या बहाण्याने रिक्षात बसवलेल्या वृद्ध दाम्पत्याचे सुमारे ३ लाखांचे दागिने व रोख रक्कम लंपास करण्यात आली. ही घटना ८ डिसेंबरला दुपारी ३ वाजता ढेकू रोडवर घडली. वावडे येथील आनंदराव पाटील व पत्नी कस्तुरीबाई हे मंगळवारी मध्य प्रदेशातून अमळनेरला परतले. बसस्थानकावरून बाहेर निघून ते वावडे जाण्यासाठी एका रिक्षात बसले. त्यात […]

Read More

”ती निघाली बांधायला आयुष्यगाठ, प्रियकराने फिरवली सोयीने पाठ!”

लग्नाचे आमिष दाखवून बसवले होते बसमध्ये धुळे प्रतिनिधी >> लग्नाचे आमिष दाखवून बसमध्ये बसवलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलींना शहर पोलिसांनी सोमवारी सकाळी सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पालक सुरतच्या दिशेने रवाना झाले. या वेळी मुलींचे पालक पोलिसांचे आभार मानण्यास विसरले नाही. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात रविवारी रात्री नेहमीप्रमाणे बस उभ्या होत्या. या वेळी दोन अल्पवयीन मुली कोपऱ्यात […]

Read More

भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

एरंडोल >> तालुक्यातील नागदुली येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविण्यात आल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी पोलिस स्टेशनला दिली आहे. ही मुलगी म्हसावद येथे आठवडे बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेली होती. सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी न आल्यामुळे तिच्या परिवारातील सदस्यांनी शोध घेतला मात्र ती आढळून आली नाही. याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल […]

Read More

चाळीसगावात भाजपच्या नगरसेवकाविरुद्ध उपोषण ; सातबारा उताऱ्यात अफरातफर केल्याचा आरोप

चाळीसगाव प्रतिनिधी >> भाजप नगरसेवक शेखर कन्हैय्यालाल बजाज व हिराचंद चंदीराम बजाज यांनी सातबारा उताऱ्यात हेराफिरी करून फसवणूक केल्याचा आरोप टाकळी प्र.चा. येथील मोहन शंकर साठे व गणेश शंकर साठे यांनी केला आहे. या अफरातफरीच्या विरोधात दोघेही सोमवारपासून तहसील कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणास बसले आहेत. २३ नोव्हेंबर २०२० रोजी सरकारी मोजणी पूर्ण केली असून माझा […]

Read More

विवाहितेचा २ लाख रुपयांसाठी छळ, एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

एरंडोल >> नोकरीसाठी माहेरुन दोन लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह इतर नातेवाईकांवर एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. कागदीपुरा भागातील रहिवासी शाहिस्ताबी विकार मनियार यांचे शहरातील सय्यद वाड्यातील विकार हुसेन मणियार यांच्याशी ८ ऑक्टोबर रोजी लग्न झाले. त्यांना तीन मुली आहेत. तर पहिली मुलगी झाल्यावर त्यांनी विवाहितेला त्रास देणे सुरु केले. पती विकार […]

Read More

अमळनेरात भावजायीला शरीरसुखाची मागणी करुन विनयभंग ; तिच्यासह भावाला आई-वडिलांना मारहाण

अमळनेर >> भावजयीचा विनयभंग करून तिच्यासह भावाला आणि आई-वडिलांना मारहाण केल्याची घटना ४ रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. माळीवाडा, अमलेश्वर नगरमधील मूळ रहिवासी असलेली व मुंबई येथे राहणारी एक विवाहिता मामांचे निधन झाल्याने अमळनेर येथे आली हाेती. ४ रोजी रात्री महिलेचे जेठाने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करुन विनयभंग केला. तसेच महिलेचा पती व त्याचा भाऊ […]

Read More

रावेरातील २८ वर्षीय युवकाची नैराश्यातून आतेभाऊला कॉल करून तापी नदीत उडी घेत केली आत्महत्या

रावेर प्रतिनिधी >> रावेरातील एका २८ वर्षीय युवकाने तापी नदीत उडी घेत आत्महत्या केली असून याप्रकरणी रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रावेर शहरातील श्री हनुमान वाड्यात राहणारे रहिवासी व एका आरोग्य विमा कंपनीतच नोकरी करत असलेल्या २८ वर्षीय अविवाहित युवकाने आतेभावाला कॉलवरून कळवत निंभोरासीम ते नांदुपिंप्री दरम्यान असलेल्या पुलावरून तापी […]

Read More

अल्पवयीन मुलाकडून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

डांभुर्णी प्रतिनिधी >> यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे एका चौदावर्षीय अल्पवयीन मुलीचा गावातीलच एका अल्पवयीन मुलाने विनयभंग केला. गेल्या आठवडाभरापासून सदर मुलाने या मुलीचा वारंवार पाठलाग करून ‘आपण तुझ्यावर प्रेम करतो’ असे सांगत स्वतः आत्महत्येचा प्रयत्न देखील केला आहे. डांभुर्णी येथील रहिवासी अल्पवयीन मुलीने या संदर्भात फिर्याद दिली. त्या नुसार गेल्या आठवडाभरापासून गावातील एक अल्पवयीन मुलाने […]

Read More

पाचोऱ्यात भर रस्त्यावर दारू पिऊन चार युवकांचा धिंगाणा ; पहा पुढे काय झाले ?

रिड जळगाव पाचोरा टीम >> पाचोरा शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर दारू पिऊन गोंधळ घालणे चौघांना चांगलेच महागात पडले. सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या या चौघांना पोलिसी प्रसाद देत गुन्हा देखील दाखल झाला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास हॉटेल भाग्यलक्ष्मी समोरील रस्त्यावर चौघांनी दारुच्या नशेत गोंधळ घातला. एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत सार्वजनिक शांततेचा भंग […]

Read More

चारित्र्यावर संशय घेऊन चौघांची विवाहितेस मारहाण ; धमकी देत केला विनयभंग!

तू शेतीत हिस्सा मागू नको. अन्यथा तुला ठार करू जेठाकडून विवाहित महिलेला धमकी अमळनेर प्रतिनिधी >> शेतीचा वाटा का मागते? अशी विचारणा करत ठार मारण्याची धमकी देत आणि महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन जेठ, जेठनी, पुतणी व जेठणीच्या मैत्रिणीने मारहाण व विनयभंग केला. ही घटना ३० नोव्हेंबरला तालुक्यातील बहादरवाडी येथे घडली. बहादरवाडी येथील रहिवासी विवाहितेचे पती […]

Read More

अमळनेर बीडीओसह ६ जणांवर खंडणीचा गुन्हा

गजानन पाटील प्रतिनिधी अमळनेर >> वैयक्तिक शौचालय योजनेत एक लाखाची खंडणी मागणे, सरपंचपदाचा कालावधी नसताना मठगव्हाण येथील सरपंचावर अपहाराचा आरोप करून त्यांच्या अपात्रतेचा प्रयत्न केल्याप्रकरणी अमळनेर गटविकास अधिकारी, दोन विस्तार अधिकाऱ्यांसह सहा जणांवर मंगळवारी खंडणी, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. मठगव्हाण (ता.अमळनेर) येथील तत्कालीन सरपंच मायाबाई प्रवीण वाघ यांनी ३० नोव्हेंबरला तक्रार दिली होती. त्यात त्या […]

Read More

अंगणात पाणी येत असल्याच्या रागात भावाने बहिणीच्या डोक्यात लोखंडी सळईने केला वार ; गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी >> जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे घरातील सांडपाणी अंगणात येत असल्याच्या कारणावरून भाऊ-बहिणी यांच्यात हाणामारी झाला. यात भावाने बहिणीच्या डोक्यात लोखंडी आसारी मारून गंभीर दुखापत केल्याची घटना आज १ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भावासह तीन जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, शबनम जाकिर शेख (वय-४०) […]

Read More

जिल्हा रुग्णालयात नोकरीचे आमिष दाखवून पैसे लुटणारा मास्टरमाइंड अटकेत

जळगाव प्रतिनिधी >> जिल्हा सामान्य रुग्णालयात नोकरी लावून देतो असे, आमीष देत शहरासह जिल्ह्यातील तरुणांची लाखो रुपयांत फसवणूक झाली होती. गेल्यावर्षी १२ ऑक्टोबर २०१९ रेाजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फरार असलेला प्रमुख संशयीत योगेश सुधाकर पाटील (मूळ रा. नाडगाव ता. बोदवड, हल्ली मुक्काम अंकलेश्‍वर, गुजरात) यास जिल्हापेठ पोलिसांनी भरुच येथून सापळा रचून अटक केली […]

Read More

यावलमध्ये फसवणूकीच्या उद्देशाने लग्न तर नवरीकडून दागिने हस्तगत ; महिलेने नाव बदलल्याने उघड

यावल प्रतिनिधी >> शहरातील महाजन गल्लीत एका अविवाहित मुलाला तुझे लग्न लावून देते. त्यासाठी मुलीच्या वडिलांना ७० हजार रुपये द्यावे लागतील, अशी बतावणी करत एका महिला एजंटने खोटे नाव सांगून फसवणूक केली होती. याप्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल आहे. तपासासाठी यावल पोलिसांनी औरंगाबाद एमआयडीसीतून नवरीच्या घरून भाड्याच्या घरातून सोने-चांदीचे दागिने हस्तगत केले. याप्रकरणी आणखी कोणाची […]

Read More

साकळीत संविधान दिनाचा अवमान; ग्रामपंचायत प्रशासनाला पडला विसर, सरपंच-उपसरपंचांची अनुउपस्थिती!

साकळी प्रतिनिधी >> दि.२६ नोव्हेंबर २०२० रोजीच्या संविधान दिनाचा साकळी ग्रामपंचायतीला विसर का पडला याबाबत यावल पंचायत समितीला निवेदन देण्यात आले आहे. याबाबत चौकशी करुन जे दोषी आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा उपोषणास बसेल अशी मागणी मिलिंद जंजाळे यांनी केली आहे. निवेदनात म्हटल्या नुसार, संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा दि.२६ नोव्हेंबर रोजी […]

Read More

एक कोटीसाठी विवाहितेचा छळ

शिरपूर प्रतिनिधी >> तालुक्यातील खर्दे येथील माहेर असलेल्या विवाहितेला नाशिक येथील सासरच्या मंडळींनी बेदम मारहाण केली. मुंबईला फ्लॅट घेण्यासाठी माहेरून एक कोटी रुपये आणावे असा तगादा विवाहितेकडे लावण्यात आला होता. याप्रकरणी विवाहितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील खर्दे येथील माहेर असलेल्या मनीषा पवन मोरे यांचा सन २०१८ मध्ये […]

Read More

भुसावळातील नगरसेवकाच्या भावाला चाकू दाखवून लुटले

भुसावळ प्रतिनिधी >> शहरातील दीनदयाळ नगरातील फकीर गल्ली, मशिदीच्या मागील भागात चाकूचा धाक दाखवून सत्ताधारी भाजप नगरसेवकाच्या भावाला धमकावत तीन भामट्यांनी लूटले. त्याच्याकडील चार हजार ९०० यांची रोकड लांबवल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी एकाला अटक केली. नगरसेवक महेंद्रसिंग उर्फे पिंटू ठाकूर यांचे बंधू तथा रिक्षाचालक अनिल ठाकूर (रा. सिंधी कॉलनी, मोहन रॉकेल डेपोजवळ, […]

Read More

चाकूचा धाक दाखवत तिघांचा अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार

धुळे >> तालुक्यातील न्याहळोद येथे माहेरी आलेल्या अल्पवयीन विवाहितेला चाकू, वस्तऱ्याचा धाक दाखवून तिघांनी तिच्यावर अत्याचार केला. लक्ष्मण महाले, सचिन पवार, कांतिलाल पवार अशी तिघांची नावे आहेत. या प्रकरणी सोनगीर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तिघांची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पीडितेचा ऑगस्ट महिन्यात विवाह झाला होता. न्याहळोद येथील माहेर असलेल्या मुलीचा अमळनेर तालुक्यातील चोपडाई […]

Read More

कापूस खरेदीसाठी कट्टी लावू नका, शेतकऱ्यांची लूट थांबवा : शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची चोपड्यात मागणी

राजेंद्र पाटील चोपडा प्रतिनिधी >> यंदा शेतकरी अनेक संकटांना तोंड देत आहेत. मोठ्या कष्टाने त्यांनी कापूस पिकवला आहे. त्या कष्टाचे मोल त्याला मिळाले पाहिजेत. शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कट्टी लावून अक्षरश: लूट केली जात आहे, ती थांबली पाहिजे, असा सूर शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. सीसीआय कापूस खरेदी केंद्रात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचा […]

Read More

विटंबनेची अफवा निघाल्याने खवशी ग्रामस्थांनी सोडला नि:श्वास

लहान मुलांच्या खेळण्यातून अनवधानाने झाला प्रकारअमळनेर प्रतिनिधी >> तालुक्यातील खवशी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची बातमी सर्वत्र पसरली आणि प्रशासन सज्ज झाले. मात्र, लहान मुलांच्या खेळण्यातून हा प्रकार झाल्याचे लक्षात आल्यावर ती अफवा ठरली आणि ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तालुक्यातील खवशी येथे अज्ञात व्यक्तीने एका महापुरुषांच्या पुतळ्यावर शेणाचा मारा करुन पुतळ्याची विटंबना केल्याचे […]

Read More