पारोळा तालुक्यात ३२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

आत्महत्या क्राईम पारोळा

पारोळा >> तालुक्यातील बोळे येथे १६ डिसेंबरला सकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान ३२ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केली. याबाबत भुरेसिंग भोजू गिरासे यांनी खबर दिली. त्यात त्यांची सून हर्षा ज्ञानेश्वर गिरासे (वय ३२) हिने १६ रोजी सकाळी ६.३० वाजता राहत्या घरात विषारी औषध घेतल्याने ती अत्यवस्थ दिसली. यानंतर हर्षाला पारोळा कुटीर रुग्णालयात आणले. तेथे तिचा मृत्यू झाला.