आमदार मंगेश चव्हाण यांना दर सोमवार, मंगळवारी लावावी लागणार चाळीसगाव पोलिस ठाण्यात हजेरी
प्रतिनिधी जळगाव >> महावितरणचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुक शेख यांना मारहाण केल्याप्रकरणी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांना सोमवारी जिल्हा न्यायालयाने अटीशर्तींवर जामीन मंजूर केला. न्यायाधीश छाया पाटील यांच्या न्यायालयात आमदार चव्हाण यांच्यासह सर्व संशयितांच्या जामीन अर्जावर दोन्ही पक्षांचे युक्तिवाद १ एप्रिल रोजी पूर्ण झाले होते. दरम्यान, सोमवारी न्यायालयाने सर्वांना जामीन अर्ज मंजूर केले. […]
Read More