चाळीसगावात मशाल रॅली काढणाऱ्या नगरसेवकांसह ३० जणांवर गुन्हा

राज देवरे प्रतिनिधी चाळीसगाव >> आमदार मंगेश चव्हाण यांच्या अटकेच्या निषेधार्थ मशाल रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांमध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष, शहराध्यक्ष, नगरसेवक व माजी पं.स. सदस्यांचा समावेश आहे. २७ रोजी सायंकाळी ७ ते ७.३० वाजे दरम्यान शहरात विश्रामगृह ते तहसील कार्यालय […]

Read More

धरणगावात भाजप आज काढणार अर्धनग्न मोर्चा

धरणगाव >> धरणगाव नगर परिषदेवर पाण्यासाठी ८ मार्चला भारतीय जनता पक्षातर्फे अर्धनग्न निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता बालाजी मंदिरापासून या मोर्चाला सुरुवात होणार असल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले. शहरातील पाण्याची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून गेल्या २० ते २२ दिवसांपासून धरणगाव शहरात पाणीपुरवठा झालेला नाही. सध्या नागरिकांकडे लग्न समारंभ व विविध कार्यक्रम […]

Read More

बोदवडात दिव्यांग महिलेवर अत्याचार

बोदवड >> येथील महिलेच्या विकलांगपणाचा गैरफायदा घेत, तिला लग्नाचे आमिष दाखवून एका व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केले. यातून ती महिला गरोदर राहिली. तिला व तिच्या दोन मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली जात होती. या प्रकरणी आरोपीविरुद्ध दखलपात्र गुन्हा नोंदवण्याची मागणी राष्ट्रीय विकलांग पार्टीने निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीची दखल न घेतल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला. […]

Read More

पाण्याच्या प्रश्नावर भाजप धरणगावमध्ये लवकरच काढणार भव्य मोर्चा

धरणगाव >> शहरात १३ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. ही समस्या निकाली काढण्यासाठी मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी बुधवारी सर्वपक्षीय बैठक घेतली. मात्र, या बैठकीला आरोप प्रत्यारोपाचे राजकीय गालबोट लागले. बैठक आटोपताच भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संजय महाजन, शहराध्यक्ष दिलीप माळी अनियमित पाणीपुरवठ्याच्या विरोधात भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. पाणीप्रश्नावर शहरात नाराजी वाढल्याने सत्ताधाऱ्यांनी मुख्याधिकारी पवार यांना […]

Read More

भारत बंदला यावलमधून संमिश्र प्रतिसाद

यावल प्रतिनिधी >> देशाच्या अन्न पुरवठा करणाऱ्‍यांविरोधात काळा कायदा लादल्याबद्दल दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला यावलमधून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, आज दि.८डिसेंबर रोजी केन्द्रातील शासनाने देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात पारित केलेले शेतकरी विरोधातील काळे कायदे तात्काळ मागे घ्यावे, याकरिता संपुर्ण देशातील लाखो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले असुन आपल्या […]

Read More

कृषी कायद्यांच्या विरोधात वाकोद येथे रस्ता रोको आंदोलन

वाकोद ता.जामनेर >>केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात 8 डिसेंबर रोजी देशातील शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती.त्याला प्रतिसाद म्हणून राज्यातील शेतकरी संघटना तसेच महाविकास आघाडी सरकार मधील,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना,प्रहार या घटक पक्षांच्या वतीनेही भारत बंद पाळला गेला. वाकोद येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते,शेतकरी व सुशिक्षित तरुणांनी कृषी कायद्यांना विरोध म्हणून रास्ता रोको आंदोलन केले.तसेच हे […]

Read More

चाळीसगावात भाजपच्या नगरसेवकाविरुद्ध उपोषण ; सातबारा उताऱ्यात अफरातफर केल्याचा आरोप

चाळीसगाव प्रतिनिधी >> भाजप नगरसेवक शेखर कन्हैय्यालाल बजाज व हिराचंद चंदीराम बजाज यांनी सातबारा उताऱ्यात हेराफिरी करून फसवणूक केल्याचा आरोप टाकळी प्र.चा. येथील मोहन शंकर साठे व गणेश शंकर साठे यांनी केला आहे. या अफरातफरीच्या विरोधात दोघेही सोमवारपासून तहसील कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणास बसले आहेत. २३ नोव्हेंबर २०२० रोजी सरकारी मोजणी पूर्ण केली असून माझा […]

Read More

“दिल्लीतील आंदोलन शेतकऱ्यांचे नसून मार्केट कमिटीच्या लोकांचे’

सांगली >> दिल्लीत सुरू असलेले आंदोलन हे शेतकऱ्यांचे नसून मार्केट कमिटीच्या पुरस्कृत लोकांचे आहे. त्यांना पाठिंबा देणाऱ्या राज्यातील शेतकरी संघटना शेतकऱ्यांचे नुकसान करत आहेत. राज्यातील आमदार, खासदारांना शेतकऱ्यांना चांगला दर मिळू द्यायचा नाही, त्यामुळे कारखान्यांच्या अध्यक्षांनी आमच्याबरोबर खुली चर्चा करावी. उसाला ४१०० रुपये दर कसा देता येतो हे आम्ही दाखवून देऊ, असे खुले आव्हान शेतकरी […]

Read More

कृषी विधेयकाविरुद्ध यावलला आज आंदोलन

यावल प्रतिनिधी >> येथील तहसील कार्यालयासमोर गुरूवारी कृषी विधेयकांविरुद्ध काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन केले जाणार आहे. उत्तर भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा हे आंदोलन केले जाणार आहे. आमदार शिरिष चौधरी आंदोलनाचे नेतृत्व करतील. माजी आमदार रमेश चौधरी, जिल्हा परिषदेचे गटनेता प्रभाकर सोनवणे, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, बाजार समितीचे माजी सभापती नितिन चौधरी, पंचायत समितीचे माजी सभापती लिलाधर […]

Read More

कापूस खरेदीसाठी कट्टी लावू नका, शेतकऱ्यांची लूट थांबवा : शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची चोपड्यात मागणी

राजेंद्र पाटील चोपडा प्रतिनिधी >> यंदा शेतकरी अनेक संकटांना तोंड देत आहेत. मोठ्या कष्टाने त्यांनी कापूस पिकवला आहे. त्या कष्टाचे मोल त्याला मिळाले पाहिजेत. शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कट्टी लावून अक्षरश: लूट केली जात आहे, ती थांबली पाहिजे, असा सूर शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. सीसीआय कापूस खरेदी केंद्रात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचा […]

Read More

आदिवासी भागातील रस्त्याची दुरुस्ती करा : प्रांताधिकाऱ्यांना निवेदन; आंदोलनाचा इशारा

फैजपूर प्रतिनिधी ::> आदिवासी भागातील बोरखेडा ते तिळया, अंधारमळी व मोहमांडली रस्त्याची पार दुर्दशा झाली असून रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. रस्ते सुधारण्याच्या मागणीसाठी आदिवासी एकता मंचातर्फे येथे प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन देण्यात आले. बोरखेडा ते तिळया, अंधारमळी व मोहमांडली ह्या रस्त्यांची पुरती दैना उडाली आहे. या तिन्ही गावांमध्ये सर्वत्र आदिवासी बांधवांचा रहिवास आहे. दवाखाने, बाजार, […]

Read More

चोपडा तहसीलदारांना लाल बावटा युनियनतर्फे विविध मागण्यांचे निवेदन

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील ::> शेतकरी, शेतमजूर, वयोवृद्ध, निराधार, विधवा, दिव्यांग यांचे चार महिन्यांचे थकीत मानधन फारकासह दिवाळीपूर्वी अदा करा आदी मागण्यांचे निवेदन चोपडा तालुका तहसीलदार छगन वाघ यांना लालबावटा शेतमजूर युनियन तर्फे देण्यात आले. शेतकरी शेतमजुरांच्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास येत्या दिवाळीला तहसीलदार कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला अमृतराव […]

Read More

साकळी गाव ते साकळी बस स्टन्ड रोड खड्डेमय झाल्याने ग्रामस्थांचा संताप !

साकळी प्रतिनिधी ::> साकळी गाव ते साकळी बस स्टन्ड रोड हा खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावर आता पायी चालणे व दुचाकी चालवणे कठीण झाले आहे. महात्मा फुले चौक ते बस स्टन्ड रोडवर वाहनधारकांना उंट सवारीची अनुभुती मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती ने केल्याने खड्ड्यांची संख्या वाढत आहे. तसेच खड्ड्यांची संख्या वाढल्याने व […]

Read More

चोपड्यात तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा : माजी आमदार कैलास पाटील यांची मागणी

चोपडा राजेंद्र पाटील प्रतिनिधी ::> आधीच कोरोनामुळे शेतीचे अर्थचक्र ठप्प झाले. त्यात आता वादळ व अतिपावसाने तालुक्यातील खरीप, बागायती पिके व फळबागांचे नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी माजी आमदार कैलास पाटील यांनी केले. शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील यांच्या गटाकडून शुक्रवारी चोपडा […]

Read More

चोपडा वर्डीतील वीज कार्यालयाला ठोकले कुलूप ; रोहित्र मिळत नसल्याने संताप

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील ::> जळालेले दोन ट्रान्स्फॉर्मर बदलून देण्यासाठी तीन महिन्यांपासून विनंती करूनही उपयोग होत नसल्याने वर्डी येथील शेतकरी संतप्त झाले. दुसरीकडे वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराच्या तक्रारी वाढल्याने माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पाटील यांनी शेतकऱ्यांसह वर्डी येथील वीज कंपनीच्या कार्यालयास मंगळवारी कुलूप ठोकले. वर्डी येथील १२ आणि ७ क्रमांकाचे रोहित्र जळाले आहे. […]

Read More

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी – सह्याद्री प्रतिष्ठान ची मागणी

चाळीसगांव राज देवरे ::>- सध्या परिस्थितीमध्ये पाहता कोरोना आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी हवालदिल झाला असून त्याच्या हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून नेला आहे. कुठल्याही प्रकारचा आधार शेतकरी राजाला राहिला नसून ह्या प्रचंड झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे. अशा परिस्थितीमध्ये जगाचा पोशिंदा शेतकरी राजा उभा […]

Read More

यावलला विश्व हिंदू परिषद, बजरंग दलकडून मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन

रिड यावल प्रतिनिधी ::> मद्यालये खुली करणारे राज्य सरकार मंदिरे उघडण्याची परवानगी का देत नाही, असा प्रश्न उपस्थित करत सोमवारी भुसावळ टि-पॉइन्टवर अखिल भारतीय विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने उपोषण करत आंदोलन केले. पोलिस व महसूल प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन निवेदन दिल्यानंतर मागे घेण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मंदिर उघडण्याची परवानगी देण्यात आली […]

Read More

रावेर हत्याकांडातील दोषींना फाशीची शिक्षा द्या ; आदिवासी कर्मचारी संघटनेची मागणी

चोपडा राजेंद्र पाटील प्रतिनिधी ::> रावेर तालुक्यातील बोरखेडा रस्त्यालगत झालेल्या आदिवासी कुटुंबातील हत्याकांडाबाबत अनुदानित आदिवासी कर्मचारी संघटनेतर्फे मागण्यांचे निवेदन चोपडा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार राजेश पऊळ यांना दिले. या घटनेची फास्ट ट्रॅक कोर्टात चौकशी व्हावी, दोषींना लवकर फाशी द्यावी, पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करावी, त्यांना हक्काचे पक्के घर मिळावे, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात अाल्या अाहेत. […]

Read More

एलसीबी, मेहुणबारे पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा : आमदार मंगेश चव्हाण

चाळीसगाव प्रतिनिधी ::> जळगावात झालेल्या गुटख्याच्या कारवाई प्रकरणी पोलिसांकडून कायद्याचा गैरवापर करण्यात आला. पोलिसांनी यात आर्थिक देवाणघेवाण करून सेंटलमेंट केली असून कुठतरी पाणी मुरत आहे. या प्रकणात सहभागी जळगाव एलसीबी व मेहुणबारे पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी रविवारी चाळीसगाव येथे त्यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत […]

Read More

अनधिकृत कटती बंद करण्यासाठी अमळनेरात उपोषण

अमळनेर ::> बाजार समितीमधील बेकायदेशीर कटती बंद करण्याच्या ठरावाची प्रत मिळावी, कटतीची रक्कम परत मिळावी यासाठी गावरानी जागल्या संघटनेने प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. अमळनेर बाजार समितीने बेकायदेशीरपणे क्विंटल मागे एक किलो कटती केली. ही रक्कम सभापती आणि संचालक मंडळाने परत केली नाही. तसेच बेकायदेशीरपणे कटती बंद करण्याचा ठराव ज्या प्रोसिडिंग बुकमध्ये लिहिला […]

Read More