बोदवड ::> शहरातील माळी गल्लीतील रहिवासी संशयित कैलास सीताराम माळी (वय ३१) याने बुधवारी (दि.२३) रात्री रेणुका माता मंदिराजवळील रस्त्यावर विवाहितेचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडीतेच्या फिर्यादीरूवरून बोदवड पोलिसांत गुन्हा दाखल झाला. संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास विलास महाजन करत आहेत.
