बोदवड‎ शहरातील शारदा कॉलनीमधील‎ रहिवासी असलेल्या तरुणाने राहत्या‎‎ घरात गळफास‎ ‎ घेऊन‎ आत्महत्या‎ ‎ केल्याची घटना‎ ‎ मंगळवारी दुपारी‎ ‎ घडली. संकेत‎ सुभाष भोई (वय २२) असे मृत‎ तरुणाचे नाव असून त्याच्या‎ आत्महत्येमागील कारण कळू‎ शकले नाही.‎

शहरात या घटनेने खळबळ‎ उडाली आहे. आपल्या राहत्या‎ घराच्या वरच्या मजल्यावर‎ असलेल्या खोलीत संकेत भोई याने‎ दुपारी चार वाजेपूर्वी गळफास घेऊन‎ आत्महत्या केली. या प्रकरणी येथील‎ पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद‎ झाली असून तपास पोलिस रवींद्र‎ गुरचळ करत आहेत.‎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *