मला डॉक्टरांचा अभिमान !! या कोविड सेंटरला ३५ खासगी डॉक्टर देताहेत मोफत सेवा

प्रतिनिधी >> अमळनेर तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असून शासकीय वैद्यकीय सेवा तोडकी पडू लागल्याने प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्या आवाहनानुसार किमान ३५ खासगी जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर शासकीय कोविड सेंटरला आलटून पालटून मोफत सेवा देत आहेत. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल करून त्यांच्यावर उपचार करणे सुलभ झाले आहे. तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आणि अत्यवस्थ असणाऱ्या रुग्णांची संख्या […]

Read More

आपल्या जळगावच्या नेहाला साडे १० लाखांची शिष्यवृत्ती…वाचा कशी मिळाली शिष्यवृत्ती?

प्रतिनिधी जळगाव >> केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्रालयातर्फे येथील नेहा महेश मोता या विद्यार्थीनीला ‘मेरीट-कम-मिन्स’ (एमसीएम) अंतर्गत २०२०-२१ या वर्षाची १० लाख ६० हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. श्री. कच्छी दशाविशा ओसवाल जैन समाजाचे सदस्य महेश कांतीलाल मोता यांची नेहा ही कन्या आहे. जिल्ह्यातून तसेच जैन समाजातून केंद्र शासनाची मोठी शिष्यवृत्ती मिळवणारी नेहा ही एकमेव […]

Read More

सार्वजनिक ठिकाणी होळी करू नका : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव >> कोरोनाच्या काळात प्रत्येक सण, उत्सवावर बंदी आहे. होळी आणि धूलिवंदन हा सण सार्वजनिक स्थळी साजरा न करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. याबाबत राज्य शासनाच्या सूचनेनुसार पुढील आदेश देण्यात येईल. तीन दिवसांच्या लॉकडाउनबाबत विचार सुरू असून, आदेशपूर्वी नागरिकांना पुरेसा वेळ दिला जाईल. अशा लॉकडाउनची पुन्हा वेळ येऊ नये यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे आहे, असे […]

Read More

कोरोनावर मात केल्यानंतर अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद रुजू

जळगाव >> शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यानंतर ते मंगळवारी पुन्हा सेवेत रुजू झाले. सकाळीच त्यांनी रुग्णालयाचा राऊंड घेत परिस्थिती जाणून घेतली. १० मार्चला त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तब्बल १३ दिवस उपचार घेतल्यानंतर ते पूर्णपणे बरे झाले. मंगळवारी सकाळी १० वाजता त्यांनी सर्व विभागांमध्ये जाऊन […]

Read More

एसटी कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण करावे : आमदार भोळे, मंगेश चव्हाण यांची मागणी

जळगाव >> बेस्टच्या सेवेसाठी जळगावसह विविध आगारातून दर आठवड्याला एसटीतील चालक, वाहकांसह इतर कर्मचारी जात आहेत. जळगावातील कर्मचारीदेखील दोन वेळा मुंबईला जाऊन आले. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने, जळगाव विभागातील कर्मचाऱ्यांना बेस्टच्या सेवेतून वगळून त्यांना कोरोना लस द्यावी, अशी मागणी आमदार सुरेश भोळे व आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी आणि विभाग नियंत्रकांकडे केली आहे. […]

Read More

यावलात कोरडया विहीरीत पडलेल्या श्वानाला प्राणी मित्रांकडून जीवदान

यावल प्रतिनिधी जयवंत माळी >> शहरातील बस स्थानक परिसरातील कोरड्या विहिरीत आज अचानक एक कुत्रा पडून तो ओरडत असल्याने परिसरातील युवकांनी त्या श्वानास सुखरूप बाहेर काढले . आज दुपारच्या वेळी ही घटना घडलेल्या यावल शहरातील वन्यजीव प्रेमी राहुल कचरे, सर्पमित्र जयवंत माळी, मनोज बारी, लक्ष्मण बारी, गिरीश चौधरी या युवकांच्या निर्दशनास ही बाब आल्याने सर्वांनी […]

Read More

सावधान, लग्नात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने वधू-वराच्या पित्याला ठोठावला दंड

प्रतिनिधी कुऱ्हेपानाचे >> सावधान, तुम्ही वधू-वराचे पालक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याने कुऱ्हे पानाचे येथील (ता.भुसावळ) येथील रेणुका नगरातील वधू-वर पित्यासह बँड पथकाला ग्रामपंचायतीने दोन हजार रुपये दंड ठोठावला. लग्न समारंभात कोरोनाचे नियम तोडल्याने झालेली ही गावातील पहिलीच कारवाई ठरली. सोमवारी (दि.१५) रेणुका नगरात लग्न समारंभाचे आयोजन केले होते. […]

Read More

MPSC ची परीक्षा मार्च महिन्यातील या तारखेला होण्याची शक्यता ; विद्यार्थ्याचे वयोमर्यादेमुळे नुकसान होणार नाही

मुंबई >> महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा केवळ काही दिवसांसाठी पुढे ढकलली असून १४ तारखेनंतरच्या आठ दिवसात या परीक्षा घेतल्या जातील आणि त्याची तारीख उद्याच घोषित केली जाईल अशी निसंदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली तसेच परीक्षा पुढे ढकलल्याने कोणत्याही विद्यार्थ्याचे वयोमर्यादेमुळे नुकसान होणार नाही हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी आज समाज माध्यमांद्वारे […]

Read More

जळगावात १०० वर्षांच्या आजीने ‘रामकृष्ण हरी’ म्हणत घेतली कोरोनाची लस

जळगाव> सध्याला सर्वत्र कोरोनाची लस घेण्याची धडपड सर्वसामान्यांमध्ये सुरु आहे. अशातच जळगावातील आजीने आज लस घेतल्यावर ‘रामकृष्ण हरी’ म्हणत त्यांनी आनंद व्यक्त केला. डॉ. मिलिंद बारी यांनी वृद्धेला पायऱ्या चढू न देता त्यांच्या जागेवर जाऊन लसीकरण केले. वृद्ध महिलेसोबत मुलगा निवृत्तीनाथ व्यवहारे व नातसून वृषाली हे होते. तसेच जीएमसीचे शासकीय लसीकरण केंद्र मायादेवीनगरच्या रोटरी हॉलमध्ये […]

Read More

थेट जिल्हाधिकारी- एसपी मैदानात ; कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जोरदार कारवाई

जळगाव प्रतिनिधी >> शहरात प्रशासनाचे प्रयत्न कोरोना रोखण्यासाठी सुरू असतांनाही नागरिक मात्र नियमांचे पालन करत नसल्याचे पाहून आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी स्वत: शहरात फिरून कारवाई केली. जिल्हाधिकार्‍यांनी काही दिवसांपूर्वी नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर थेट स्वत: मैदानात उतरून कारवाई केली होती. यानंतर आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शहरात फिरून विना […]

Read More

अमळनेरात आठवडे बाजार बंदला १००% प्रतिसाद

प्रतिनिधी अमळनेर >> शहराचा सोमवारी भरणारा आठवडे बाजार बंद ठेवून, भाजीपाला व्यावसायिक, व्यापारी आणि नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला १०० टक्के प्रतिसाद दिला. शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना खबरदारीचा उपाय म्हणून आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार सोमवारी गजबजणारा भाजीबाजार बंद ठेवण्यात आला. तसेच कापड विक्रेते, किराणा दुकानदार, भांडी व फळ विक्रेत्यांनीदेखील बंदमध्ये सहभाग नोंदवून […]

Read More

जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल मध्ये महिला दिन साजरा

यावल >> यावल शहरातील जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल येथे आज जागतिक महिला दिनानिमित विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. यावेळी व्यास शिक्षण मंडळ आय टी आय, यावल चे प्राचार्य जी.जी. वाघुळदे व प्रमोद बिरुजवाले, प्रवीण झोपे तसेच जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल, यावल चे प्राचार्य भुपेन्द्र राजपूत यांनी जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल च्या प्राचार्या रंजना पाटिल यांना व […]

Read More

मॉडर्न इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये जागतिक महिलादिन उत्साहात साजरा

रिड जळगाव टीम >> मॉडर्न इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये जागतिक महिलादिन निमित्त जिल्हा परिषद सदस्य जळगाव शिक्षण, क्रिडा, आरोग्य विभाग रविंद्र सूर्यभान पाटील ( छोटुभाऊ) व सागर कोळी तालुकाध्यक्ष भाजपा युवामोर्चा यांच्या हस्ते शिक्षिका महिलांचा सत्कार करून उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मॉडर्न इंग्लिश मेडियम स्कूल यावल ला भेट […]

Read More

चाळीसगाव-कन्नड घाटाची दुरवस्था झाल्याने आज सुधारणा : खा. उन्मेश पाटील

चाळीसगाव प्रतिनिधी >> कन्नड घाट म्हणून ओळख असलेल्या औट्रम घाटाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली असल्याने एक दिवस घाट बंद करून रस्त्यांचे काम करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. आज घाट बंद ठेऊन कामास सुरुवात करून दुरुस्ती करण्यात आली. अशा आशयाची पोस्ट खासदार उन्मेश पाटील यांनी ट्विटर च्या माध्यमातून केली आहे.

Read More

रावेरात आजपासून सुरु होणार कोविड सेंटर

प्रतिनिधी रावेर >> तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून बुधवारपासून विविध प्रकारच्या व्याधिग्रस्त व ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन येथील सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील कोरोना कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांना जळगाव येथे न पाठवता येथील ग्रामीण रुग्णालयात […]

Read More

जिल्ह्यातील या शहरात आज बाजार बंद अन् जनता कफ्यू लागू

प्रतिनिधी गजानन पाटील अमळनेर >> शहरातील सोमवारी भरणारा आठवडे बाजार बंद करण्यात आला असून ८ मार्चला शहरात जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. जनता कर्फ्यूमुळे भाजीपाला बाजार बंद राहणार आहे. तर भाजी बाजार, भाजीपाल्याचा लिलाव, फळे यासह कापड, किराणा व इतर छोटे-मोठे व्यवसाय सोमवारी बंद ठेवण्यात येणार आहेत. हा कडकडीत बंद स्वयंस्फूर्तीने पाळण्यात येणार आहे. सोमवारी […]

Read More

प्रभारी कुलगुरु डॉ. ई वायुनंदन सोमवारी स्वीकारणार पदभार

जळगाव >> कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. पी. पाटील यांनी २७ फेब्रुवारी रोजी राजीनामा दिला आहे. यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ई वायुनंदन यांची विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदी निवड झाली आहे. डॉ. ई वायुनंदन हे ९ मार्च रोजी पदभार स्वीकारणार आहे. ते नाशिकहून सकाळी ११ वाजता विद्यापीठात पोहचणार आहे. त्यानंतर […]

Read More

डॉ. पी. पी. पाटील यांनी दिला कुलगुरू पदाचा राजीनामा

जळगाव प्रतिनिधी >> कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांनी आपल्या पदाचा आज राजीनामा दिला असून त्यांच्या जागी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे तात्पुरता प्रभार देण्यात येणार आहे. डॉ. पी. पी. पाटील यांनी कुलगुरूपदाचा राजीनामा दिला असून विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकार्‍यांनी याला दुजोरा दिला आहे. डॉ. पाटील यांच्या कार्यकाळाला सुमारे सहा […]

Read More

दिल्लीतील पथ संचलनात जळगावची समृद्धी संत प्रजाकसत्ताक दिनी करणार देशाचे नेतृत्व

जळगाव प्रतिनिधी >> २६ जानेवारी निमित्ताने दिल्लीत होणाऱ्या सैन्य दलाच्या आणि एनसीसीच्या परेडकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेले असते. दिल्ली येथील राजपथावर २६ जानेवारीला होणाऱ्या संचलनात मूळजी जेठा महाविद्यालयची एन.सी.सी. युनिट ची छात्र सैनिक सिनिअर अंडर ऑफिसर समृद्धी हर्षल संत ही ऑल इंडिया परेड कमांडर म्हणून पद भूषविणार आहे. यावर्षी एन.सी.सी.(NCC)महाराष्ट्र डायरेक्टरेट मधून केवळ २६ छात्र […]

Read More

श्रीराममंदिर हे ‘राष्ट्रमंदीर’ व्हावे ! महंत जनार्दन हरीजी महाराज यांचे साकळीत प्रतिपादन

साकळी प्रतिनिधी >> मानवाला जीवन जगण्यासाठी हवा, पाणी यासह सृष्टीतील सर्व घटक आपल्याला विनामोबदला मिळत असते व त्याचा आपण उपभोग घेतो. या सर्व गोष्टीचे भान ठेवून आपणही देवाच्या कार्यासाठी आपल्या यथाशक्ती प्रमाणे हातभार लावावा. जेणेकरून आपल्या सर्वांच्या समर्पित सेवेतून अयोध्येतील श्रीराम मंदिराचे निर्माण होऊन ते मंदीर निश्चितच ‘राष्ट्रमंदिर’ होईल असे भावनिक प्रतिपादन महामंडलेश्वर महंत स्वामी […]

Read More