यावल-निमगाव शिवारात बिबट्या आढळल्याने खळबळ ; सावधानता राखण्याची गरज

यावल प्रतिनिधी >> तालुक्यातील निमगाव शिवारात गुरूवारी पहाटे बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिवारात पाहणी करून बिबट्याच्या पायांचे ठसे घेतले. शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी, अशी सूचना देण्यात आली आहे. निमगाव येथील शेतकरी अरुण जुलालसिंग पाटील यांच्या शेतात गुरूवारी पहाटे बिबट्या दिसला. या बाबत तात्काळ यावल प्रादेशिक वनविभागास माहिती देण्यात […]

Read More

अयोध्येतील श्रीराम मंदिर आंदोलनावेळी संतांनी आवाहन केले त्या-त्या वेळी समाजाने एकत्रित येत आंदोलन यशस्वी केले

भुसावळ प्रतिनिधी >> जेव्हा धर्मावर आक्रमण झाले तेव्हा संतांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन समाज पुढे आला आणि बलिदान केले. या पुढे होणाऱ्या प्रत्येक धर्मकार्यात संत तन, मन व धनाने पुढे राहतील, अशी ग्वाही महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी दिली. मंगळवारी राम मंदिर निर्माण निधी संकलन केंद्राचे जामनेररोडवर उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर भक्तीप्रसाददास महाराज, […]

Read More

भुसावळात दागिन्यांसह ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

भुसावळ प्रतिनिधी >> शहरातील शिरपूर कन्हाळा रोडवरील राधाकृष्ण अपार्टमेंट येथे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्याच्या दागीन्यांसह रोख रक्कम ३५ हजार रूपयांची मुद्देमाल लंपास केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शहरातील सोनल मनोहर पुल्लेवार (वय-३५) रा. शिरपूर कन्हाळा रोडवरील राधाकृष्ण अपार्टमेंट ह्या कामाच्या निमित्ताने ११ […]

Read More

चोपड्यातील भार्डू शिवारात आढळला बिबट्या!

चोपडा राजेंद्र पाटील प्रतिनिधी >> तालुक्यातील भार्डू येथे १३ डिसेंबरला सकाळी ११ वाजेच्या सुमारास सालगडी बैल बांधण्यास गेला असता त्याच्यावर बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. त्यानंतर रात्री ११ वाजता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्या पकडण्यात यश मिळाले. भार्डू येथील शेतकरी मिलिंद पाटील यांच्या शेतात कामाला असलेला सालगडी नाना पावरा हा सकाळी ११ वाजता शेतात […]

Read More
यावल ग्रामीण रुग्णालय

यावलच्या महिलेची तापी नदीच्या पुलावरून उडी घेत आत्महत्या

यावल>> शहरातील बोरावल गेट, डॉ.आंबेडकरनगर भागातील रहिवासी ६० वर्षीय महिलेने भुसावळातील तापी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. सावित्रीबाई शंकर भालेराव असे मृत महिलेचे नाव आहे. भालेराव यांनी शनिवारी सकाळी तापी नदीवरील पुल गाठला, तसेच थेट पुलावरून नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना लक्षात येताच नागरीकांनी फैजपूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी […]

Read More

मुक्ताईनगर तालुक्याच्या वाळू माफियांसोबत अधिकाऱ्यांचे घनिष्ठ सबंध

महसूल विभागाच्या डोळ्यासमोर बिनधास्त अवैध वाळू वाहतूक वाळूची टंचाई निर्माण करून ज्यादा दराने विक्री करून ग्राहकांची लूट केली जात आहे. वाळूमाफियांचे दलाल दिवसभर महसूल कार्यालय परिसरात फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. वाळू माफिया कडून आपल्या वाहनांवर नंबर प्लेट वर नंबर टाकलेला नाही विना नंबर चे वाहनाचा वापर मोठ्या प्रमाणात वापर RTOकार्यालयाचे नियमाचे उल्लंघन […]

Read More

३९ वर्षीय तरुणाची तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या

भुसावळ ::> तापी नदीच्या पुलावरून उडी घेत साकरी (ता.भुसावळ) येथील युवकाने सोमवारी दुपारी ३ वाजता आत्महत्या केली. संतोष भोळे (वय ३९) असे मृताचे नाव आहे. पुलावरून उडी घेताच नदीपात्रातील खडकावर आपटल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेत मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढला. शहर पोलिस ठाण्यात अकस्मात […]

Read More

३७ किमी पायीवारी करुन नेली शिरागड ते कासवे गावी अंखड ज्योत

मनवेल ता.यावल प्रतिनिधी ::> शिरागड येथील सप्तश्रूगी देवी मंदिरातून आज ( दि १७ ) रोजी अखंड ज्योत आणून यावल तालुक्यातील कासवे येथील सार्वजनिक दुर्गा मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आली. शिरागड येथील श्री निवाशीनी सप्तश्रूगी मातेच्या मंदिरात जळणारी अखंड ज्योत कासवे येथील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाचे कार्यकर्त्यांनी ३७ किमी पायी जाऊन अंखड ज्योत नेली […]

Read More

नागपूर-मुंबई, विदर्भ उद्यापासून धावणार तर भुसावळात थांबा निश्चित

भुसावळ प्रतिनिधी :: अनलॉक पाचमध्ये आता नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस व मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस या गाड्यांची सेवा शुक्रवारपासून (दि.९)सुरु होणार आहे. गुरूवारी (दि. ८) सकाळी ८ वाजेपासून सुरू केले जात आहे. भुसावळ विभागातून सुमारे ५० पेक्षा जास्त गाड्या सुरू झाल्या आहेत. त्यात आता पुन्हा अप आणि डाऊन चार गाड्यांची भर पडणार आहे. शुक्रवारपासून (दि.९) मुंबई-गोंदिया विदर्भ […]

Read More

हावडा-मुंबई मेल, हावडा एक्स्प्रेस दररोज धावणार ; भुसावळ, जळगावात थांबा!

रिड जळगाव टीम ::> नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, रेल्वे प्रशासनाने हावडा मुंबई मेल व हावडा अहमदाबाद एक्स्प्रेस या गाड्या आठवड्यातून तीन दिवस सुरु केल्या होत्या. मात्र आता रेल्वे प्रशासनाकडून या गाड्या दररोज सोडल्या जाणार आहेत. रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता हावडा-मुंबई मेल आणि हावडा-अमदाबाद या विशेष गाड्या आठवड्यातू तीन दिवस धावत होत्या. मात्र […]

Read More

तापी पुलावरून उडी घेत न्हावी येथील युवकाची आत्महत्या

यावल प्रतिनिधी ::> तापी पुलावर दुचाकी लावून न्हावी येथील युवकाने नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना, गुरूवारी सकाळी ८.३० वाजेपुर्वी घडली. विरेंद्र रामा कोळी (वय ४०) असे मृताचे नाव आहे. या घटनेनंतर तापी पुलावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. दुचाकीचा क्रमांक अस्पष्ट असल्याने ओळख पटवण्यात अडचणी आल्या. शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. मृतदेह बाहेर काढल्यावर […]

Read More