आयशरची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार ठार

अपघात क्राईम बोदवड

बोदवड >> आयशरने दुचाकीला धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास बोदवड-नाडगाव रोडवरील अमर डेअरीच्या गोदामासमोर घडली होती. या अपघातात वरखेड बुद्रूक येथील ३२ वर्षीय युवक ठार झाला.

आयशरने (क्रमांक-एम.पी.०७-जी.ए. २३९१) धडक दिल्याने वरखेड बुद्रूक येथील श्रावण उर्फ विजू अशोक पाटील हा दुचाकीस्वार (क्र.एम.एच.१९-सी.एच.७९२०) ठार झाला.

त्यामुळे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने आयशर चालकाविरुद्ध बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

मृतदेहाचे शुक्रवारी सकाळी डॉ.अमोल पवार यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी वरखेड येथील फिर्यादी अशोक रामदास पाटील यांच्या फिर्यादीवरून आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चालक नितीन रमेश दुंदले (रा.चापोरा) यासअटक केली.पोलिस तपास करत आहेत.