अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

क्राईम बोदवड

बोदवड प्रतिनिधी >> बोदवड तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात आरोपीस तीन वर्ष सक्तमजूरी व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. २०१६ मध्ये घडलेल्या या गुन्ह्यात भुसावळ अतिरिक्त सत्र न्यायालयात कामकाज सुरु होते. न्यायाधीश ए. बी. भन्साली यांनी हा निकाल दिला.

बोदवड तालुक्यातील कोल्हाडी येथे अल्पवयीन मुलीचे आई-वडील घरी नसल्याचे पाहून, आरोपी एकनाथ चावदस मोरे याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध बोदवड पोलिस स्टेशनला बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचे कामकाज भुसावळातील दुसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.बी.भन्साली यांच्या न्यायासनापुढे चालले.

न्यायालयाने आरोप सिद्ध झाल्याने आरोपीस तीन वर्ष सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड तसेच कलम ४५२ अन्वये एक वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, तसेच कलम ५०४ अन्वये एक महिना सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड सुनावला.

दंडातील पाच हजार रुपये पीडीतेस भरपाई देण्याचे आदेशही आहेत. सरकारतर्फे अ‍ॅड.विजय खडसे यांनी युक्तीवाद केला.